आजची मराठी रंगभूमी वास्तवदर्शी आहे का ?

शेक्सपीअरने असं म्हटलं आहे, “जग ही एक रंगभूमी आहे आणि आपण सर्वजण या रंगभूमीवर वावरणारी पात्रं आहोत.” आपल्या जीवनात, आपल्या समाजात जे काही घडतं, त्या सर्वांचं प्रतिबिंब आपल्याला नाटकातून दिसत असतं. आजची मराठी रंगभूमी वास्तवदर्शी आहे का? या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी पूर्वीच्या मराठी रंगभूमीविषयीही सांगितले पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ च्या बंडावर एक नाटक लिहिलं, त्या नाटकाचा ब्रिटनमध्ये एक प्रयोग झाला. त्या नाटकात ब्रिटिशांनी भारतीय जनतेवर केलेल्या छळाचं, इतकं हुबेहुब चित्रण होतं की ब्रिटिशांनी त्यावर बंदी आणली म्हणजेच ते नाटक वास्तव होतं. त्यावेळी नाटकाचा प्रमुख उद्देश जनजागृती असे. ‘संगीत शारदा’ या नाटकाने बालविवाहाच्या रूढीवर कडाडून टीका केली. पुढे काळ बदलला, लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या आणि संगीतप्रधान, पौराणिक, ऐतिहासिक नाटकांची जागा वेगवेगळ्या विषयांवरील नाटकांनी घेतली.

आजच्या मराठी रंगभूमीवर वेगवेगळ्या समस्या मांडल्या जात आहेत. तरूणांपासून ते वृद्धांपर्यंतचे प्रश्न मांडले जात आहेत. एखादा मुलगा जेव्हा १० वी पास होऊन ११ वीत जातो आणि कॉलेजच्या बंधनमुक्त जीवनात प्रवेश करतो, तेव्हा त्याचा पाय घसरण्याची शक्यता असते. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर वेगळ्याच वाटेला गेलेल्या, भन्नाट जीवनाचे आकर्षण असलेल्या मुलाची कथा ‘आम्ही जगतो बेफाम’ या नाटकात डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मांडली आहे. नातवाला सुधारण्यासाठी आजीने निवडलेला वेगळा मार्ग नाटकाला एक वेगळं वळण देतो. या नाटकात मंगेश पाडगावकरांच्या ‘बोलगाणी’ चा केलेला वापर नाटकाला अधिक वास्तव करतो.

एखादी मुलगी जेव्हा वयात येते, तेव्हा तिच्या मनात प्रेमाची भावना निर्माण होते. पण तिला समाजातील लोकांच्या वाईट नजरांशीही सामना करावा लागतो. वारंवार येणारे ब्लँक कॉल्स तिला घाबरवून सोडतात. अशा भावनांचे चित्रण नुकतच. रंगभूमीवर आलेले हे वयच असं असतं’ या नाटकात केलं आहे. स्त्रीला तिच्या स्त्रीत्वामुळे भेडसावणाऱ्या समस्यावर अनेक नाटकांनी प्रकाश टाकला आहे. पर्याय’, ‘पुरूष’, ‘लग्न’, ‘काचेचा चंद्र’ ही नाटके प्राधान्याने प्रातिनिधीक ठरतील.

कुटुंबाचा प्रश्न हाताळणारे नाटक याचं उत्तम उदाहरण दयायचं झालं तर, असेच आम्ही सारे’, ‘घरोघरी’ या नाटकांविषयी सांगता येईल. बऱ्याचशा पालकांच्या आपल्या मुलाकडून खूप अपेक्षा असतात. आपल्या मुलानं मेरिटला यावं असंही बऱ्याच पालकांना वाटतं. घरोघरी’ या नाटकातील आईचीही आपल्या मुलानं मेरिटला यावे हीच अपेक्षा आहे. तो बारावी शास्त्र शाखेला असल्याने त्यानं फक्त अभ्यासच करावा, असं आईला वाटतं. समाजातील बऱ्याचशा आईवडिलांची मनोवृत्ती यातून दिसते. चार-पाच मार्काचा पेपर राहिल्याने आपली मेरिट लिस्ट जाणार आणि त्यामुळे उत्तम गुण असूनही आपल्याला बी.एस्सी. ला प्रवेश घ्यावा लागणार, असं वाटल्याने मी शेवटचा पेपर देणार नाही, असं घरोघरी’ नाटकातील मुलगा जेव्हा आईला सांगतो, तेव्हा आई त्याला मारते. त्यामुळे तो मनाने दुखावतो आणि मनोरूग्ण होतो. यातून आजच्या युगातील स्पर्धांचं दर्शन तर घडतचं, त्याचप्रमाणे मुलं मोठी झाल्यावर त्यांच्यावर हात उगारला, तर ती मनानं दुखावली जातात, या वास्तवाचे दर्शनही ‘घरोघरी’ नाटकातून घडतं.

आज आपल्या समाजात बऱ्याचशा स्त्रिया करिअर करण्याचे मूळ उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवतात. करिअर करण्याच्या प्रयत्नांमध्ये त्या आपल्या संसाराकडे, आपल्या मुलाबाळांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे मुलं सुद्धा आईला दुरावतात. तसचं आपल्या पत्नीला समाजात आपल्यापेक्षा जास्त मान मिळत असल्याने नवऱ्याचा अहंकार दुखावतो आणि त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. या भावनांचं चित्रण करण्यात ‘आईचं घर उन्हाचं’ हे नाटक यशस्वी झालं आहे.

नाटकात मांडली गेलेली समस्याच नुसती वास्तव असून चालत नाही, तर नाटकाचे संवाद, नेपथ्य, रंगभूषा, संगीत, वेशभूषाही वास्तव असावी लागते, यावर्षी रंगभूमीवर आलेल्या मंत्रमुग्ध’ नाटकाने स्युडो प्रेग्रन्सीचा वेगळा वास्तव विषय मांडला. तर डॉक्टर तुम्हीसुद्धा’ या नाटकाने मेडिकल क्षेत्रातील भ्रष्टाचार लाकांसमोर आणला. तर ‘संध्याछाया’, ‘नटसम्राट’, ‘कालचक्र’ ने वृद्धांचे प्रश्न हाताळले. पूर्वी बंगाली रंगभूमी श्रेष्ठ समजली जात असे. पण हल्लीच्या रंगभूमीवर इतक्या विषयांवरची नाटके आली आहेत, की मराठी रंगभूमी ही आज दोन पावलं पुढेच गेली आहे असे म्हणावेसे वाटते. ,

आजच्या मराठी रंगभूमीचे प्रायोगिक व व्यावसायिक असे दोन प्रकार पडतात.

पुढे वाचा:

Leave a Reply