Set 1: विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध – Vigyan Shap Ki Vardan Nibandh

आज विज्ञानयुगात माणूस आपली बहुतेक कामे यंत्राच्या साहाय्याने करतो आहे; पण त्यामुळे कष्ट करण्याची, परिश्रम करण्याची त्याची सवय कमी झाली आहे. परिणामी आज या ऐदी माणसाचे वजन वाढते. मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार वाढत्या प्रमाणात होताना आढळतात. अशा वेळी प्रश्न पडतो की, विज्ञान – शाप की वरदान?

वेग वाढला विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने अनेक वाहने निर्माण करून जीवन अधिक गतिमान बनवले. जळी, स्थळी आणि आकाशी तो सर्वत्र सहजतेने संचार करू लागला. तसे अपघाताचे प्रमाणही वाढले. पण त्याचबरोबर प्रदूषणाचे संकट ओढवले. या वाहनांतील इंधनामुळे हवा दूषित होत आहे. ध्वनिवर्धकांमुळे ध्वनिप्रदूषण होते व कारखान्यांतील दूषित द्रव्ये नदयांमध्ये सोडण्याने जलप्रदूषणही होत आहे. विदेशात अनेक ठिकाणी या सर्व प्रदूषणांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

विज्ञानाच्या साहाय्याने अनेक रोगप्रतिबंधक औषधे निर्माण करून अनेक आजारांवर मात केली आहे. पूर्वी अवघड वाटणारी कोणतीही शस्त्रक्रिया, आज विज्ञानाच्या मदतीने शल्यविशारद सहजपणे करतात. ‘अवयवांचे आरोपण’ केले जाते. पण यामुळे मानव सुखी झाला आहे का? .

विज्ञानाने मानवाची शक्ती वाढवली, ऐश्वर्य वाढवले; पण बुद्धिमान माणसाने विज्ञानाचा वापर विधायक कामांपेक्षाही विध्वंसक कामांसाठी केला आहे.

अणुविज्ञानाने अनेक भयानक रोगांवर मात केली, पण अणुबॉम्बच्या निमित्ताने लक्षावधी निरपराध जीवांचा बळीही घेतला आहे. विज्ञान-शाप की वरदान? हा प्रश्न खरे तर कुणीही विचारूच नये; कारण विज्ञान हे एक साधन आहे, त्याचा वापर कसा करावा, यावरून ते शाप आहे की वरदान आहे हे ठरणार आहे. अन्न शिजवण्यासाठी मदत करणारा अग्नी हे वरदान आहे, तर अनेक झोपडपट्ट्या भस्मसात करणारा अग्नी हा शाप आहे.

Set 2: विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध – Vigyan Shap Ki Vardan Nibandh

आपले जीवन आदिमानवाच्या काळात केवढे खडतर होते. त्याला अन्नपाण्याच्या मूलभूत गरजांसाठी सतत जंगलात भटकावे लागत होते. तेव्हा तर माणूस फार काळ जगतही नसे. परंतु आजच्या काळात आपले जीवन किती चांगले झाले आहे. आयुर्मर्यादाही वाढली आहे. ही सर्व विज्ञानाचीच तर देणगी आहे. परंतु ह्या देणगीचा वापर चांगल्यासाठी करायचा की वाईटासाठी करायचा हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे.

देवाने माणसाला इतर पशुंच्या मानाने शारीरिक ताकद कमी दिली असली तरी मेंदू मात्र अगदी तल्लख दिला आहे. त्या बळावर माणसाने नवेनवे शोध लावले आणि आपल्या परिसरावर विजय मिळवला. सुरूवातीला मानव भटक्या अवस्थेत होता. अन्नपाण्याच्या शोधार्थ त्याला जागोजागी भटकावे लागत होते. जंगलातले हिंस्त्र प्राणी आणि विषारी कीटक ह्यांचे भय होते. परंतु हळूहळू त्याने अग्नीचा शोध लावला, चाकाचा शोध लावला. दगडापासून हत्यारे बनवली. थोड्याच काळात त्याने शेतीचाही शोध लावला. शेतीचा शोध लावल्यामुळे माणूस एका जागी, मुख्यत्वेकरून नद्यांच्या काठावर स्थिर झाला. नद्यांच्या काठांवरची जमीन सुपीक होतीच शिवाय पाणीही सहजगत्या उपलब्ध होते. त्यामुळे तिथे मोठमोठ्या संस्कृती उदयाला आल्या. आज आपण पाहिले तर सिंधू, गंगा, नाईल इत्यादी नद्यांच्या काठावर जगातील

पुरातन संस्कृती उदयाला आल्या आहेत. माणसाच्या जीवनाला स्थिरता आल्यावर त्याच्या मनातील कुतुहल आणि उत्सुकता आणखीनच जागृत झाली. मग त्याने वाफेच्या इंजिनांचा शोध लावला, यंत्रांचा शोध लावला. ग्रहता-यांवर काय आहे, ह्या सृष्टीचे रहा काय आहे ह्याचा शोध लावला. हे सगळे करण्यासाठी विज्ञानच त्याच्या मदतीला आले. विज्ञानामुळेच माणसाने रेडियो, टीव्ही, मोबाईल, इंटरनेट आणि संगणक इत्यादी वस्तूंचा शोध लावला. विज्ञानामुळेच माणसाने वेगवेगळ्या रोगांवरील उपचार शोधून काढले. त्यामुळे माणसाची आयुर्मर्यादा वाढली. म्हणूनच विज्ञान हे आपल्याला वरदान आहे असे वाटते आणि ते तसे आहे ही.

मात्र काही लोक विज्ञानाला शाप समजतात. कारण विज्ञानाने बॉम्ब शोधला, आरडीएक्स शोधले, अणूबॉम्ब शोधला. विनाशकारी तोफा, रणगाडे, युद्धनौका ह्यासुद्धा विज्ञानाचीच देणगी आहे. विज्ञानामुळे यंत्रे आली, चंगळवादासाठी भरपूर वस्तू विज्ञानाने निर्माण केल्या. विज्ञानाने प्लास्टिकचा शोध लावला. विज्ञानामुळे माणूस आळशी झाला. त्याला आयते बसून खाण्याची सवय लागली. प्रदूषणाची समस्या विज्ञानानेच वाढवली म्हणून विज्ञान हे शाप आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे.

मला स्वतःला वाटते की विज्ञान हे वरदानच आहे. आता त्याचा वापर चांगल्यासाठी करायचा की वाईटासाठी करायचा हे मानवानेच ठरवायचे आहे. इंटरनेटचा उपयोग त्वरित संपर्क साधण्यासाठी संकटात सापडलेला माणूस करू शकतो आणि त्याचा वापर दहशतवादीही आपले विचार दूरदूरच्या लोकांपर्यंत पोचवण्यासाठी करू शकतात.

शेवटी सगळे आपल्यावरच अवलंबून असल्याने विज्ञानाला दोष देण्यात किंवा विज्ञानाच्या नावाने खडे फोडण्यात काहीच अर्थ नाही. विज्ञान हे वरदानच आहे.

Set 3: विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध – Vigyan Shap Ki Vardan Nibandh

देवाने माणसाला इतर पशुंच्या मानाने शारीरिक ताकद कमी दिली असली तरी मेंदू मात्र अगदी तल्लख दिला आहे. त्या बळावर माणसाने नवेनवे शोध लावले आणि आपल्या परिसरातील निसर्गावर विजय मिळवला. सुरूवातीला मानव भटक्या अवस्थेत होता. अन्नपाण्याच्या शोधार्थ त्याला जागोजागी भटकावे लागत होते. जंगलातले हिंस्त्र प्राणी आणि विषारी कीटक ह्यांचे भय होते. परंतु हळूहळू त्याने अग्नीचा शोध लावला, चाकाचा शोध लावला. दगडापासून हत्यारे बनवली. थोड्याच काळात त्याने शेतीचाही शोध लावला. शेतीचा शोध लावल्यामुळे माणूस एका जागी मुख्यत्वेकरून नद्यांच्या काठावर स्थिर झाला. नद्यांच्या काठांवरची जमीन सुपीक होतीच शिवाय पाणीही सहजगत्या उपलब्ध होते.

