बस्ती चे फायदे मराठी – Basti Kriya Information in Marathi

बस्ती चे फायदे मराठी, Basti Kriya Information in Marathi
बस्ती चे फायदे मराठी, Basti Kriya Information in Marathi

बस्ती क्रिया कृती

  1. बस्ती क्रिया करण्यासाठी आपली करंगळी मावेल अशी लांबीची बांबूची अथवा रबरी पोकळ नळी घ्यावी. त्या नळीचे एक टोक निमुळते करून त्यास व्हॅसलिन किंवा एरंडेल तेल लावून बुळबुळीत करावे म्हणजे नळीला गुदमार्गात प्रवेश होण्यास अडथळा होणार नाही.
  2. नदी किंवा तळ्यामध्ये कमरेइतक्या खोल पाण्यात ओणवे उभे राहून नळी चार बोटे गुदमार्गात सरकवावी. मग नौली क्रिया करावी म्हणजे आतड्यामध्ये ऋणदाब निर्माण होऊन पाणी नळीवाटे आपोआप आतड्यात जाते.
  3. भरपूर पाणी आत जाण्यासाठी मध्यनौली करून नळीच्या बाहेरील तोंड बोट ठेवून बंद करावे व पोट ढिले सोडून पुन्हा नळीवरचे बोट काढून मध्यनौली करावी म्हणजे नळीवाटे आणखी पाणी आत जाते. असे दोन तीन वेळा करून जरूर तेवढे पाणी आत गेल्यावर नळी बाहेर काढावी. मग पाण्याबाहेर येऊन नौलीचालन करावे.
  4. उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे अशी नौलीचालनाची वीस ते बावीसपर्यंत यथाशक्ती जलद आवर्तने करावीत. नौलीचालनानंतर थोड्या वेळात शौचाचा आवेग आल्यावर शौचाला जाऊन या. शौचाला गेल्यावर प्रथम स्वच्छ पाणी बाहेर येते. मग मलमिश्रित पाणी येते व शेवटी मळाचे खडे बाहेर पडून आतडी साफ होतात.
  5. शौचाला जाऊन आल्यावर मयुरासन करा म्हणजे आत राहिलेले पाणी पुन्हा शौचावाटे बाहेर पडेल. मयुरासन करताना पाय सरळ न ठेवता पायाखाली उंच विटेचे तुकडे घेऊन त्यावर बसा. दोन्ही पायात पाण्याने भरलेले भांडे ठेवून गुदमार्गातील नळीचे बाहेरील टोक पाण्यात बुडू द्या. मग नौली क्रिया करून वरीलप्रमाणेच सर्व किया करा.

बस्ती क्रिया करताना घ्यायची काळजी किंवा दक्षता

  1. ही क्रिया पूर्ण रिकाम्या पोटी करावी.
  2. या क्रियेसाठी पाणी स्वच्छ वापरावे. अस्वच्छ व गढूळ पाण्यात ही क्रिया करू नये.
  3. बांबूच्या नळीचे गुदमार्गात घालावयाचे टोक निमुळते व गुळगुळीत असावे. खरबडीत असू नये.

बस्ती क्रियेचे फायदे मराठी

  1. आतडी पूर्णपणे साफ होतात.
  2. आतड्यांचे स्नायू बळकट होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते.
  3. वात , पित्त व कफ दूर होतात.
  4. भूक लागते.
  5. मलबद्धता दूर होऊन मन प्रसन्न होते.
  6. वातबस्ती कोलायटिस (Colities) मध्ये फायदेशीर असते.

बस्ती क्रिया विडिओ 

अजून वाचा:

Leave a Reply