रस्त्यावरील भटक्या कुत्र्याची कैफियत – Rastyavaril Bhatkya Kutryachi Kaifiyat

मी एक भटका कुत्रा बोलतोय. सध्या आमच्याविषयी खूप तक्रारी होत आहेत. शाळेत जाणाऱ्या एका छोट्या मुलीच्या अंगावर आमच्यापैकी चार-आठजणांनी एकदम हल्ला केला, हे नक्कीच वाईट आहे. हल्ली बऱ्याच माणसांना आमच्यापैकी काहीजण चावतात. का? याचा विचार व्हायला हवा.

खरे पाहता, माणूस आम्हांला आपला मित्र मानतो. इमानी प्राणी म्हणून आमचे कौतुक करतो. जे लोक आपल्या घरात आमच्या भाईबंदांना पाळतात, त्यांचे केवढे कौतुक असते! पण आम्हां भटक्या कुत्र्यांना खायला अन्न नसते आणि राहायला घर नसते. त्यामुळे उपासमार होते, दूषित अन्न पोटात जाते. मग आमच्यातील काहीजण पिसाळतात आणि माणसांना त्रासदायक ठरतात.

आमची कैफियत ऐकून घ्या. आम्हांलाही जगण्याचा हक्क आमच्यासाठी स्वतंत्र जागा हवी, आम्हांला चांगले खाणे मिळाले पाहिजे. मग आम्ही पिसाळणार नाही. आमची भरमसाठ संख्या वाढू नये; म्हणून तुम्ही जरूर उपाययोजना करा. मात्र, हे विसरू नका की, ‘जगा आणि जगू दया’ हे आपल्या देशाचे ब्रीद आहे. त्या नियमाने आम्हांलाही सुखाने जगू दया, एवढीच मागणी आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply