साक्षर जनता भूषण भारता निबंध मराठी

अज्ञान, निरक्षरता यामुळे देशाच्या विकासाचा रथ थांबतो; तर शिक्षणाने माणूस सुशिक्षित, सुसंस्कृत बनतो. देशाच्या विकासाचा वेग हा त्या देशातील साक्षरतेवर अवलंबून असतो.

कोणत्याही देशातील लोक जोपर्यंत शिक्षणाने समृद्ध होत नाहीत, साक्षर होत नाहीत, विविध कौशल्याधिष्ठित व्यावसायिक शिक्षण घेत नाहीत, तोपर्यंत त्या देशाची प्रगती कशी होणार ? अज्ञान आणि अंधश्रद्धा प्रगतीच्या वाटचालीतील मोठे अडथळे आहेत. भारतात निरक्षरतेमध्ये स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. म्हणूनच ‘स्त्रियांना साक्षर करा’ असा संदेश गांधीजींनी दिला. स्त्री आणि पुरुष ही प्रगतीच्या रथाची दोन चाके आहेत. दोन्ही चाके मजबूत असल्याशिवाय रथ पुढे कसा जाईल? .

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असा संदेश देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले होते. स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा फुलेसावित्रीबाई फुले यांनी १८४८ साली स्त्री शिक्षणाचा पाया घातला. शिक्षणापासून भारतीय समाज वंचित राहिल्यामुळे तो अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य, वेठबिगारी यांचा शिकार बनला. म्हणूनच शक्तिशाली, महान, महासत्ता बनण्याचे स्वप्न साकार होण्यासाठी भारतीय जनता शिक्षणाने समृद्ध झाली पाहिजे.

साक्षर जनता भूषण भारता मराठी

पुढे वाचा:

Leave a Reply