बाग निबंध मराठी – Garden Essay in Marathi

मुंबईसारख्या शहरात बाग असणे कठीण झाले आहे कारण लोकसंख्या खूप वाढल्यामुळे बागेसाठी मोकळी जागा शिल्लक राहात नाहीत.

मी मात्र ह्याबाबतीत भाग्यवान आहे कारण माझ्या घराजवळच खूप पूर्वीपासूनची एक बाग आहे. ह्या बागेत वड, पिंपळ, चिंच, आंबा, उंबर असे मोठमोठे वृक्ष आहेत. त्यांच्या सावलीत थंडगार वाटते. त्याशिवाय तिथे गुलाब, बोगनवेल अशी रंगीबेरंगी झाडेझुडपे असल्यामुळे बागेची शोभा वाढते. बागेच्या मध्यभागी छोटेसे तळे असून त्यात कमळे फुललेली असतात. बागेचे माळी खूप खपून झाडांची काळजी घेतात.

बागेत रोज सकाळसंध्याकाळ चालण्यासाठी माणसे येतात. त्यांच्यासाठी खास पायवाटा तयार केल्या आहेत. त्याशिवाय मुलांना खेळण्यासाठी वेगळा भाग राखून ठेवला आहे. तिथे घसरगुंडी, झोपाळे, सिसॉ, चक्र अशी बरीच क्रीडासाधने आहेत. त्यामुळे सुट्टीच्या काळात तिथे जाऊन खेळायला मला फार म्हणजे फारच आवडते. तिथे कधीकधी मुलांची खेळण्यावरून भांडणेही होतात. कधीकधी पडून खरचटतेसुद्धा. परंतु आम्ही ते सगळे विसरतो आणि पुन्हा दुस-या दिवशी बागेत खेळायला जातो.

अशी ही बाग मला खूप आवडते. मोठा झाल्यावर बागेत खेळायला नाही गेलो तरी धावायला आणि चालायला नक्कीच जाईन.

बाग निबंध मराठी – Garden Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply