Set 1: बैल प्राणी निबंध मराठी

भारत हा शेतीप्रधान देश आहे. हा देश शेतकऱ्यांचा देश आहे.

शेतकऱ्यांचा खरा मित्र बैलच आहे असे म्हणावे लागेल. शेती करण्यास बैल उपयोगी पडतात. बैलांचा उपयोग गाडी ओढण्यासही होतो. बैलांना दोन शिंगे असतात. उंच शिंगाच्या बैलांना स्त्रखलारी बैल म्हणतात. बैल नांगर, औत ओढतात. शेतीची सर्व कामे बैलाच्या मदतीनेच होतात. मोट ओढणे, जमीन नांगरणे, पेरणी करणे, धान्याची मळणी करणे ही सर्व कामे बैलामुळे होतात. थंडी वाऱ्यातही बैल शेतीची कामे करत असतात.

श्रावण महिन्यात शेतकरी बैलांचा सण पोळा साजरा करतात. त्यावेळी बैलांना सजवतात. त्यांची मिरवणूक काढतात. त्या दिवशी त्यांना काम करु देत नाहीत.

बैल शंकराचे वाहन आहे.

Set 2: बैल प्राणी निबंध मराठी

पूर्वी जेव्हा माणूस भटक्या स्थितीत होता. तेव्हा तो एका ठिकाणावरून दुसया ठिकाणी अन्नाच्या शोधार्थ भटकत असे. परंतु नंतर त्याने शेतीचा शोध लावला. शेतीचा शोध लागला आणि तेव्हापासून बैल शेतक-याचा मित्र झाला कारण शेत नांगरण्यासाठी बैलाचा खूपच उपयोग होतो. हल्ली जरी ट्रॅक्टरचा जमाना आलेला असला तरी शेतीची जमीन जर आकाराने लहान असेल तर तिथे ट्रॅक्टरचा वापर करता येत नाही. त्यासाठी बैलच लागतात. तसेच हल्ली आता वीज आली त्यामुळे विहिरींना मोट लावली जात नाही. परंतु पूर्वी मात्र मोटेला बैल लावावाच लागत असे. अर्थात् आजही वीजगेली की बैलाचाच आधार घ्यावा लागतो.

आपली संस्कृती ही कृषी संस्कृती असल्याकारणाने आपल्या देशात बैलाला फार महत्व आहे. म्हणून तर भगवान शंकराचे वाहनही नंदीच आहे. आपल्या महाराष्ट्रात पोळा किंवा बैलपोळा हा सण दर वर्षी श्रावण महिन्यातील अमावस्येच्या दिवशी म्हणजेच पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. त्या दिवशी बैलाच्या शिंगांना बेगड लावले जाते, त्याच्या पाठीवर झूल पांघरली जाते आणि त्याच्या गळ्यात रंगीबेरंगी माळा घातल्या जातात.

त्या दिवशी त्याच्याकडून काम करून घेतले जात नाही उलट त्या दिवशी त्याची पूजा करतात आणि त्याला पुरणावरणाचा नैवेद्य खाऊ घालतात. वर्षभर जो मुका प्राणी आपल्यासाठी श्रम करतो त्याच्याबद्दल कृतज्ञता दाखवण्यासाठी हा सण केला जातो. शिवाय त्या दिवशी गावात बैलांची मिरवणूक काढली जाते तर काही ठिकाणी बैलांच्या शर्यतीसुद्धा लावल्या जातात. जत्रेच्या वेळेस भोलानाथ नंदीबैल ‘बुगुबुगु’ वाजत येतो तेव्हा लहान मुलांना खूप गंमत वाटते.

पूर्वी वाहन म्हणूनही बैलगाडीचा उपयोग होत असे. लोक बैलगाडीतून सामानसुमान घेऊन प्रवासाला जात असत. बैलांना फार चाबूक मारणे किंवा त्यांच्यावर जास्त सामान लादणे ह्या गोष्टी जातीवंत शेतकरी टाळत असे. उलट त्यांच्याबद्दल शेतक-यांना मायाच वाटत असे. त्यामुळे बैल म्हातारा झाला तरी सहसा त्याला खाटकाकडे पाठवायला मन धजत नसे.

असा हा बैल म्हणजे भारतीय कृषी संस्कृतीची शान आहे.

बैल प्राणी निबंध मराठी

पुढे वाचा:

Leave a Reply