सहशिक्षण निबंध मराठी – Sah Shikshan Nibandh Marathi
वेदकाळात आपल्या भारतात गार्गी, मैत्रेयी अशा बुद्धिमान पंडिता होऊन गेल्या ख-या परंतु नंतर दुर्दैवाने मध्ययुगात स्त्रियांची परिस्थिती अत्यंत शोचनीय झाली. त्यांना घराच्या चार भिंतीत डांबून ठेवण्यात आले. ‘स्त्रियांना आणि शुद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही असे ठरवण्यात आले. ‘ न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति’ असेही ठरवण्यात आले. त्यामुळे फक्त चूल आणि मूल एवढेच स्त्रीचे कार्यक्षेत्र उरले.
भारतातच नव्हे तर जगभरातही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. परंतु हळूहळू १९ व्या शतकात इंग्लंड, फ्रान्स येथील स्त्रिया जागृत झाल्या आणि आपल्या हक्कासाठीआवाज उठवू लागल्या.
मागच्या शतकापर्यंत भारतात हीच स्थिती होती. परंतु महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, आगरकर, राजा राममोहन रॉय इत्यादी थोर समाजसुधारकांनी स्त्रियांच्या दुर्दशेबद्दल चळवळी सुरू केल्या. स्त्रीशिक्षण, विधवा-पुनर्विवाह, बालविवाहाला बंदी, सतीप्रथेला बंदी अशा अनेक सुधारणा घडवून आणल्या गेल्या. त्यामुळे स्त्रिया पुढे येऊ लागल्या. त्यांची उन्नती होऊ लागली. लोकांचे हळूहळू मतपरिवर्तन होऊ लागले.आता लोकसत्ताक भारतात स्त्रीपुरूषांना समान हक्क आहेत, शिक्षणाच्या समान संधी आहेत.
पूर्वी मुलांची शाळा आणि मुलींची शाळा वेगळी असे. असे वेगवेगळे ठेवल्यामुळेच उलट मुलामुलींमध्ये अनावश्यक आकर्षण निर्माण होते. त्यांचा मानसिक विकास व्यवस्थित होत नाही. ह्या उलट मुलामुलींनी एकत्र शिकणे म्हणजेच सहशिक्षण. सहशिक्षणामुळे मुलामुलींना एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. त्यांच्यात चांगली मैत्री होते. परस्परांवरचा विश्वास वाढीला लागतो. जातीभेदाची आणि हुंड्याची अनिष्ट प्रथा नष्ट होण्यास मदत होते. सहशिक्षणामुळे मुलामुलींतील अनाठायी आकर्षण समाप्त होते. मुलींच्या मनातली भीतीची भावना नष्ट होऊन आत्मविश्वास जागृत होतो. मुलांच्या वागण्यातही सभ्यता येते. सहशिक्षणामुळे एकाच भागात दोन वेगवेगळ्या शाळा उभारण्याचावरचा खर्च टाळला जातो.
मुलामुलींमधील निकोप स्पर्धा वाढीस लागते. त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकासही उत्तम प्रकारे होतो. प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीला आपण निरोगी आणि आकर्षक बनावे असे सहशिक्षणामुळेच वाटते. म्हणूनच सहशिक्षण हे अधिक लाभदायक असते. आता ग्रामीण भागातही सहशिक्षण आले आहे. खाजगी आणि शासकीय शाळांत आणि महाविद्यालयातही सहशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. .
सहशिक्षणामुळे समाजात स्त्रीपुरूष समानतेची बीजे रूजणार आहेत, जातीपातीची बंधने नष्ट होणार आहेत, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. म्हणूनच सहशिक्षणाला महत्व आहे.
पुढे वाचा:
- सहल जिम कॉर्बेट अभयारण्याची मराठी निबंध
- विदुषक मराठी निबंध
- मी पाहिलेली सर्कस मराठी निबंध
- सरावाचे महत्त्व निबंध मराठी
- डॉक्टर सी व्ही रामन निबंध मराठी
- समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मराठी निबंध
- समता हवी निबंध मराठी
- सत्संगती मराठी निबंध
- सत्यमेव जयते मराठी निबंध
- माझे शेजारी मराठी निबंध
- संस्कृतीचे समाजावरील परिणाम निबंध मराठी
- रम्य संध्याकाळ मराठी निंबध
- संत ज्ञानेश्वर मराठी निबंध