त्यामुळे तिथे मोठमोठ्या संस्कृती उदयाला आल्या. आज आपण पाहिले तर सिंधू, गंगा, नाईल इत्यादी नद्यांच्या काठावर जगातील पुरातन संस्कृती उदयाला आल्या आहेत. माणसाच्या जीवनाला स्थिरता आल्यावर त्याच्या मनातील कुतुहल आणि उत्सुकता आणखीनच जागृत झाली. मग त्याने वाफेच्या इंजिनांचा शोध लावला, यंत्रांचा शोध लावला. ग्रहता-यांवर काय आहे, ह्या सृष्टीचे रहस्य काय आहे ह्याचा शोध लावला. हे सगळे करण्यासाठी विज्ञानच त्याच्या मदतीला आले. विज्ञानामुळेच माणसाने रेडियो, टीव्ही, मोबाईल, इंटरनेट आणि संगणक इत्यादी वस्तूंचा शोध लावला. विज्ञानामुळेच माणसाने वेगवेगळ्या रोगांवरील उपचार शोधले त्यामुळे माणसाची आयुर्मर्यादा वाढली. म्हणूनच विज्ञान हे आपल्याला वरदान आहे असे वाटते आणि ते तसे आहे ही.

मात्र काही लोक विज्ञानाला शाप समजतात. कारण विज्ञानाने बॉम्ब शोधला, आरडीएक्स शोधले, अणूबॉम्ब शोधला. विनाशकारी तोफा, रणगाडे, युद्धनौका ह्यासुद्धा विज्ञानाचीच देणगी आहे. विज्ञानामुळे यंत्रे आली, चंगळवादासाठी भरपूर वस्तू विज्ञानाने निर्माण केल्या. विज्ञानाने प्लास्टिकचा शोध लावला. विज्ञानामुळे माणूस आळशी झाला. त्याला आयते बसून खाण्याची सवय लागली. प्रदूषणाची समस्या विज्ञानानेच वाढवली म्हणून विज्ञान हे शाप आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे.

मला स्वतःला वाटते की विज्ञान हे वरदानच आहे. आता त्याचा वापर चांगल्यासाठी करायचा की वाईटासाठी करायचा हे मानवानेच ठरवायचे आहे. इंटरनेटचा उपयोग त्वरित् संपर्क साधण्यासाठी संकटात सापडलेला माणूस करू शकतो आणि त्याचा वापर धार्मिक दहशतवादीही आपले विचार दूरदूरच्या लोकांपर्यंत पोचवण्यासाठी करू शकतात.

शेवटी सगळे आपल्यावरच अवलंबून असल्याने विज्ञानाला दोष देण्यात किंवा विज्ञानाच्या नावाने खडे फोडण्यात काहीच अर्थ नाही. विज्ञान हे वरदानच आहे.

मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. ह्या जगात अस्तित्वात आला तेव्हापासूनच त्याला ब-याच गोष्टींचे आश्चर्य वाटायचे. म्हणजे रोज सकाळी सूर्य उगवतो. त्यापूर्वी पूर्व दिशेला लाल रंग येतो. त्या रंगालाच त्याने उषा असे नाव दिले होते. आकाशातील चंद्रचांदण्या, ऊनपाऊस, भूकंप, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, कळीचे उमलणे, कोकिळेचे ठराविक काळात होणारे कूजन आणि आंब्याला येणारा मोहर ह्या आणि अशासारख्या निसर्गात घडणा-या वेगवेगळ्या घटना तो पहात होता आणि त्या त्या काळातील आपल्या ज्ञानाप्रमाणे त्या गोष्टींचा अर्थ काय ते समजून घेत होता.

ज्या गोष्टी त्याला समजत नव्हत्या त्यामागे काहीतरी दैवी शक्ती आहे असे तो मानू लागला. जन्म आणि मृत्यू ह्या तर त्याला फारच अचंबित करणा-या गोष्टी होत्या. रात्रीच्या वेळेस अंधार पडला की रोजच्याच झाडांचे आकार अक्राळविक्राळ भासू लागतात. त्यातूनच भूत ह्या कल्पनेचा उगम झाला. ह्या सगळ्या मागे माणसाचे मन आणि त्याची अद्भूत कल्पनाशक्तीच होती.

ह्या त्याच्या कल्पनाशक्तीतूनच त्याने अनेक अंधश्रद्धांना जन्म दिला आहे. मांजर आडवे गेले की काम होत नाही, पाल चुकचुकली की ते असते, बाहेर जाणा-याला कुठे जातो असे विचारू नये, तसे विचारल्यास त्याचे काम होत नाही हे ह्या अंधश्रद्धांचे काही नमुने आहेत. मांजर वाटेने जाऊ अशुभ शकतेच ना, तिच्या वाटेत आपणही आडवे येतोच की. चुकचुकणे ही पालींची एकमेकींना संदेश देण्याची भाषा आहे. आपले अशुभ व्हावे म्हणून ती चुकचुकत नसते. पूर्वी देवी आल्या की मरीआईचा प्रकोप झाला असे मानत. प्लेगच्या आणि पटकीच्या साथीत भरपूर माणसे मरायची. त्यावेळेसही भगताला बोलावून उपचार केले जात. महारोग झाला की ते मागच्या जन्मीचे पाप आहे असे समजले जाई आणि त्या माणसाला वाळीत टाकले जाई. आता हे आजार कुठल्या विषाणूंमुळे होतात ते विज्ञानाने शोधून काढले आहे आणि त्यावरचे उपायही शोधून काढले आहेत. त्यामुळे कित्येकांचा जीवही वाचतो आहे.

एखादा माणूस वेड्यासारखे वागू लागला की त्याला भूत लागले आहे असे समजून मारहाण केली जाते. ते अगदी चुकीचे आहे. त्याऐवजी त्याला मानसोपचार तज्ञाकडे न्यायला हवे. गुप्त धन मिळवण्यासाठी लहान मुलाला बळी द्यावे अशासारख्या कित्येक अघोरी अंधश्रद्धाही समाजाच्या काही वर्गात अजूनही आहेत.

ह्या अंधश्रद्धांचा बीमोड झाला पाहिजे. माणसाने विज्ञानाची आणि प्रयत्नवादाची कास धरली पाहिजे. जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा केव्हातरी मरणार असतोच. त्यामुळे कुणाच्याही मरणातूनही भलतेसलते अर्थ काढू नयेत. आपले मन सक्षम करणे हेच सर्वात महत्वाचे असते हे लक्षात ठेवावे आणि अंधश्रद्धांच्या जळमटांची त्यातून हकालपट्टी करावी हेच.

Set 4: विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध – Vigyan Shap Ki Vardan Nibandh

आपण नेहमी आपल्यासभोवती पाहिले तर दिसते की आपले जीवन शास्त्र आणि शास्त्रीय उपकरणांनी व्यापून गेले आहे, गुरफटून गेले आहे. दिवसातून कितीतरी नवीन उपकरणांचा शोध लागत आहे. त्यामुळे विज्ञान व शोध यांचा अतुट संबंध आहे. मनुष्यजीवन आळशी व सुखमय झाले आहे. आपणास पक्ष्यांप्रमाणे पंख नाहीत, तरीही विमानातून आपण पक्ष्यांसारखे उडू शकतो, माशाप्रमाणे पाण्यामधून पोहायला पर नाहीत, तरीही जहाज व पाणबुडीने पाण्यावर व पाण्याखाली महिनोंमहिने राहू शकतो. हरणाप्रमाणे वेगाने धावता येत नाही पण आगगाडीने कितीतरी वेगाने धावू शकतो. विज्ञानाने ही सर्व किमया साधली आहे. आज विज्ञान मानवाच्या जीवनातील महत्त्वपूर्ण अंग बनले आहे.

जगाच्या कानाकोपऱ्यातील बातम्या, क्रिकेट आपण घरात बसून पाहू , ऐकू शकतो. जगातील कोणतीही माहिती इंटरनेटद्वारे काढू शकतो. असाध्य ते साध्य करण्याची जादू फक्त विज्ञानच करु शकते म्हणूनच विज्ञान आणि वैज्ञानिक आजच्या युगातील किमयागार आहेत.

दुरदर्शन पाहण्याचे तंत्रविज्ञान तसेच काम करता करता रेडिओवरुन हवे ते ऐकण्याचे तंत्रज्ञान, टेपरेकॉर्डरवर तर आपला आवाजही पुन:प्रसारित होतो. रेलिफोनने तर विज्ञानाच्या उच्चतेचा कळस गाठला आहे. पत्र लिहिण्यासारखे रटाळ काम टेलिफोन, मोबाईलमुळे सुसह्य झाले आहे. शिवाय आपल्या आवडत्या व्यक्तिचा आवाजदेखील ऐकायला मिळतो त्यामुळे आजच्या युगाचा खरा मित्र विज्ञानच आहे. आजची पिढी पूर्वीच्या पिढीपेक्षा अधिक तल्लख व बुद्धिवान आहे. त्यांच्या बुद्धीला चालना व संधी देण्याची विज्ञानाची मोलाची कामगिरी आहे.

मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे. त्यामुळे निरनिराळ्या कला व विद्यांत पारंगत आहे. निरनिराळ्या दुर्धर अशा रोगांवर देखील औषधे निघाली आहेत त्यामुळे मृत्यूदरही घटला आहे. बालमृत्यूला आळा घातला गेला. कोणत्याही असाध्य रोगांवर रामबाण औषधे निघाली परंतु त्याचा तोटा म्हणजे अफाट लोकसंख्येची वाढ. ती रोकण्यासाठी पुन्हा सोयीसुविधा कराव्या लागतात.

निरनिराळी संकरित बी-बियाणे वापरुन शेतीचे तंत्रज्ञान सुधारले आहे. त्यामुळे तीन महिन्यात एक पीकप्रमाणे वर्षाला चार पिके घेता येतात व अन्नधान्य व शेती उत्पादनात वाढकरता येते. अनधान्याची मुबलकता झाली परंतु वर्षातुन अनेक पिके, रासायनिक खतांचा वापर यामुळे शेतजमीनी नापिक झाल्या, खारपुट्या झाल्या.

उत्पादनवाढीसाठी निरनिराळ्या उद्योगधंधांना चालना मिळाली त्यामुळे देश विकसित होण्याच्या मार्गावर आहे परंतु कारखान्यातून निघणारा धूर, धूळ, सांडपाणी यामुळे वायू प्रदूषण, जल प्रदूषण यासारख्या संकटांना तोंड दयावे लागते. वायूप्रदूषणामुळे श्वसन विकार, दमा सारख्या रोगांना व जल प्रदूषणामुळे गॅस्ट्रो, जुलाब यासारख्या रोगांना बळी पडावे लागते. घातक वायू व कण बाहेर पडून दुर्धर रोगांची शिकार व्हावी लागते व जलचर प्राण्यांचा मृत्यू ओढवतो त्यामुळे सांडपाणी व विषारी वायूंची योग्य विल्हेवाट लावणे मानवापुढे समस्या आहे.

पूर्वी लढाईसाठी ढाल वापरली जात असे पण विज्ञानयुगात अणुविज्ञानाने आपली करामत करुन दाखवली आहे. एका अणुबाँबने शहरे व राज्ये उध्वस्त होतात व जमीनी नापिक होतात. कितीतरी गावे एका क्षणात बेचिराख होतात त्याचे नामोनिशाणही मिळणार नाही. त्यामुळे प्रगतीच्या व संशोधना च्या दृष्टीने विज्ञान सुखमय वरदान आहे पण अधोगतीच्या दृष्टीने जीवसृष्टीला घातक शापच आहे.

विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध – Vigyan Shap Ki Vardan Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply