बालमजुरी निबंध मराठी – Bal Majduri Nibandh Marathi

लहान मुलांना कामाला जुंपणे ह्यासारखे दुसरे मोठे दुष्कर्म नाही. ज्या वयात त्यांनी खेळावे, बागडावे,शाळेत जाऊन शिकावे त्या वयात त्यांना काम करायला लावायचे, त्यांचे बाळपण करपून टाकायचे ह्यापेक्षा दुसरा मोठा अपराध नाही.

आपल्या भारतात त्याचे भयंकर स्वरूप पाहावयास मिळते. गरीब, मागासलेल्या आणि शोषित वर्गातील मुलांना कुठलीही सामाजिक सुरक्षितता लाभत नाही. त्यांचे आईवडील त्यांना शिक्षण देण्यासाठी एवढेच नव्हे तर मोकळेपणाने खेळू देण्यासाठीही आर्थिकदृष्ट्या समर्थ नसतात. नाईलाजाने त्यांना गिरणीत, कारखान्यात, लोकांच्या घरी, शेतावर किंवा दुकानात काम करावे लागते. काम करण्याची काही ठिकाणे वाईट स्थितीत असतातच त्याशिवाय ती धोकादायकही असतात. विड्या, लोखंड, कापूस, गालिचे, आगपेट्या, फटाके इत्यादींच्या कारखान्यात ह्या बालमजुरांना कामाला लावले जाते. बांधकामावरही त्यांना गवंड्याच्या हाताखाली काम करावे लागते. घरगडी म्हणूनही कित्येक मुले काम करतात.

बालपणात कष्टाची कामे करावी लागल्यामुळे ह्या मुलांना शिक्षण घेता येत नाही. त्याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर वाईट परिणाम होतो.

१४ वर्षांखालील मुलांना ‘बाल’ समजले जाते. खरे तर राज्यघटनेने सर्वच मुलांना शिक्षणाचा अधिकार दिला आहे. लहान मुलेही आपल्या देशाची भावी संपत्ती आहे. म्हणून त्यांना योग्य पालनपोषण मिळाले पाहिजे, सामाजिक सुरक्षितता आणि चांगले जीवन मिळाले पाहिजे. सरकार, नेते, स्वयंसेवी संस्था, समाजसेवक, शिक्षक इत्यादी सर्वांनी एकत्र येऊन बालमजुरीविरूद्ध मोठी चळवळ उभारली पाहिजे. गरीबी, कुटुंबनियोजनाचा अभाव, अशिक्षितपणा आणि मागासलेपणा ही ह्या समस्येची मुख्य कारणे आहेत. जोपर्यंत ह्या कारणांच्या मुळांवर आपण घाव घालीत नाही तोवर बालमजुरीची समस्या सुटणार नाही.

आज बालमजुरी हा कायद्याने गुन्हा मानला गेला आहे. ‘ आमच्या आस्थापनात बालमजूर काम करीत नाहीत,’ असे जाहीर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. जर ह्या कायद्याचे उल्लंघन झाल्याचे समजले तर कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

बालमजुरी रोखण्यासाठी आज सरकारच्या बरोबरीने अनेक सेवाभावी संस्थाही ह्या क्षेत्रात काम करीत आहेत. परंतु बालमजुरी खरोखरच कमी व्हायला हवी असेल तर गरीबी कमी व्हायला हवी. सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले पाहिजे, ते आपण केले आहेच. रोजगाराच्या संधी वाढवणे, देशाचे वेगाने औद्योगीकरण करणे इत्यादी गोष्टी केल्याने आपण ही बालमजुरीची समस्या नक्कीच संपुष्टात आणू शकू ह्यात काहीच संशय नाही.

