इतिहासाचे अध्ययन निबंध मराठी
इतिहास शिकणे शिकविणे सामान्यपणे शिक्षणाच्या सर्व स्तरांवर अनिवार्य असलेले दिसते असे का? असा प्रश्न अनेकदा निर्माण होतो. हे गाडलेली प्रेते पुन्हा उकरून काढण्यासारखे नाही का? जुन्या गोष्टी उगाळण्याचा काय फायदा? जर आपण इतिहास शिकलो नाही अगर शिकविला नाही तर असा कोणता पहाड कोसळेल? विद्यार्थ्यांवर हा अतिरिक्त बोजा का? जर आपण खोलवर याविषयी विचार केला तर हे सर्व प्रश्न व्यर्थ, वाटतात. आपला वर्तमानकाळ आपल्या भूतकाळाशी जोडलेला असून तो भविष्याकडे संकेत करतो. आपण आपले पूर्वज, यांची महान कार्ये, विचार, सेवा, समजदारपणा यांना कसे विसरू शकू? जर विसरलो तर आपली सभ्यता, संस्कृती आणि प्राचीन वारसा नष्ट होईल.
आपण मुळापासून तुटून पडू इतिहास आपल्याला अनेक विषयांचे ज्ञान प्रदान करून आपणास अधिक बुद्धिमान, चतुर, कार्यकुशल, कर्मठ, संवेदनशील आणि वीर बनवितो. तो आपणास आपले मूळ शोधण्यात व त्याच्याशीच संलग्न राहण्यात मदत करतो. याच ज्ञानाच्या आधारावर आपण आपले भविष्य चांगल्या प्रकारे घडवू शकतो. जे देश, व्यक्ती, आणि लोकांनी इतिहासाकडून शिकवण घेतली नाही ते एक तर नष्ट झाले किंवा त्यांना अपयश आले. आपण आपल्या मागील चुकांवरून काय शिकावे? व पुन्हा त्या का करू नयेत हे आपणास इतिहास शिकवितो. इतिहास आपणास चुका सुधारण्याबरोबरच आपल्या क्षमता आणि शक्तींचा चांगल्या प्रकारे कसा उपयोग करावा ते शिकवितो. भूतकाळाच्या प्रकाशात आपण अधिक गतिमान, व्यावहारिक, कल्पक, कुशल आणि विकसनशील बनू शकतो उदा. अंतराळासंबंधीच्या शोधकार्याने मानवाचा जन्म आणि विकास, ब्रह्मांडाची निर्मिती, पृथ्वीचे जीवन व विकास यावर प्रकाश टाकून किती तरी रहस्यांचा उलगडा केला. अशा प्रकारे आपण निसर्ग व जीवनावरील पडदे दूर करू शकतो. इतिहासाला गाडलेले मुडदे उखडणे असे म्हणणे किंवा काही सत्य आणि आकड्यांचे संकलन म्हणणे शुद्ध मूर पणा आहे.
इतिहासाच्या गर्भात जाऊन त्याच्या रहस्यांचे निरीक्षण करणे आपल्यासाठी अने प्रकारे फायदेशीर आहे. एखाद्या खोल खाणीत जाऊन रत्ने काढण्यासारखे आहे. उदा, भारताचा लिखित इतिहास बुद्धकाळापासून सुरू होतो परंतु आपला इतिहास तर खूप प्राचीन आहे. तो वैदिक आणि सिंधू संस्कृतीपेक्षाही आधीचा आहे व तो प्राचीन संस्कृत, पाली, प्राकृत, तामिळी धर्मग्रंथांत लपलेला आहे. आपली वेद, पुराणे, महाकाव्य आणि इतर प्राचीन ग्रंथ इतिहासाचे महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. त्यावरून आपल्या प्राचीन संस्कृतीचा सभ्यतेचा, सामाजिक, राजनैतिक आणि आर्थिक, परिस्थितीचा अंदाज येतो. तत्कालीन इतिहास हे सांगतो की जेव्हा जगाच्या अन्य भागांत मनुष्य रानटी अवस्थेत होता तेव्हा भारतात सभ्यता आणि संस्कृती खूप विकसित समृद्ध झालेली होती.
