“आपली व्यथा दुसऱ्याला न सांगता दुसऱ्याची व्यथा दूर करण्याचा प्रयत्न करावा”

मनुष्य एक समाजशील प्राणी आहे. सुख सोयींच्या ऐहिक धावपळीत तो मागे राहू इच्छित नाही. या आंधळ्या धावण्याच्या शर्यतीत त्याला सगळ्यांच्या पुढे जायचे आहे. जगात भौतिक वस्तू अमर्याद आहेत. त्या प्राप्त करण्याची लालसा मानवात सदैव विद्यमान असते. इच्छित वस्तू प्राप्त झाली की तो प्रसन्न होतो व न मिळाली की दु:खी होतो. आज प्रत्येक मनुष्य असमाधानी दिसतो. आणि स्वत:ला दु:खी समजतो. स्वार्थी मनुष्य केवळ आपलेच रडगाणे गात राहतो. दुसऱ्यांचे दु:ख त्याला समजत नाही व समजून घेण्याची इच्छाही नसते. ही वृत्ती चांगली नाही. दुसऱ्याची पीडा दूर करणे हीच मानवता व हाच सर्वात मोठा धर्म आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीने सदैव “बहुजन हिताय” चा उपदेश केला. नि:स्वार्थ भावाने दुसऱ्याचे भले करणे हा परोपकार आहे. मनुष्याने आपल्या शारीरिक व मानसिक पीडेचा गवगवा लोकांमध्ये करू नये. ज्यामुळे त्यास लोकांची सहानुभूती मिळेल, उलट दुसऱ्यांच्या कष्टांना जाणून ते क्रमाने नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

‘आपली व्यथा ऐकवू नका’ कारण काही लोक तुमची व्यथा ऐकून घेतील पण ती दूर करण्याचा प्रयत्न करणार नाहीत जर व्यथा ऐकून ऐकून वैतागून गेला तर मग टिंगल करू लागतील आणि प्रत्येक गोष्ट उपहासाने उडवून लावील. दुसऱ्यासमोर तो हास्यास्पद बनेल. परंतु समोरच्या व्यक्तीच्या हृदयात व्यथा ऐकूनही करुणा उत्पन्न होणार नाही.

आपल्या मनातील वेदना दुसऱ्यासमोर व्यक्त करू नये. कारण दुसरे लोक त्याकडे उपहासाने पाहतात. दुःख कुणी वाटून घेऊ शकत नाही. कृष्णभक्त कवि जमाल म्हणतो आपल्या प्रियतमेसाठी तन, मन, यौवन सगळे काही अर्पण केले परंतु तिलासुद्धा माझी पीडा समजली नाही तर कुणाला सांगू? कवी सूरदास माणसाला आपली व्यथा दुसऱ्यांना न ऐकविता मौन राहण्याचा सल्ला देतात. ते म्हणतात या जगात असे कोण आहे ज्याला दुसऱ्याच्या वेदना समजतात? म्हणून दुसऱ्यांना आपले दुःख सांगण्यापेक्षा मौन पत्करलेले बरे.

सामान्यत्वेकरून असे दिसते की, जर तुमचे भाग्य प्रतिकूल असेल तर मित्र साथ सोडतात. शेक्सपियरच्या मते, “मनुष्य आपला दरवाजा मावळत्या सूर्याला पाहून बंद करून घेतो.” दिनकर यांच्या मते “अश्रू पुसणारा जगात विरळाच असतो. 1
आपली व्यथा दुसऱ्याला न सांगण्यामुळे दु:ख तर होते परंतु त्यानंतर जेव्हा सुखाचे आगमन होते तेव्हा ते मधुर होते. असे दिसते की मनुष्य मनुष्य दुसऱ्याला दु:खी पाहून प्रसन्न होतो आणि प्रसन्न पाहून दु:खी होतो. दुसऱ्याचे दु:ख दूर करणारे लोक विरळच असतात.

दुसऱ्याच्या दु:खात आपले दुःख पण दूर होते. जेव्हा मनुष्य दुसऱ्याचे भले करतो तेव्हा त्याचे भले आपोआपच होते. म. गांधी म्हणतात “खरा वैष्णव तोच असतो जो परक्याचे दु:ख जाणतो.” पण दु:ख दूर झाल्यावर मनांत अभिमान येऊ नये. अभिमान आत्मिक सुखाला नष्ट करतो. दुसऱ्याचे दु:ख दूर करणे म्हणजे परोपकार तोच खरा धर्म. दुसऱ्यांना दु:ख देण्यासारखे नीच काम नाही.

देवांचा त्रास दूर करण्यासाठी दधिची ऋषींनी आपल्या अस्थी दिल्या. शिबी राजाने शरण आलेल्या कबुतराच्या रक्षाणासाठी आपले मांस दिले. मानवाला सुखी करण्यासाठी वृक्ष फळे देतात, नद्या स्वच्छ पाणी देतात, पृथ्वी राहण्यासाठी जागा देते व खाण्यासाठी अन्न देते. सूर्य प्रकाश आणि चंद्र शीतलता देतो. वारे वादळ व्यक्तीला सहनशक्ती देतात व संकटात न घाबरण्यास सांगते. प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड दिले पाहिजे. निसर्गाप्रमाणेच पशू पक्षीही परोपकार करण्यात सदैव तत्पर असतात. ते तर मानवाला आपल्या शरीराचे मांससुद्धा देतात. मानव इतका स्वार्थी आहे की तो या मूक निसर्गापासून काहीकी शिकू शिकत नाही? अवश्य शिकू शकतो! जसे निसर्ग आणि पशु मानवाची निःस्वार्थीपणे सेवा करतात त्याचप्रमाणे मानवाने स्वार्थरहित होऊन दु:खी व्यक्तीला निष्काम भावाने मदत केली पाहिजे. स्वार्थ साधत राहण्यात मानवता नसून पशुता आहे.

आधुनिक युग विज्ञानाचे युग आहे. प्रत्येक मनुष्य भोगवादी होऊ लागला आहे. “सर्वे भवन्तु सुखिनः” सारखी विश्व कल्याणाची भावना नष्ट होऊ लागली आहे. प्रत्येक व्यक्ती जास्तीत जास्त सुख मिळवून आपल्यातच ‘मस्त’ राहू इच्छितो. दया, ममता, परोपकार, हे शब्द त्याला निरर्थक वाटतात. त्यामुळेच आपल्या जीवनात तणाव, अशांती असते. जर प्रत्येक व्यक्तीला फक्त स्वतःला सुख मिळावे असे वाटेल व दु:ख दुसऱ्यांना सोडेल तर सृष्टीचा विनाश होईल. ज्ञानी लोक दुसऱ्याच्या सुखात आनंद मानतात म्हणून मानवाने एकमेकांच्या सहकार्याने आनंदात राहावे.

पुढे वाचा:

Leave a Reply