सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी – Surya Ugavla Nahi Tar Marathi Nibandh

सूर्य उगवला नाही, तर? वा! किती मजा येईल! रात्र संपणारच नाही. मग खूप वेळ दूरदर्शनचे कार्यक्रम पाहता येतील. लवकर झोपावे लागणार नाही. लवकर उठण्याची कटकट नसेल. गृहपाठ पूर्ण करण्याची गरज नसेल. शाळेत जावे लागणार नाही. सगळी मज्जाच मजा होईल.

मात्र, सूर्य खरोखरच उगवला नाही, तर…? तर खूप तोटा होईल. आपण सूर्योदयाचा व सूर्यास्ताचा देखावा पाहू शकणार नाही. कधी कधी आकाश किती रंगीबेरंगी झालेले असते! हे दृश्य मग कधीच दिसणार नाही. सगळीकडे काळोखच असेल, मग कुठेच जाता येणार नाही. काही पाहता येणार नाही. शाळा नसेल आणि मित्रही नसतील!

सूर्य उगवला नाही तर या विषयी निबंध – Surya Ugavala Nahi Tar Essay in Marathi

काय ? जर असे झाले तर तर पृथ्वीवर प्रकाश पडणार नाही. पक्षी घरट्याबाहेर पडणार नाहीत. त्यांचा किलबिलाटाने जाग येणार नाही. झाडांना, पिकांना सूर्यप्रकाश मिळणार नाही. त्यामुळे फळे, पिके आणि लाकूडही मिळणार नाही.

अरे हो ! पण मग मनुष्य तरी कसा हे जग पाहील ? कारण दिवस उगवणारच नाही. मग कंदिल घेऊनच बाहेर पडावे लागेल. वेळ ही कळणार नाही. मग भूगोलात पृथ्वीचे परिवहन कसे शिकायला मिळेल ?

सगळीकडे कसा गोंधळच गोंधळ असेल आणि अंधारच अंधार पण आळशी माणसांची मजा होईल. सतत रात्र असल्यामुळे त्यांना झोपायला मिळेल. घड्याळाचे बंधन राहणार नाही. सूर्यप्रकाशाशिवाय जीवसृष्टी जिवंत राहू शकणार नाही. रोगराई पसरेल.

सूर्य उगवला नाही तर काय होईल निबंध – Surya Ugavla Nahi Tar Marathi Nibandh

किती सुंदर कल्पना आहे ! सूर्य उगवला नाही तर… तर खरोखरच खूप मजा येईल. सकाळी लवकर उठावे लागणार नाही. शाळेत जायला नको. बाहेर अंधार असल्यामुळे आई बाहेरची कामे सांगणार नाही.

पण खरोखरच सूर्य उगवला नाही तर ? तर सकाळ, दुपार, संध्याकाळ नसेल. भटकता येणार नाही. सायकल चालवता येणार नाही. मित्रांबरोबर खेळता येणार नाही. शाळाही नसेल. म्हणून मित्रही नसतील. सहल नसेल. मग सगळी मजाच निघून जाईल! …

खरेच, सूर्य नसला, तर पाऊस पडणार नाही. वनस्पती नष्ट होईल. म्हणून अन्नच मिळणार नाही. पाणी मिळणार नाही. मग आपण जगणार कसे? फक्त माणूसच नव्हे, तर प्राणीही मरून जातील. पृथ्वीवर फक्त दगड उरतील! नको, नको! ही कल्पनासुद्धा नको. सूर्य हा हवाच.

सूर्य उगवला नाही तर मराठी मधे निबंध – Surya Ugavala Nahi Tar Brainly

सूर्य उगवलाच नाही तर? अरे बाप रे, मला तर काय होईल त्याची कल्पनाच करवत नाही. सूर्य उगवला नाही तर सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरेल. दिवस उजाडणारच नाही. सगळीच रात्र होऊन जाईल. सर्वात प्रथम वनस्पती मरून जातील. कारण त्यांना स्वतःचे अन्न तयार करण्यास सूर्याची उर्जा हवी असते. वनस्पती नष्ट झाल्या की त्यांच्यावर जगणारे शाकाहारी प्राणी, कीटक आणि पक्षी नष्ट होतील. त्यानंतर मांसाहारी प्राणीही मरणपंथाला लागतील. मग माणूस तरी कसा काय जगेल?

सूर्यच उगवला नाही तर हवा गरम कशी होईल ? हवा गरम झाली नाही तर ती हलकी होऊन वर आकाशात कशी जाईल? मग पाऊस कसा पडेल?
सूर्यच जर उगवला नाही तर पृथ्वीवर कायम हिवाळाच पडेल. शीतयुग निर्माण होईल. जमिनीवर बर्फाचे थरच्या थर साठतील आणि त्या थराखाली सगळी सृष्टी पुरली जाईल. म्हणूनच सूर्याला आपला जीवनदाता म्हटले आहे. सूर्य जगावर रोज सकाळी आपले कृपेचे किरण पसरतो आणि संध्याकाळी तेच किरण आवरून आपल्याला शांत झोप मिळावी म्हणून अंधार करतो. म्हणूनच सूर्य उगवला नाही तर सर्वनाश अटळ आहे.

सूर्य उगवला नाही तर निबंध लेखन मराठी – Surya Ugavala Nahi Tar Mahiti

सूर्य उगवला नाही तर… वा! फारच छान कल्पना! किती मौज येईल! शाळेला सुट्टी, मग खेळांशी होईल गट्टी! आई, बाबा सारेच घरात! घरी बसून फक्त गप्पा मारायच्या. अभ्यास नको,पाठांतर नको की गृहपाठ नको. केवळ मौज आणि मौजच! पण खरोखरंच असे घडले तर.. माझ्या लक्षात कसे आले नाही? सगळीकडे

अंधाराचे साम्राज्य माजेल. खरा आनंद होईल तो आपल्यापेक्षा चोरांना. सगळीकडे चोरांचा सुळसुळाट होईल. घरात लपून बसता बसता नाकेनऊ येईल.

सूर्य उगवलाच नाही तर वनस्पती सूर्यप्रकाशात अन्न कशा तयार करणार? हळूहळू वनस्पती निर्जीव होतील. आणि एक दिवस पृथ्वीवरील साऱ्याच वनस्पती मृत होतील. मग आपण खाणार काय? बकऱ्याचे मांस खाऊन जगू असे काहींना वाटत असेल; पण ते प्राणी तरी किती दिवस जगणार? पर्यावरणाचे सारे संतुलनच बिघडून जाईल. सगळीकडे रोगराई पसरेल. सगळे लोक रोगांनी पछाडलेले असतील आणि पृथ्वीची, साऱ्या सृष्टीची विनाशाकडे वाटचाल होईल.

सूर्य हा तर सृष्टीचा निर्माणकर्ता. त्याच्यामुळेच दिवस-रात्र होते. ऋतू होतात. तो सर्वांचा जीवनदाता आहे. सारी सृष्टी सुरळीतपणे चालण्यासाठी सूर्य दररोज नेमाने उगवलाच पाहिजे.

एवढेच कशाला? सूर्य नसला, तर वनस्पती कर्बग्रहणाची क्रिया करू शकणार नाहीत. म्हणजे वनस्पती नसतील. मग आपल्याला अन्न कुठून मिळेल? सूर्य नसला, तर ढग नसतील. पाऊस नसेल. आपल्याला पाणी मिळणार नाही. मग आपण जगणार कसे? खरे म्हणजे सूर्य नसेल, तर पृथ्वी निर्जीव होईल. बाप रे! छे, छे! सूर्य हवाच! तो उगवलाच पाहिजे!

सूर्य उगवला नाही तर या विषयावर निबंध लिहा – Surya Ugavala Nahi Tar Essay in Marathi

ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धीयो योः नः प्रचोदयात्

हा आहे आपल्या प्राचीन वेदातील गायत्री मंत्र. ह्या मंत्रातून सूर्याला वंदन केले गेले आहे. सूर्य आपणा सर्वांना शक्ती देतो, जीवनरस देतो. मग हा असा सूर्यच जर नसेल तर होईल काय? त्यामुळे केवढा हलकल्लोळ माजेल ह्याची कल्पनाही आपण करू शकत नाही.

जर सूर्य उगवलाच नाही तर झाडांना स्वतःचे अन्न बनवता येणार नाही. कारण झाडे त्यांच्यातील हरितद्रव्य, पाणी आणि सूर्यप्रकाश ह्यांच्या सहाय्याने अन्न तयार करतात. अन्न तयार करता न आल्याने झाडे आणि वनस्पती मरून जातील. अन्न बनवण्याच्या क्रियेत त्या कार्बन डाय ऑक्साईड घेऊन ऑक्सिजन बाहेर सोडतात. त्यामुळे हवा आपोआप शुद्ध होते. तेही त्यामुळे होणार नाही. वनस्पती मेल्या की त्यांच्यावर अवलंबून असणारे तृणभक्षक पशू कीटक आणि पक्षी मरतील. तृणभक्षक पशृंवर अवलंबून असणा-या वाघसिंहादि प्राण्यांनाही त्यामुळे अन्न मिळणार नाही. अशा त-हेने सूर्यचजर उगवला नाही तर ह्या पृथ्वीवरची जीवसृष्टीच नाहीशी होईल.

