आचार्य भावे मराठी निबंध – Acharya Vinoba Bhave Essay in Marathi

बापूजी म्हणजे महात्मा गांधीजी हे विसाव्या शतकातील एक महान नेते. त्यांनी एखादयाला आपला सच्चा चेला, पहिला अनुयायी ठरवणे हा केवढा मोठा मान आहे! हा मान विनायक नरहर भावे यांना मिळाला होता. बापूंनीच त्यांना ‘विनोबा’ म्हणून प्रथम संबोधले आणि मग ते सर्वांचेच विनोबा झाले!

१८९५ साली विनोबांचा जन्म झाला. त्यांचे बालपण एका खेडेगावातील सुसंस्कारित घरात गेले. ‘विनू, नेहमी दुसऱ्याचा विचार आधी करावा,’हा बहुमोल संस्कार छोट्या विनूवर आईने केला. त्यामुळेच त्यांना पुढे भूदानाची कल्पना सुचली असावी.

गणित आणि तत्त्वज्ञान हे विनोबांचे अत्यंत आवडते विषय होते. त्यांनी आजन्म देशभक्तीचे व्रत स्वीकारले. पवनारच्या आश्रमात राहणारे विनोबा सतत पदयात्रा करत. हरिजनोद्धार,साक्षरताप्रसार,गोरगरिबांची सेवा हीच त्यांनी आपली ध्येये मानली होती. अशा या देशभक्ताने सर्वोदयाचा ध्यास घेतला होता.

विनोबा हे आजन्म विदयार्थी होते. त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्या होत्या. मराठीत गीता वाचण्याची आपल्या आईची इच्छा त्यांनी ‘गीताई’ लिहून पूर्ण केली. ‘सब है भूमी गोपाल की’ हे तत्त्व स्वीकारून त्यांनी भूमिहीनांना जमीन मिळवून दिली. ‘सर्वोदय’ हाच उन्नतीचा मार्ग आहे असे ते मानत.

आचार्य भावे मराठी निबंध – Acharya Vinoba Bhave Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply