का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले निबंध मराठी

संत तुकारामांनी दया, क्षमा आणि शांती यांची शिकवण दिली, समतेचा उपदेश जनतेला दिला. संत केवळ उपदेश करणारे नसावेत. ते रंजलेल्या, गांजलेल्यांना जवळ करणारे असावेत. दीन, दलितांना जवळ करणाऱ्यांना साधू मानावे. खरा देव अशा संतांच्यातच लपलेला असतो, असा संदेश तुकाराम महाराजांनी सर्वांना दिला.

साधूसंत घरी येणे हा शुभशकुन मानला जातो. म्हणूनच ‘साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा‘ असे म्हटले जाते. पण चमत्कार दाखवून, लोकांना फसवून, जनतेला अंधश्रद्धेच्या खाईत लोटणाऱ्यांना संत कसे म्हणता येईल? ते तर भोंदू संत ! खरे संत स्वत:च्या हितापेक्षा दुसऱ्याच्या कल्याणासाठी झिजतात. लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांचे दुःख निवारण्यासाठी चंदनाप्रमाणे झिजतात. म्हणूनच ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ असे म्हटले जाते.

संत एकनाथांनी तापलेल्या वाळवंटात रडत बसलेल्या महाराच्या पोराला उचलून कडेवर घेतले व समतेचा आणि ममतेचा संदेश दिला. राजर्षी शाहू महाराजांनी दीन, दलित, अनाथ व विविध समाजातील मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, वसतिगृहे काढली. समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमान मंदिरे उभारली. आय.पी.एस. अधिकारी किरण बेदी यांनी कैद्यांच्या जीवनात नंदनवन फुलविले. अशा थोर विभूती म्हणजे महान संतच होय.

पुढे वाचा:

Leave a Reply