भाज्या आणि फळांचे महत्व निबंध मराठी
अन्न हा आपल्या जीवनाचा खूप महत्वाचा भाग आहे. अन्नच खाल्ले नाही तर काही काळाने माणूस मरूनही जाऊ शकतो. अन्नामुळे आपल्याला ताकद मिळते. धावणे, खेळणे, चालणे, नाचणे, उड्या मारणे ह्या सर्व शारीरिक क्रियांसाठी उर्जा लागते एवढेच नव्हे तर श्वास घेण्यासाठी, हृदयाची, मेंदूची आणि पचनसंस्थेची कार्ये चालण्यासाठीही आपल्याला उर्जा लागते. ही सर्व उर्जा आपल्याला अन्नातून मिळते.
“परंतु नुसते अन्न खाणे एवढेच महत्वाचे नसून आपण काय खातो हेदेखील तेवढेच महत्वाचे असते. आपल्याला अन्नातून कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ जसे हवे असतात तसेच जीवनसत्वे, क्षार आणि तंतुमय पदार्थही हवे असतात. हे सर्व घटक आपल्याला भाज्या आणि फळे ह्यांच्यातून मिळतात म्हणून आपल्या जेवणात त्यांचा समावेश असलाच पाहिजे.
अ, ब, क, ड आणि ई असे जीवनसत्वांचे प्रकार आहेत. अ जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा येतो. ब-१ ह्या जीवनसत्वाअभावी शरीर दुर्बळ होते, वजन कमी होते. ब-३ ह्या जीवनसत्वाच्या अभावी पेलेग्रा हा आजार होतो. क जीवनसत्वाच्या अभावी स्की हा हिरड्यांचा आजार होतो. ड जीवनसत्व आणि कॅल्शियमच्या अभावामुळे मुडदूस किंवा रिकेट्स हा आजार होतो. ह्या आजारात हाडे अगदी ठिसूळ होऊन पायांना बाक येतो.
हे सर्व आजार टाळायचे असतील तर सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळभाज्या आपल्या जेवणात हव्यात. पालेभाज्या, बीट, गाजर ह्यांच्यात अ जीवनसत्व आणि लोह असते.
मेथीमध्ये ई जीवनसत्व असते. टॉमेटो, लिंबू, आवळा आदि पदार्थांत क जीवनसत्व असते. त्याशिवाय फळांमध्ये कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम आदी शरीराच्या निकोप वाढीसाठी लागणारे क्षार असतात. शिवाय पचन चांगले व्हायला हवे असले तर तंतूयुक्त चोथा लागतो. हे सर्व आपल्याला भाज्या आणि फळे ह्यांच्या सेवनातून मिळते. म्हणून त्यांचा आपल्या आहारात अवश्य समावेश असायला हवा.
हल्ली बरेच लोक जीवनसत्वांच्या गोळ्या घेतात परंतु थेट अन्नातून पोटात गेलेली जीवनसत्वे आणि क्षारच अधिक कामी येतात.
असे आहे भाज्या आणि फळांचे महत्व.
पुढे वाचा:
- भाऊबीज निबंध मराठी
- भटक्या जमातीतील तरुणाची कैफियत
- भगवान गौतम बुद्ध निबंध मराठी
- बैल प्राणी निबंध मराठी
- बालमजुरी निबंध मराठी
- माझे बालपण निबंध मराठी
- बालदिन निबंध मराठी
- बाबा आमटे निबंध मराठी
- आचार्य भावे मराठी निबंध
- बाजारातील एक तास निबंध मराठी
- बाग निबंध मराठी
- मी पाहिलेले बसस्थानक निबंध मराठी
- बरे सत्य बोला यथातथ्य चाला
- फॅशन आणि विद्यार्थी भाषण मराठी
- फुलाचे मनोगत निबंध मराठी
- फुलपाखरू निबंध मराठी
- फाटक्या पुस्तकाचे मनोगत निबंध मराठी