रवींद्रनाथ टागोर निबंध मराठी – Rabindranath Tagore Nibandh in Marathi

रवींद्रनाथ टागोर हे भारताचे एक थोर सुपुत्र. बंगालमधील एका संपन्न, सुविदय घरात इ. स. १८६१ मध्ये रवींद्रनाथांचा जन्म झाला. त्यांना लहानपणापासूनच निसर्गाची जबरदस्त ओढ होती. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच झाले. त्यांना शाळेतील बंदिस्त वातावरण आवडत नसे. अगदी लहानपणापासून ते कविता करत असत.

रवींद्रनाथांच्या काव्यप्रतिभेने त्यांना जगविख्यात केले. रवींद्रनाथांच्या ‘गीतांजली’ला नोबेल पारितोषिक मिळाले. रवींद्रांनी इतरही विपुल लेखन केले. शिक्षणाबद्दल रवींद्रांचे फार वेगळे विचार होते. त्यांनी शांतिनिकेतनमध्ये विश्वभारतीचा प्रयोग केला. शाळेच्या इमारतीत वर्गात बसून ठरावीक विषय शिकणे व शिकवणे त्यांना मान्य नव्हते. शांतिनिकेतनमध्ये वर्ग झाडाखाली भरत. तेथे प्रत्येक विदयार्थी आपल्याला आवडेल त्या कलेचे अध्ययन करत असे.

रवींद्रनाथ हे कडवे देशभक्त होते. वेळोवेळी त्यांनी इंग्रज सरकारला विरोधही केला होता. रवींद्रनाथांनी रचलेले ‘जन-गण-मन’ हे पद आज स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत झाले आहे. अशा या थोर भारतपुत्राचे १९४१ साली निधन झाले.

रवींद्रनाथ टागोर निबंध मराठी – Rabindranath Tagore Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply