साथीचे आजार माहिती मराठी निबंध – Sathiche Aajar Nibandh Marathi

माणसांच्या जीवनात वेगवेगळी संकटे येतात. त्यांतील एक आहे- ‘रोगांच्या साथी” म्हणजेच साथीचे आजार. अनेक रोगांच्या साथी ओढवतात आणि त्यांत माणसांना प्राण गमवावे लागतात.

कॉलरा, प्लेग, हिवताप, फ्ल्यू, चिकनगुनिया यांसारखे आजार प्राण घेतात, तर गोवर, कांजिण्या, डांग्या खोकला असे आजार मुलांना दुबळे करतात. एके काळी देवीची साथ येत असे आणि माणसांना विद्रूप करून जात असे. आता आपण या आजारावर मात केली आहे.

या अशा साथींना अनेक वेळा माणूसच जबाबदार असतो. अस्वच्छ राहणी, जलप्रदूषणवायुप्रदूषण यांच्यामुळे अनेक रोगांच्या साथी पसरतात. संशोधनामुळे आता अनेक आजारांवर आपण प्रतिबंधक लस, औषधे शोधून काढली आहेत. हल्ली लहान बाळांना अनेक प्रतिबंधक औषधे देऊन अशा प्राणघातक रोगांपासून वाचवले जाते.

माणसाने आपली राहणी सुधारून या रोगांना व त्यांच्या साथींना आपल्या जीवनातून हद्दपार केले पाहिजे.

साथीचे आजार माहिती मराठी निबंध – sathiche aajar in marathi

पुढे वाचा:

Leave a Reply