बालमजुरी निबंध मराठी – Bal Majduri Nibandh Marathi

बालमजुरी हा आपल्या समाजाला मिळालेला एक शाप आहे. आपल्या भारतात त्याचे भयावह रूप पाहावयास मिळते. गरीब मागासलेल्या आणि शोषित वर्गातील मुलांना कोणत्याही प्रकारची सामाजिक सुरक्षितता नसते. निरनिराळ्या प्रकारांनी त्यांचे शोषण उघडपणे आज होत आहे. त्यांचे आईवडील, नातेवाईक त्यांना शिक्षण देण्यास समर्थ कळेपणाने खेळू देण्यास! नाइलाजाने त्यांना मिलमध्ये, कारखान्यात, घरी, शेतमळ्यात, दुकानात काम करावे लागते. काम करण्याची ठिकाणे तर वाईट स्थितीत असतातच शिवाय धोकादायकही असतात. विडी, आगपेट्या, फटाके, गालिचे, कापूस,आहेत ना लोखंड इत्यादी च्या कारखान्यांत हे बालमजूर काम करताना दिसतात. बांधकामावर गवंड्याच्या हाताखाली काम करणे त्यांच्या नशिबातच लिहिलेले असते. घरगडी म्हणूनही ते काम करतात. या बालकामगार असणाऱ्या मुलामुलींची संख्या अंदाजे ७.१८ कोटी असेल. एका अनुमानानुसार केवळ १५% बालकामगार कायद्यांतर्गत येतात आणि उरलेले ८५% इकडे तिकडे मजुरी करीत फिरतात. कायदा असून बालकामगार असणाऱ्या कारखानादाराविरुद्ध जे त्यांचे शोषण करतात काहीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. भारतात आतापर्यंत असा कोणताही कायदा-नियम नाही जो मुलांचे शोषण थांबवून त्यांच्या अधिकारांचे रक्षण करेल.

भारतासह विविध अविकसित आणि विकासशील देशांमध्ये श्रमासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय नियमांचे बेधड़क उल्लंघन करणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. पाकिस्तानात इकबाल मसीहनामक युवकाला सगळ्यांसमोर यासाठी गोळी मारली की त्याने बालमजुरीविरुद्ध आवाज उठविला होता. १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले ‘बाल’ समजली जातात. आणि त्यांना ‘राइटस ऑफ द चाईल्ड’ १९९० अंतर्गत योग्य पालनपोषण व सामाजिक सुरक्षिततेचा व जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यांना मोफत प्राथमिक शिक्षण घेण्याचाही अधिकार आहे. आर्थिक शोषणाविरुद्ध दाद मागण्याचाही त्यांना अधिकार आहे. याखेरीज किती तरी अधिकार त्यांना आहेत पण ते सर्व कागदावरच प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होतच नाही. वास्तव स्थिती फार भयानक आहे. त्यांचे लैंगिक शोषण होत आहे. मुलींना वेश्यावृत्ती स्वीकारण्यास जबरदस्तीने तयार केले जाते. अंमली पदार्थांची तस्करी त्यांच्याकडून करवून घेतली जात आहे.

आज या गोष्टीची नितांत गरज आहे. आहे की सरकार, पुढारी, नेते, स्वयंसेवी संस्था, समाजसेवक, शिक्षक इत्यादी सर्वांनी एकत्र येऊन बालमजुरीविरुद्ध एक शक्तिशाली चळवळ उभी केली पाहिजे. जनजागरण करून त्यात जनतेचेही सहकार्य घेतले पाहिजे. गरिबी, अशिक्षितपणा, मागासलेपणा ही या समस्येची मूळ कारणे आहेत. जोपर्यंत ती नष्ट होणार नाहीत तोपर्यंत नालश्रमाची समाप्ती हे केवळ स्वप्नच राहील. गरीब लोक आपल्या मुलांच्या मजुरीच्या पैशांशिवाय उदरनिर्वाह करू शकत नाहीत. आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यासारखी त्यांची परिस्थिती नाही. त्यांना खेळण्याची संधीही ते देऊ शकत नाहीत. परिणामी या मुलांचे आरोग्य चांगले राहत नाही. ते रोगग्रस्त होतात. त्यातील काही रोग तर जीवघेणे असतात.