इतिहास हा एक गंभीर विषय असल्यामुळे तो गंभीरपणेच शिकविला व शिकला गेला पाहिजे. इतिहासाबद्दल जे गैरसमज आहेत ते म्हणजे तो कपोलकल्पित आहे. त्यात जुनी युद्धे, तह, आकड्यांचा संग्रह आहे ते दुर्लक्षून आपण इतिहास समजून घेतला पाहिजे. इतिहास आपणास खूप काही सांगतो तो आपल्या प्राचीन संस्कृतीचा हिशेब व भविष्याची किल्ली आहे. उदा. अशोकाला कलिंगावर मिळविलेल्या विजयामुळे महान म्हणत नाहीत तर त्याने प्रजाहिताची आणि लोककल्याणाची जी कामे केली. अहिंसेचा, सेवेचा आणि त्यागाचा संदेश दूरवर पसरविला त्यामुळे महान म्हणतात. इतिहास आपणास सांगतो की देशात फुटीरता निर्माण होऊ देऊ नका. अशा प्रकारे संघटित होऊन एकजुटीने राहा की शत्रू आमच्याकडे पाहू शकणार नाही. इतिहासाला थोर व्यक्ती आणि शासकांचे चरित्र म्हटले गेले आहे. परंतु हे म्हणणेसुद्धा अपुरे आहे. इतिहास इतकाच नाही. इतिहास त्यांच्या चरित्रावर प्रकाश जरूर टाकतो पण याहीपेक्षा जास्त तेथील जनतेच्या यशस्वितेवर, अपयशावर, विजय, पराजयावर, विकास, सभ्यतेवर व संस्कृतीवर प्रकाश टाकतो. थोर यक्तींच्या मुळाशी त्या असंख्य व्यक्ती असतात ज्या जनता म्हणून ओळखल्या जातात. प्रजा नसलेल्या राजाची कल्पनाच करता येत नाही.
इतिहासाचे अध्ययन यासाठी आवश्यक आहे की तो आपल्या भूतकाळाचा महान साक्षीदार आहे. जुन्या घटना, सत्य, आकडेवारी, कार्याचा प्रामाणिक हिशोब आहे. आणि म्हणूनच तो इतका रोचक व लाभदायक आहे. साहित्यही इतिहासावरच आधारित आहे. शेक्सपियरची बरोच नाटके इतिहासालाच रोचक करून आपल्यासमोर सादर करतात. जयशंकर प्रसाद, रणजित देसाई, शिवाजी सावंत यांनी इतिहासाच्या आधारेच आपले साहित्य निर्माण केले. अनेक कादंबऱ्या, नाटके कथा, कविता ही इतिहासाचीच देणगी आहे.
इतिहासाचे अध्ययन राष्ट्रीय ऐक्य आणि भावनिक एकजुटीला बल देते. ते आपणास आपल्या. प्राचीन आणि सर्वांच्या सहकार्याने आलेल्या सभ्यतेवर, संस्कृतीवर, सामाजिक वारशावर गर्व करण्यास शिकविते. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी, भगतसिंग यांच्याविषयी वाचून आजही आपले मस्तक अभिमानाने उन्नत होते. इतिहास आपले विचार धारदार व दृष्टिकोन व्यापक व उदार बनवितो. जितके थोर आणि यशस्वी राजकारणी विद्वान होऊन गेले ते इतिहासाचे विद्यार्थी होते. ते इतिहासाकडून खूप काही शिकले. इतिहासाला समजूनच आपण नवा इतिहास घडवितो. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. याचा हाच अर्थ आहे की समान परिस्थिती,कार्य आणि कारण समान परिस्थितीला जन्य देतात. सारांश, इतिहासाचे अध्ययन सर्व दृष्टीनी योभ्य लाभदायक व श्रेयस्कर आहे.
पुढे वाचा:
- आमचे बालवीर शिबिर निबंध मराठी
- हॉकी वर मराठी निबंध
- हे विश्वची माझे घर निबंध
- हुंडाबळी स्त्रीचे आत्मवृत्त मराठी
- हुंडा एक सामाजिक समस्या
- हिरवी संपत्ती मराठी निबंध
- स्वावलंबन मराठी निबंध
- स्वामी दयानंद सरस्वती निबंध मराठी माहिती
- स्वातंत्र्यानंतरचा भारत मराठी निबंध
- स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी
- स्वच्छता तेथे प्रगती मराठी निबंध
- स्वच्छ वर्ग सुंदर वर्ग निबंध मराठी
- स्पर्धेचे युग मराठी निबंध