सूर्यच जर उगवला नाही तर आम्ही अंधारात शाळेत कसे जायचे? अंधारात अभ्यास कसा करायचा? दिवसरात्र झोपून थोडेच राहाणार? सारखे दिवे लावून पृथ्वीवरील उर्जासाठेच संपतील तेव्हा तर आम्ही दिवेसुद्धा लावू शकणार नाही. सूर्य नसेल तर उर्जा नाही, उर्जा नाही तर यंत्रे नाहीत. मग मानव अगदी आदिमानवाच्या काळात जाईल आणि शेवटी ह्या पृथ्वीवरून नाहीसाच होईल.

मुख्य म्हणजे सूर्याच्या उन्हामुळे समुद्रातील पाणी गरम होऊन आकाशात जाते. तेच पाणी पुन्हा पावसाच्या रूपाने परत जमिनीवर येते. जर सूर्यच उगवला नाही तर हे पाणी वाफ होऊन आकाशात जाईल कसे? त्यामुळे अर्थातच पाऊसही पडणार नाही.

एकुण काय की सूर्य हा तारा आपल्या पृथ्वीचा जीवनस्त्रोत आहे. तो जर उगवला नाही तर आपला विनाश अटळ आहे ही अगदी काळ्या दगडावरची रेघच समजली पाहिजे.

सूर्य उगवला नाही तर मराठी मधे निबंध – Surya Ugavala Nahi Tar Composition in Marathi

‘राजू, ऊठ लवकर. शाळेत नाही जायच का?’ आईने नेहमीप्रमाणे उठवायला सुरुवात केली.

‘होय ग, उठतो पाच मिनीटांत’ म्हणत मी परत पांघरुण ओढले. माझ्या मनात आले काय ही रोज सकाळी शाळेची कटकट आहे. त्याऐवजी सूर्य उगवलाच नाही तर? काय हरकत आहे? डॉक्टर संपावर जाऊ शकतात, कामगार संपावर जाऊ शकतात मग सूर्य संपावर गेला तर काय बिघडले?

काय मज्जा येईल नाही? रोज सकाळी आई उठवणार नाही. शाळेत जायला लागणार नाही. शाळा नाही म्हणजे परिक्षा नाही आणि परिक्षा नाहीत म्हणजे निबंध लेखनही नाही. दिवसभर, नव्हे रात्रभर गादीत लोळायला मिळेल. खेळायला मिळेल. उन्हाळ्यात उकाड्याने जीव हैराण होणार नाही. आपले सगळयांचे वेळापत्रक कोलमडेल. अरे! पण सूर्यच नसला तर पाऊस तरी कसा पडेल? कारण उष्णता नसल्याने पाण्याची वाफ होणारच नाही. झाडे आपले अन्न तयार करु शकणार नाही. मग आपल्याला अन्न कसे मिळेल? फळ नाहीत, धान्य नाही तर मग आपण खाणार काय? पृथ्वीचे तापमान एकदम खाली येईल. प्राणवायू मिळणार नाही. सौर उर्जेवर चालणाऱ्या चुली, यंत्रांचा उपयोग करता येणार नाही.

पृथ्वीवर नेहमीच अंधार असेल. प्रकाशासाठी आपल्याला कायम लाइट, बल्ब लावावे लागतील. मग इलेक्ट्रिसीटीचे बिल किती वाढेल! चोरांची तर मज्जाच होईल. काम व्यवसायानिमित्त लोक बाहेर कसे पडतील? काम नसल्यामुळे आपण आळशी होऊ. सूर्य नाही म्हणजे चंद्र नाही की चांदण्या नाही. मग चांदण्या रात्रीची, कोजागिरी पोर्णिमेची मजा कशी लुटणार? म्हणजे आपले जीवन अगदी निरुत्साही. निरस बनेल. नुसता विचार करुनही ‘माझा थरकाप उडाला.

आपण सूर्याला देव का मानत आलो आहोत हे लक्षात आले. अशा या सूर्यदेवाने संपावर जाण्याचा विचारही करु नये म्हणून मी त्याचीच प्रार्थना करु लागलो.

सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी – Surya Ugavla Nahi Tar Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply