विदुषक मराठी निबंध – Vidushak Marathi Nibandh
लहान मुलांना सर्कस पाहायला खूप आवडते. सर्कशीत वाघ, सिंह, हत्ती, माकडे असे प्राणी असतात त्याचप्रमाणे कसरती करणारे कसरतपटूही असतात. शिवाय सर्कशीत विदुषक असतो. हा विदुषक मला फार आवडतो.
विदुषक रंगीबेरंगी कपडे घालतो, त्याने तोंडाला मजेशीर रंग लावलेला असतो, त्यामुळे त्याचे ध्यान अगदी मजेदार दिसते. त्याला बघताच आम्ही लहान मुले पोट धरधरून हसू लागतो.
सर्कशीत कधीकधी दोन किंवा तीन विदुषक असतात. ते एकमेकांच्या खोड्या काढतात, एकमेकांच्या अंगावर कोलांट्या उड्या मारतात, एकमेकांच्या टपलीत मारतात, कधी कधी एखादा विदुषक घोड्यावर बसायला जातो तो खाली घसरून पडतो. तेव्हा आम्हाला खूप हसायला येते. वर्गातल्या वात्रट मुलांची आम्हाला तेव्हा आठवण होते.
विदुषक कसरत करायला जातात आणि खाली घसरून पडतात. खरे तर कधीकधी त्यांना चांगल्या कसरती करता येत असतात परंतु लोकांना हसवण्यासाठी मुद्दामच ते पडण्याचे नाटक करतात.
कधीकधी शरीराने खुज्या असलेल्या माणसांना पोट भरण्यासाठी विदुषक बनावे लागते. स्वतःच्या व्यंगावर विनोद करून लोकांना हसवावे लागते म्हणून मला सर्वांना हसवणा-या विदुषकाची दयाही येते.
पुढे वाचा:
- मी पाहिलेली सर्कस मराठी निबंध
- सरावाचे महत्त्व निबंध मराठी
- डॉक्टर सी व्ही रामन निबंध मराठी
- समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मराठी निबंध
- समता हवी निबंध मराठी
- सत्संगती मराठी निबंध
- सत्यमेव जयते मराठी निबंध
- माझे शेजारी मराठी निबंध
- संस्कृतीचे समाजावरील परिणाम निबंध मराठी
- रम्य संध्याकाळ मराठी निंबध
- संत ज्ञानेश्वर मराठी निबंध
- संगणक शाप की वरदान मराठी निबंध
- संगणक वर मराठी निबंध