लोखंडी नांगराचे आत्मवृत्त
हा येथे अडगळीत पडलेला दिसतो आहे ना, तो मी आहे एक लोखंडी नांगर. मी गेल्या शतकात जन्माला आलो. त्या काळात मी शेतकऱ्यांचा फार आवडता होतो. त्यापूर्वी आपले शेतकरी लाकडी नांगर वापरत. प्रसिद्ध उदयोजक लक्ष्मणराव किर्लोस्करांनी आम्हांला निर्माण केले.
फाळ, तक्ता, खोड, हात (रुमणी), मूठ, दांडी हे माझे अवयव. आम्ही सर्व मिळून अचाट कामे करत होतो. त्यामुळे लोक आमच्यावर खूप खूश होते. अगदी विदेशांतूनही आम्हांला मागणी येत असे.
आमच्या कष्टांतून महाराष्ट्राची खडकाळ डोंगराळ भूमी सुपीक झाली. महाराष्ट्राच्या शिवारामध्ये ऊस आणि जोंधळा डोलू लागला. हळूहळू जगात औदयोगिक क्रांती झाली. आमची जागा ट्रॅक्टरने घेतली. त्यामुळे काही ठिकाणी मी आता अडगळीत पडलो आहे.
मात्र, आजही गरीब, लहान शेतकरी माझाच उपयोग करतात. माझ्याबरोबर त्या शेतकऱ्याचे ढवळे-पवळेही असतात. काही गरीब शेतकऱ्यांकडे बैलही नसतात. मग त्या घरातली माणसेच बैलांचे काम करतात, तेव्हा माझे मन दु:खी होते.
पुढे वाचा:
- ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’
- लोकमान्य टिळक मराठी निबंध
- लोकप्रिय क्रिकेटवीर – सुनील गावस्कर
- लेखकाची जबाबदारी मराठी निबंध
- लाल किल्ला निबंध मराठी
- लहान मुलांनी काम करावे काय
- मराठी कथा लेखन लबाड कोल्हा
- रेल्वे स्टेशनचे दृश्य मराठी निबंध
- रेडिओ मराठी निबंध
- रुपयाची आत्मकथा मराठी निबंध
- रिक्षावाला निबंध मराठी
- राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी
- राष्ट्रभाषा हिंदी मराठी निबंध
- रात्र रागावली तर निबंध मराठी