फुलपाखरू निबंध मराठी – Fulpakharu Nibandh in Marathi
‘फुलपाखरू, छान किती दिसते, फुलपाखरू!’ , आजी ही ओळ अनेक वेळा गुणगुणत असते. तिला शाळेत असताना ही सुंदर कविता होती. मलासुद्धा ही कविता आणि कवितेतील फुलपाखरू फार आवडते.
बागेत फुललेली फुलझाडे, प्रफुल्लित फुले आपल्याला मोहवतात. फुलांप्रमाणेच ही फुलपाखरे, त्यांचे आकर्षक रंग, त्यांचे क्षणाक्षणाला भिरभिरणे सर्वांना आकर्षित करतो.
अभ्यासक सांगतात की, भारतात फुलपाखरांच्या सुमारे १५०० प्रजाती आहेत. प्रत्येक प्रजातीची वनस्पती ठरलेली असते. अनेकदा फुलपाखरांचे रंग झाडावरील फुलांसारखेच असतात. त्यामुळे झाडावर बसलेली फुलपाखरे पटकन लक्षात येत नाहीत. अशा प्रकारे त्यांचे आपोआप संरक्षण होते.
फुलांतील परागकणांचे वाहक फुलपाखरेच असतात. फुलपाखरांमुळे झाडावर फळे तयार होतात. म्हणजे कळत-नकळत ही फुलपाखरे माणसांना उपकारक ठरतात.
आता काही वनस्पतिशास्त्रज्ञांनी फुलपाखरांसाठी स्वतंत्र उदयाने उभारली आहेत. पुण्याला गेल्यावर मी अशा फुलपाखरांच्या उदयानाला मुद्दाम भेट देणार आहे.
फुलपाखरू निबंध मराठी – Essay On Butterfly in Marathi
फुलपाखरू किती सुंदर दिसते. त्याच्या मखमली, कोमल पंखावर किती वेगवेगळी नक्षी काढलेली असते. ते पाहून मन आनंदित होते.
फुलपाखरू फुलांवर भिभिरते. फुलांतील मध हेच त्याचे अन्न! त्यामुळे जंगल नष्ट झाले की झाडे आणि झाडांवरची फुले नष्ट होतात. मग त्या फुलांवर येणा-या फुलपाखरांना अन्न कुठून मिळणार? फुलपाखरांमुळे परागीभवन होते म्हणजेच झाडाला नवीन कळ्या आणि फळे येण्यास त्याची मदत होते.
फुलपाखरू झाडाच्या पानांवर अंडी घालते. अंड्यांतून अळ्या बाहेर येतात त्यांना सुरवंट म्हणतात. सुरवंट झाडाची पाने खाऊन वाढतात मग ते स्वतःभोवती कोष बांधतात. नंतर कोषाचे धागे तोडून आतून फुलपाखरू बाहेर येते. फुलपाखराचे जीवन जेमतेम आठवडाभराचेच असते.
काहीकाही मुले फुलपाखरांना पकडतात, त्यांच्या पंखांना दोरा बांधतात. तसे त्यांनी अजिबात करता कामा नये आणि अशा कोमल जीवांना दुखवता कामा नये. आम्हाला शाळेत कविता आहे. “धरू नका ही बरे, फुलांवर उडती फुलपाखरे, हात लाविता पंख फाटतील दोरा बांधुन पायही तुटतील, घरी कशी मग सांगाजातील, दूर तयांची घरे” अशी ही फुलपाखरे मला खूप खूप आवडतात.
पुढे वाचा:
- फाटक्या पुस्तकाचे मनोगत निबंध मराठी
- फळ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध
- प्रामाणिकपणा मराठी निबंध
- मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ निबंध मराठी
- प्रार्थना चे महत्व मराठी निबंध
- प्रातः कालीन भ्रमण निबंध
- प्राणी संग्रहालयास भेट निबंध मराठी
- प्राणी आमचे मित्र मराठी निबंध
- प्रसंगी अखंडित वाचीत जावे निबंध मराठी
- प्रवासाचे महत्त्व निबंध मराठी
- प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे
- प्रयत्नांती परमेश्वर मराठी निबंध
- प्रदूषण निबंध मराठी
- प्रदुषणाचा भस्मासुर निबंध मराठी
- प्रदर्शनास/आनंद नगरीस भेट निबंध मराठी
- प्रगत भारतीय महिला निबंध मराठी
- पोस्टमन निबंध मराठी