हॉटेल वर निबंध मराठी

मला हॉटेलमध्ये जायला खूप आवडते. परंतु मी लहान असल्यामुळे मला जास्त वेळा तिथे जायला मिळत नाही. आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस असतो तेव्हाच फक्त आम्ही सगळेजण हॉटेलात जेवायला जातो.

मला हॉटेलात जायला आवडते कारण तिथे खूप छान छान पदार्थ मिळतात. तसे पदार्थ घरात कुणालाच करता येत नाहीत. तिथे खूप छान सजावट केलेली असते. टेबलांवर पांढरी स्वच्छ चादर घातलेली असते. मंद संगीत वाजत असते. दरवान खाली लवून मुजरा करतो.वेटर लोक अदबीने समोर मेन्यूकार्ड ठेवतात.मला तर अगदी आपण राजा झालोत असेच वाटते. आईबाबांच्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाच्या पार्टीला मावशी, मामा, काका आणि आत्यासुद्धा सहकुटुंब आले होते. तेव्हा आम्ही केक घेऊन तिथे गेलो होतो.

मात्र हॉटेलचे खाणे वरून चांगले दिसले तरी ते तब्येतीच्या दृष्टीने चांगले नसते कारण त्यात खूप तेल, तूप आणि मसाले घातलेले असतात. भटारखान्याची स्वच्छता किती असेल ते कुणालाच माहिती नसते. तसेच हॉटेलचे पदार्थ फारच महाग असल्यामुळे आई म्हणते की त्या एका वेळच्या बिलात महिन्याभरचा भाजीपाला येईल.

गरज म्हणूनही ब-याच लोकांना हॉटेलचे खाणे रोज खावे लागते तेव्हा त्यांना घरच्या अन्नाची किंमत समजते.

पुढे वाचा:

Leave a Reply