बालमजुरांकडून तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांवर बहिष्कार टाकणे हा एक उपाय होऊ शकतो. परंतु या मुलांना श्रम करू न देणे किंवा त्यांना कामावरून काढून टाकणे यामुळे स्थिती आणखी गंभीर बनू शकते. अशा स्थितीत ते पोट कसे भरतील? म्हणून प्रथम गरिबीच नष्ट केली पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्तीचे योग्य वितरण व्हावे आणि
कनिष्ठ दुर्बल वर्गाचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जावा. मुलांची आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता जपली पाहिजे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. त्यांच्या अधिकारांना व्यावहारिक रूप दिले गेले पाहिजे. परंतु या सर्व गोष्टी आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक समानता आणि औद्योगिक विकासाखेरीज शक्य नाहीत.

मुलांच्या शोषणाचे अनेक प्रकार आहेत. त्यांची चोरी करणे, पळवून नेणे, त्यांना अपंग बनवून भीक मागावयास लावणे, धोकादायक कारखान्यांत काम करावयास लावणे अशा कारखान्यांत ती जखमी होऊ शकतात, डोळे जातात. बालपण एकदाच मिळते त्याचे असे शोषण पाहिले की मनाचा थरकाप उडतो. परंतु सगळीकडे असहायताच दृष्टीस पडते. येथील खेड्यांमध्ये गरिबी वाढतच आहे. १९९०-९१ मध्ये ३६% लोक दारियरेषेखाली होते ते आता वाढून ४३-४४% झाले आहे.

गरिबीचे उन्मूलन आणि बालमजुरीचे निवारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. गरिबी दूर करण्यासाठी सर्व प्रथम प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले जावे. रोजगाराच्या संधी वाढविणे, वेगाने देशाचे औद्योगिकीकरण, कुटीर उद्योगांना प्रोत्साहन या गोष्टी लगेच अमलात आणल्याखेरीज बालमजुरी संपविणे शक्य नाही. जोपर्यंत सामान्य जनतेचे राहणीमान उंचावत नाही. त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत या समस्येवर उपाय सापडणार नाही. खेळणे, शिकणे,निरोगी राहणे हा मुलांचा मौलिक अधिकार आहे. भारतासारख्या लोककल्याणकारी राज्यात मुलांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाही आणि स्वातंत्र्याची चेष्टा करणे आहे.

बालमजुरीचे उन्मूलन ही एक गंभीर समस्या आहे. त्यासाठी गंभीर उपायांची आवश्यकता आहे. त्याच्या आर्थिक, सामाजिक, नैतिक इत्यादी सर्व बाजूंवर गंभीरपणे विचार करण्यात आला पाहिजे. त्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत. मुलांना श्रम आणि वेठबिगारीतून मुक्त करून शाळेत पाठविले पाहिजे. काही वर्षांपूर्वी विकसित देशांतही ही समस्या सामान्य होती. पण त्यांनी आपल्या औद्योगिक विकास आणि आर्थिक प्रगतीला प्राधान्य दिले आणि विकसित झाले व मुळापासूनच बालमजुरी नष्ट केली. मानव विकासाच्या दृष्टीने भारत फार मागासलेला आहे. जोपर्यंत रोगराई, गरिबी, कुपोषण, उपासमार, अशिक्षितपणा असेल तोपर्यंत बालमजुरी समाप्त होऊ शकत नाही. ६ ते १४ वर्षांच्या मुलांना त्वरित मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण ही आपली पहिली गरज आहे. आपली उदारीकरणाची नीती पण बालमजुरी नष्ट करण्यात साहाय्यक होऊ शकते. कारण यामुळे रोजगाराच्या संधी वाढतात आणि देशाचा विकास होतो. आर्थिक व औद्योगिक सुधारणा, उदारीकरण, जागतिकीकरण ही आणखी काही योग्य पावले आहेत. .

https://youtube.com/watch?v=RAl-_rN2mWI
बालमजुरी निबंध मराठी – Bal Majduri Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply