कुंभार मराठी निबंध – Kumbhar Marathi Nibandh
मातीचे भांडे किंवा पात्र आपण सर्वांनी पाहिले आहेत. मटके, घागरी, दिवे, पणत्या, आदींचा आपण दैनंदिन जीवनात उपयोग करीत असतो. ही भांडी स्वस्त तर असतातच, सोबतच आरोग्यासाठी देखील खूप चांगले असतात. त्यात भोजन करणे, ठेवणे आणि खाणे,
सगळेच प्रकार फायद्याचे आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात माठ किंवा रांजणातील पाणि माणूस आवडीने पितो. त्याच्यासारखी दुसरी मजा नाही. परंतु ही सगळी भांडी बनवतो कोण? तुम्ही म्हणाल की ही काय विचारायची गोष्ट आहे? बरोबर बोलतात! कुंभार ती बनवतो आणि सगळे जण कुंभाराला ओळखतात.
कुंभाराकडे एक मोठे फिरते चाक असते आणि खूप सारा मऊ मातीचा चिखल. ती मळून बारीक केलेली असते. ही माती एखाद्या तलाव, डबके, किंवा खदाणीतून काढलेली असते. कुंभार तिला चाळतो, मळतो आणि मऊ बनवतो. नंतर फिरत्या चाकावर ठेवून पाहिजे तसा आकार देतो. तो त्या चाकाला एका काठीच्या साह्याने फिरवून आपलेकार्य पूर्ण करतो. त्याचे निष्णात हात मातीला कोणता पण आकार देवू शकतात. एका कुंभाराच्या चाकाजवळ बसून मातीला आकार देण्याचं कार्य पहाणे, खरोखरच आनंददायक गोष्ट आहे.
परंतु आजच्या काळात हा अनुभव फारच कमी लोकांना मिळतो. कच्चा भांड्यांना प्रथम उन्हात वाळवले जाते, नंतर त्यांच्यावर योग्य असा लेप लावला जातो. नक्षीकाम देखील केले जाते किंवा रंगवले जातं आणि शेवटी भट्टी किंवा त्यालाच आवा असे म्हटले जाते, त्यात भाजून काढले जाते. या सर्व कामात मोठ्या धैर्याची आणि कौशल्याची गरज असते. इतक्या परिश्रमानंतरही कुंभाराला त्या भांड्याची जी किंमत मिळते ती अतिशय कमी असते. म्हणूनच त्यांचं जीवन अगदीच दयनीय असे असते.
पुढे वाचा:
- एका मंदिराचे वर्णन मराठी निबंध
- कर्म हीच पूजा मराठी निबंध
- आमचे बालवीर शिबिर निबंध मराठी
- हॉकी वर मराठी निबंध
- हे विश्वची माझे घर निबंध
- हुंडाबळी स्त्रीचे आत्मवृत्त मराठी
- हुंडा एक सामाजिक समस्या
- हिरवी संपत्ती मराठी निबंध
- स्वावलंबन मराठी निबंध
- स्वामी दयानंद सरस्वती निबंध मराठी माहिती
- स्वातंत्र्यानंतरचा भारत मराठी निबंध
- स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी
- स्वच्छता तेथे प्रगती मराठी निबंध