फुलाचे मनोगत निबंध मराठी – Fulache Manogat Nibandh Marathi
मी कुंडीत गुलाबाचे रोपटे लावले होते. एके दिवशी त्या रोपट्यावर गुलाब फुलून आला. मला खूप आनंद झाला. मी त्या गुलाबाच्या पाकळीवरून हळुवारपणे हात फिरवू लागले. त्या वेळी तो गुलाब आनंदित झाला आणि माझ्याशी बोलू लागला.
तो गुलाब म्हणाला, “मुली, किती प्रेमळ आहेस तू! नाहीतर इतर मुले पाहा. आम्हांला निष्ठुरपणे तोडतात. कुठेही टाकून देतात. पायदळी तुडवतात ! “तुम्ही आमची काळजी घेतली, तर आम्ही तुमच्या उपयोगी येतो. तुम्हांला सुगंध देतो. तोरण बनवण्यासाठी किंवा देवाला वाहण्यासाठी आम्ही फुलेच उपयोगी पडतो. कोणाचेही स्वागत करण्यासाठी आमचीच मदत होते. आम्हीच आजारी माणसाचे मन प्रसन्न करतो.
“मुली, आम्ही तुम्हांला अत्तरे, सुवासिक तेले देतो. मिठाईत व औषधांतही आमचा उपयोग करतात. आम्हांला तुम्ही चिरडले, तरी आम्ही सुगंधच देतो. आनंद देणे हेच आमचे ध्येय आहे. म्हणून आमच्याशी असेच प्रेमाने वागा.” एवढे बोलून गुलाब गप्प झाला.
पुढे वाचा:
- फुलपाखरू निबंध मराठी
- फाटक्या पुस्तकाचे मनोगत निबंध मराठी
- फळ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध
- प्रामाणिकपणा मराठी निबंध
- मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ निबंध मराठी
- प्रार्थना चे महत्व मराठी निबंध
- प्रातः कालीन भ्रमण निबंध
- प्राणी संग्रहालयास भेट निबंध मराठी
- प्राणी आमचे मित्र मराठी निबंध
- प्रसंगी अखंडित वाचीत जावे निबंध मराठी
- प्रवासाचे महत्त्व निबंध मराठी
- प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे
- प्रयत्नांती परमेश्वर मराठी निबंध
- प्रदूषण निबंध मराठी
- प्रदुषणाचा भस्मासुर निबंध मराठी
- प्रदर्शनास/आनंद नगरीस भेट निबंध मराठी
- प्रगत भारतीय महिला निबंध मराठी
- पोस्टमन निबंध मराठी