शाळेची सहल मराठी निबंध – Essay On School Picnic in Marathi

सहलीला गेले की मुलांना नव्या गोष्टी पाहावयास मिळतात शिवाय आपल्याच वयाच्या मुलामुलींसोबत वेळ घालवायला मिळतो.

आमची शाळा आम्हाला दर वर्षी सहलीला नेते. ह्या वर्षीही आम्हाला शाळेने जानेवारी महिन्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे सहलीला नेले होते.

आम्ही सकाळी सात वाजता शाळेत पोचलो. शाळेत पोचल्यावर सर्व मुलांची हजेरी घेऊन आमच्या सरांनी आणि बाईंनी आम्हाला बसमध्ये बसवले. बस सुरू होताना आम्ही सर्वजण ‘गणपतीबाप्पा मोरया’ असे ओरडलो. मग आम्हाला सर्वांना खायला बाईंनी संत्री आणि सफरचंदे दिली. नंतर अंताक्षरी खेळण्यात कसा वेळ गेला ते आम्हाला समजलेच नाही.

आम्ही राष्ट्रीय उद्यानात पोचलो तेव्हा तिथली हिरवळ आणि हिरवीगार, मोठमोठी झाडे पाहून डोळ्यांना अगदी शांत शांत वाटत होते. तिथे शाळेने एक जंगलतज्ञ बोलावले होते. त्यांनी आम्हाला वेगेवगळ्या झाडांची, फुलपाखरांची आणि पक्ष्यांची माहिती सांगितली. ती ऐकताना आम्ही अगदी गुंग झालो होतो.

नंतर आम्ही एकत्र पंगत करून जेवलो. जेवल्यावरचा कचरा उचलून कचराकुंडीत टाकला. मग तिथल्या बागेत आम्ही घसरगुंडीवर आणि झोपाळ्यावर बसलो. थोडा वेळ उभा खो खो खेळलो. सरतेशेवटी संध्याकाळी घरी परतलो तेव्हा आम्ही खूप दमलो होतो तरीही आनंदात होतो.

आमची सहल – माझी सहल मराठी निबंध – Essay on My Picnic in Marathi

सहलीची तारीख दोन दिवसांवर येऊन ठेपली आणि आमचा उत्साह अधिक द्विगुणीत झाला. सहलीच्या आदल्या दिवशी तर आम्हाला चैनच ? पडेना, रात्रभर जागेच. आईने पहाटे लवकर उठून आमच्या जेवणाचे आवरले होते. जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, खाण्याचे पदार्थ सारं काही आवरुन आम्ही एस.टी. बसमध्ये बसलो आणि आमचा सहलीचा प्रवास सुरू झाला.

कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन हे आमच्या सहलीतील पहिले स्थळ. सर्वजण बसमधून उतरलो. रांगेतून जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले. सर्वांनी गरम चहा घेतला आणि आमची बस जोतिबाच्या दिशेने धावू लागली.

जोतिबा हे कोल्हापूर जिल्ह्यातील वाडीरत्नागिरी येथील सुप्रसिद्ध ठिकाण. वेड्यावाकड्या वळणांचा रस्ता पार करत आम्ही जोतिबावर पोहोचलो. देवदर्शन घेतले आणि पन्हाळगडाच्या दिशेने आम्ही कूच केले. .

पन्हाळगड! शिवकाळातील वैभवशाली किल्ला. बाजीप्रभू आणि शिवा काशिद यांच्या बलिदानाचा साक्षीदार. पन्हाळगडावर पोहचताच शिवा काशिदाच्या भव्य पुतळ्याचे दर्शन झाले. तेथे आम्ही तीन दरवाजा, नायकिणीचा सज्जा, अंधारबाब, पुसाटी बुरुज, नंग्या तलवारी हातात घेऊन वीराच्या आवेशात उभा असलेला बाजीप्रभूचा पुतळा पाहून आमची पावले तबक उद्यानाकडे वळली. त्या वनराईत आम्ही भोजन केले आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.

माझी सहल मराठी निबंध – Essay on My Picnic in Marathi

मी सहावीचा विद्यार्थी आहे. माझे विद्यालय एक प्राइव्हेट स्कूल आहे आणि दिल्लीतील नावाजलेल्या स्कूलपैकी एक आहे. ऑगस्टचा महिना होता. अधुन-मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. आकाशात ढगांचे पुंजके जमा होते. सगळीकडे हिरवळच हिरवळ होती. एका दिवशी आम्हाला शाळेच्या वतीने पिकनिकला नेण्यात आले. खूप मजा आली आणि आम्ही दंगामस्ती केली.

पिकनिकला जाण्याची आम्ही अनेक दिपसापासून वाट पहात होतो. शेवटी तो दिवस आलाच. आम्ही बसमध्ये बसून बुद्ध-जयंती पार्कमध्ये गेलो. रस्त्यातून गीत गायले आणि गंमती जमती करीत राहिलोत. बुद्ध जयंती पार्क दिल्लीचे प्रसिद्ध उद्यान आहे. सुरूवातीला आम्ही खेळायला सुरूवात केली. वेगवेगळ्या गटांनी वेगवेगळ्या खेळाला सुरूवात केली. मी बॅडमिंटन खेळणे पसंत केले. माझ्या एका मित्राने पतंग उडवणे, खेळणे पसंत केले. काहीजण कबड्डी खेळत होते. त्यानंतर आम्ही चहा-पाणी घेतलं आणि गीत-संगीत व जोक्स, गप्पा, अंताक्षरी आदी मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. सर्वांनी मनापासून भाग घेतला. खूप मजा आली. इतर मंडळी देखील आमच्या खेळण्यातला आनंद उभा राहून घेत होती. जिकडे-तिकडे हास्याचे स्फोट होत होते. अचानक रिमझिम पाऊसाला सुरूवात झाली. परंतु लवकरच ती थांबली. त्यामुळे वातावरण तर अधिकच सुंदर झाले. त्यानंतर आम्ही सगळे जेवन करायला बसलोत. अनेक प्रकारचे पदार्थ, मिठाई आणि पकवान होते.

जेवणानंतर आम्ही सर्वांनी झाडाच्या सावलीत आराम केला. नंतर आम्ही गार्डनला फेरफटका मारायला गेलोत. तिकडून आल्यावर चहा पिलोत. नंतर कोणी थंड पेय घेतले. या दरम्यान गंमती जमती होतच राहिल्या. एका विद्यार्थ्यांने नको तो विनोद केल्याने त्याला चांगलेच बोलणे बसले. तोपर्यंत चार वाजत आले होते. शेवटी आम्ही एका बसमध्ये बसून परत निघालोत. घरी येईपर्यंत थोडं थकल्यासारखं झालं होतं. परंतु आनंद इतका झाला होता की सांगू शकत नव्हतो. ही पिकनिक मला नेहमीच स्मरणात राहिल.

आमच्या वर्गाची सहल – शाळेची सहल मराठी निबंध – Shalechi Sahal Marathi Nibandh

‘सहल’ हा शाळेतील विदयार्थ्यांना हवाहवासा वाटणारा कार्यक्रम असतो. यंदा आमच्या वर्गातील सहलीला एक वेगळेच महत्त्व आले होते; कारण नुकतीच वर्गात श्री. ना. पेंडसे यांच्या ‘हद्दपार’ कादंबरीतील राजेमास्तरांनी काढलेल्या वर्गसहलीची हकीकत आम्ही वाचली होती. ती सहल आम्हांला आदर्शवत् वाटत होती. त्यामुळे सहलीचे बेत आखताना आम्ही रंगात आलो होतो.

या सहलीमध्ये वर्गातील सर्वांनी सहभागी व्हायचेच असे आम्ही ठरवले होते. कोंडिबा शिपायाचा सुरेश आमच्याच वर्गातला. पैशाअभावी तो सहलीला येण्याचे टाळत होता; पण आम्ही त्याची सहलीची वर्गणी भरून, आग्रह करून त्याला बरोबर घेतलेच.

खास ठरवलेल्या आरक्षित एस्. टी. ने आम्ही शिवनेरी गडावर आलो. आमचे सर या गडावर अधूनमधून जातात, म्हणून येथील प्रत्येक स्थळाची त्यांना बारकाईने माहिती आहे. गडावरून फिरताना सरांनी प्रत्येक ठिकाणाचे असे काही वर्णन केले की, शिवरायाचा जन्म आणि शिवरायाचे गडावरील बालपण सारे आमच्यासमोर जणू साकार झाले. गड हिंडून झाल्यामुळे आता खूप भूक लागली होती.

सरांनी गडावरच सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. गरम गरम झुणका-भाकर, बरोबर कांदा आणि लोणचे आणि नंतर मस्त दहिभात. किती लज्जत होती बरे त्या जेवणाला ! खास मातीच्या भांड्यात लावलेले दही ही त्या गडावरची खासियत होती म्हणे !

गडावर आम्ही एकमेकांशी गमतीने ऐतिहासिक भाषेत बोलत होतो. भोजन झाल्यावर करमणुकीचे कार्यक्रम झाले. त्यांत सुरेशने म्हटलेला पोवाडा ऐकून तर आम्ही सर्वजण चकितच झालो. सुरेशच्या या गुणाची आम्हांला नव्याने ओळख झाली. मग परतीच्या प्रवासात सुरेशची गाणी ऐकण्याचा कार्यक्रम रंगला होता. शिवनेरीच्या सहवासातील अनेक ऐतिहासिक स्थळे आजही माझ्या डोळ्यांसमोर उभी राहतात व मनाला उल्हसित करतात.

मी केलेली सहल मराठी निबंध – Mi Keleli Sahal Nibandh Marathi

रेल्वेचा प्रवास सुरु झाला. रातराणी धडधडू लागली अन् माझे मन चलबिचल झाले. विचारांच्या फेऱ्यात गुरफटले गेले. मी वेगळ्याच तंद्रीत धुंद झाले. सर्वांची ब्रम्हानंदी टाळी लागली होती पण माझे हृदय आनंदाने अन् उत्सुकतेने उचंबळून आले

केली. होते. कसा असेल आंध्रपदेश ? आपण आज त्याची राजधानी असलेले शहर हैद्राबाद, त्याची जुळी प्रतिमा सिकंदराबाद व आजुबाजूला असणारी ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे पहायला चाललो आहोत परंतु कसे असतील तेथील लोक ? आपणास त्यांची तेलगू भाषा समजेल कशी ? अशा एक ना अनेक विचारांनी मनात थैमान चालू केले होते. झोप लागण्याचे काही चिन्ह नव्हते. उल्हासाने मन अगदी मोहरून आले होते. अशातच केव्हा डोळा लागला हे देखील समजले नाही. अन् जाग आली ती च्चाय ऽ ऽ या कोलाहलाने. बाईंनी आम्हा सर्वांना उठवून आवरायची सुचना सर्व विधी आटोपून खिडकीतून बाहेर नजर टाकली तर सगळीकडे उत्तुंग इमारती दिसू लागल्या.

हैद्राबाद स्टेशनवरुन खाजगी बस करुन आम्ही टिळक लॉजवर उतरलो. साहित्य ठेवून कुतूबशहाची राजधानी असलेला गोवळकोंडा किल्ला पहावयास गेलो. तिथे निजामासाठी असलेल्या शाही सुविधा अन्. त्यांच्या खाणाखुणा पाहून तेव्हाच्या कारागिरांचे कौतुक वाटले. तिथून आम्ही चारमिनार पहावयास गेलो. एरवी सिगारेटच्या पाकीटावर चित्रात पाहिलेले चारमिनार आज प्रत्यक्ष पहायला मिळणार असे सरांनी सांगताच आम्ही आनंदाने उड्याच मारु लागलो. सायंकाळच्या सुमारास जवळ-जवळ ३००-४०० पायऱ्या चढून आम्ही बिर्ला मंदिर पहावयास गेलो. तिथे पोहोचताच म. गांधीजींची आठवण झाली.

‘स्वच्छता’ हे गांधीजींचे ब्रीद आम्हाला तिथे पहावयास मिळाले. ‘बिर्ला मंदिर’ पांढऱ्याशुभ्र संगमरवरी दगडाने बांधले होते. तेथून संपूर्ण हैद्राबाद पहावयास मिळते. निरनिराळी दुकाने विदयूत रोषणाईने सजवली होती. त्यांचे चमचमणे एखाद्या नववधून हिऱ्यांचा लखलखता हार घालून सजल्याप्रमाणे भासत होते.

तिथून आम्ही मीना बझार मध्ये खरेदी करायला गेलो. मी माझ्यासाठी व बहिणीसाठी खड्यांच्या बांगड्या खरेदी केल्या. चकचकीत खड्यांचे दागिने दुकानात नेत्रदीपक वाटत होते. दुकानदारांनी आम्ही नवखे असुनही माफक दरात आम्हाला वस्तु विकल्या. तेथील परिसर निरनिराळ्या खड्यांच्या व विदयूत रोषणईमुळे स्वर्गीय भासला. खरेदी होईतोवर रात्र झाली होती. आम्ही लॉजवर येवून जेवण करुन गप्पागोष्टी करण्यात मश्गुल झालो. दिवसभराचा कंटाळा आता प्रकट होऊ लागला तेव्हा सर्वजण झोपेच्या आधीन होऊन गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मुखमार्जन करुन फिरण्यासाठी बाहेर पडलो. अतिशय भव्य आणि राज्यात प्रसिद्ध असलेले सालारजंग म्युझियम पहाण्यास गेलो ते चार मजली होते. तिथे निरनिराळ्या खोल्यात निरनिराळ्या वस्तु, पुराणी शिल्पे आणि पूर्वीच्या राजांच्या महालातील नक्षीदार काम केलेले देखावे पाहून डोळ्याचे पारणे फिटले. पूर्वीची हत्यारे, चिलखत, जिरेटोप तसेच पोरसेलीन च्या डिशेस, निरनिराळे फोटोग्राफ्स पाहून नवीन काहीतरी पहायला मिळाल्याचे समाधान पाटले. पूर्वीच्या राजांनी निजामाला भेटीदाखल दिलेल्या वस्तू कपाटात व्यवस्थित जतन करुन ठेवल्या होत्या. भरतकाम, नक्षीकाम, विणकाम या कला त्याकाळातही किती सुबक होत्या हे समजले. हे सर्व पाहून झाल्यावर तिथून जवळच असलेल्या ‘नागार्जून सागर’ या धरणाचे नाव समजले. आम्हाला वाटले बरे झाले ‘एका दगडात दोन पक्षी’ परंतु तो प्रकल्प पहाणे रद्द झाले परंतु हल्लीच ५००० एकर परिसरात बनवलेल्या ‘रामोजी फिल्म सिटी’ नावाचा स्टुडिओ पहायला जायचे ठरले तिथे सर्व भाषांच्या चित्रपटाचे चित्रिकरण चालते तिथे चालु असलेले एका हिंदी चित्रपटाचे चित्रिकरण पहायला मिळाले. स्नोवर्ल्ड मध्ये ५ तापमान असलेले वातावरण होते.

दिवसभर तिथल्या बर्फात खेळलो, स्केटिंग केले जसे काही काश्मिरला असल्याचा मनमुराद थंड आनंद उपभोगला. एकमेकांच्या अंगावर बर्फाचे चेंडू बनवून फेकले, बर्फातच लोळलो. तीन दिवसांनी आम्ही आमचा अविस्मरणीय, अपूर्व प्रवास संपवून विचारांच्या, बुद्धीच्या कोषागारात नवीन गाव, नवीन माहिती घेऊन परतलो.

शाळेची सहल मराठी निबंध – Essay On School Picnic in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply