Set 1: बालदिन निबंध मराठी – Baldin Nibandh in Marathi

दरवर्षी आपल्या भारतात १४ नोव्हेंबर या दिवशी बालदिन साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हा जन्मदिवस. पंडितजींना लहान मुले खूप आवडत. ते कोठेही गेले तरी लहान मुलांमध्ये मिसळत. भारतभरची मुले त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणत.

बालदिनाच्या दिवशी मुलांना खास महत्त्व दिले जाते. देशभर मुलांसाठी विशेष कार्यक्रम सादर केले जातात. दूरदर्शनवर व आकाशवाणीवर मुलांचे कार्यक्रम होतात. अनेक ठिकाणी मुलांसाठी चित्रपट व नाटके सादर केली जातात.

काही संस्था या दिवशी अनाथ-अपंग मुलांसाठी विशेष कार्यक्रम करतात. त्यांना खाऊ, खेळणी व नवे कपडे दिले जातात. मग ती मुलेही आनंदाने नाचतात-गातात.

Set 2: बालदिन निबंध मराठी – Bal diwas Nibandh in Marathi

लहान मुले म्हणजे गुलाबाची फुले होत. अशी फुले आणि लहान मुले आवडणारे स्वतंत्र भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु होत. त्यांचा जन्म दिवस १४ नोव्हेंबरला असल्यामुळे प्रत्येक वर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.

नेहरुंना लहान मुले खूप आवडत. लहान मुले त्यांना चाचा नेहरु म्हणत. आज भारतातील सर्व शाळेत बालदिन मोठ्या थाटात साजरा केला जातो. मुलांसाठी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दूरदर्शनवरही बालदिनानिमित्त कार्यक्रम दाखवितात. शाळेतील लहान मुलांना खाऊ वाटण्यात येतो.

नेहरु तारांगण येथे या दिवशी खगोलशास्त्राचे सवलतीत किंवा मोफत कार्यक्रम दाखवितात. मुलांना पुस्तके, खेळणीही दिली जातात. नेहरूंचा वाढदिवस म्हणजे सर्व लहान मुले आपल्या चाचा नेहरुंना आठवून बालदिनाचा आनंद घेतात.

Set 3: बालक दिन निबंध मराठी – Balak Din Nibandh in Marathi

१४ नोव्हेंबर हा भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांचा जन्मदिवस आहे. हाच दिवस बालकदिन म्हणून साजरा केला जातो कारण नेहरूंना मुले खूप प्रिय होती. ते मुलांमध्ये मूल होऊन रमत असत. म्हणूनच मुलेही त्यांना प्रेमाने ‘चाचा नेहरू’ म्हणत. नेहरूंना वाटे की मुले हीच राष्ट्राची संपत्ती आहे. ह्या मुलांना स्वातंत्र्य तर मिळाले आहे. ह्या स्वातंत्र्याचा उपयोग करून त्यांना आता आपली प्रगती साधायची आहे, विकास साधायचा आहे. ह्यांच्यातूनच उद्याचे नेते निर्माण होणार आहेत. म्हणूनच ते मुलात मूल होऊन रमत होते. त्यांच्यात भारताचा भविष्यकाळ शोधत होते.

चाचा नेहरूंची आठवण जपण्यासाठी दर वर्षी आपण भारतीय नागरिक १४ नोव्हेंबर हा दिवस बालकदिन म्हणून साजरा करतो. बालकांना त्यांचे बालपण उपभोगता यावे म्हणून सरकारने प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे केले आहे. बालमजुरीच्या पद्धतीवर कायद्याने बंदी आणली आहे. मागासवर्गीयांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांसाठी शिक्षणात राखीव जागा ठेवल्या आहेत. आज मुले शिकली तर पुढे जाऊन आपल्या देशाला चांगले शास्त्रज्ञ, चांगले डॉक्टर, चांगले इंजिनियर मिळतील, चांगले शिक्षक मिळतील, चांगले कसबी कारागीर मिळतील, चांगले सैनिक मिळतील. म्हणूनच देशाचा विकास साधण्यासाठी लहान मुले हा कच्चा माल आहे. हे महत्व सर्वांना उमजावे म्हणून खास बालकदिन साजरा केला जातो.

ह्या दिवशी शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात , कार्यक्रम केले जातात आणि मुलांतील कलागुणांना वाव दिला जातो. म्हणूनच बालकदिन खूप महत्वाचा आहे.

Set 4: बालकदिन निबंध मराठी – Childrens Day Essay in Marathi

कोणत्याही राष्ट्राची संपत्ती म्हणजे त्या राष्ट्रातील मुले ही असते. म्हणूनच पं. नेहरू म्हणत असत की, “कोणत्याही देशाची संपत्ती बँकेत नसते तर शाळेत सुरक्षित असते.” हीच मुले उद्या नेता बनून राष्ट्राला योग्य मार्गदर्शन करतात. या मुलांवरच भारताचे भविष्य अवलंबून असते. बालकच समाज, राष्ट्र आणि कुटुंबाची आशा आहे.

पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस १४ नोव्हेंबर “बालक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. कारण नेहरूंना मुले फार आवडत असत. मुलांमध्ये ते मूल होऊन रमत असत. म्हणून मुले त्यांना प्रेमाने ‘चाचा नेहरू’ म्हणत. याच मुलांच्या हास्याखातर त्यांनी आपला जन्मदिवस त्यांना भेट म्हणून दिला. दरवर्षी १४ नोव्हेंबरला शाळांमध्ये बालक दिन साजरा केला जातो. त्यावेळी वाद-विवाद स्पर्धा, नृत्य, संगीत, नाटक, निबंध, खेळ आदी स्पर्धा घेण्यात येतात. स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना बक्षिसे दिली जातात. मुलांना फळे आणि मिठाई वाटतात. दिल्ली येथे इंडिया गेटजवळ नॅशनल स्टेडियम वर मोठा समारंभ आयोजित केला जातो. मुले पंतप्रधानांसमोर सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत करतात. पंतप्रधान मुलांना उपदेश करतात.

बालकदिनाच्या दिवशी केवळ बालकांच्या कल्याणाचाच विचार केला पाहिजे. प्राथमिक शिक्षण व्यवस्थित चालण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. बालमजुरी समाप्त करण्यात आली पाहिजे. अधिकाअधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा याकडे शिक्षकांनी लक्ष दिले पाहिजे. मुलांना उत्तेजनपर बक्षिसे दिली पाहिजेत. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास जागृत होईल. हीच मुले शिकून देशाचे सैनिक बनतील. आदर्शाचा पाया मुलांमध्ये मजबूत असला पाहिजे. ज्यावर त्यांची शिक्षणरूपी इमारत भक्कमपणे उभी राहील व अविश्वासाच्या वादळात ती पडणार नाही. बालकदिनाचे आयोजन हाच दृष्टिकोन समोर ठेवून केले पाहिजे.

प्रजासत्ताकदिन आणि स्वातंत्र्यदिनाप्रमाणेच बालकदिन ही मुलांसाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी सर्वांचे सहकार्य मिळाले पाहिजे व उत्साहाने बालकदिन साजरा केला पाहिजे.

Set 5: बालकदिन निबंध मराठी – Childrens Day Essay in Marathi

बालक हाच देशाचा वारसा पुढे चालू ठेवतो, तेच उद्याचे नेते, शास्त्रज्ञ आदर्श नागरीक, यशस्वी उद्योजक, डॉक्टर, सैनीक, सेनापती, कलाकार आदी आहेत. या बालकांकडेच उद्याचे भविष्य म्हणून पाहिल्या जाते आणि तेच देशाचा पाया आहेत.

भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू आकाशातील ग्रह-ताऱ्यात देशाचे भविष्य पहाण्याऐवेजी ते मुलांच्या चमकदार आणि निष्पाप डोळ्यात पहात. त्यांचं मुलांवर खूप प्रेम होतं. आपल्या इतक्या व्यस्त जीवनातून ते मुलांसाठी थोडासा वेळ निश्चित बाजूला काढत. नेहरूजी मुलांच्या सर्वांगीन विकासावर भर देत होते आणि त्यासाठी सतत प्रयत्नशील रहात असत. म्हणून हे योग्यच आहे की मुलांचे प्रिय ‘चाचा असणारे नेहरूजी यांचा जन्मदिवस ‘बालदिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. १४ नोव्हेंबरला नेहरूजींचा जन्मदिवस आहे. आणि त्याच दिवसाला बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. नेहरूजी मुलांच्या मध्ये अगदी मूल बनायचे. त्यांच्यासोबत हसायचेखेळायचे आणि गमंती करायचे. त्यांनी हे रास्त समजले की ते आपला जन्मदिन बाल बच्चांना समर्पित करतात.

बालदिनाच्या निमित्ताने मुलांच्या ज्ञान, मनोरंजन, आरोग्य, आदिसाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नृत्य, संगीत, नाटक, वाद-विवाद, क्रिडा, फॅशन शो, नकला, स्पर्धा आदींचे ते आयोजन असते. विजयी मुलांना बक्षीस देवून सन्मानीत केले जाते. बक्षीसामध्ये मिठाई, फळे, चॉकलेट आदीचे वाटप केले जाते. मुलांनी सादर केलेला हा कार्यक्रम मोठ्या माणसांची चांगलीच करमणूक करून जातो.

बालदिन निबंध मराठी – Baldin Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply