रंगांची दुनिया मराठी निबंध

ह्या दुनियेत रंग आहेत म्हणूनच तर ही दुनिया सुंदर बनली आहे. पहाटे उषेचे केशरी रंग आकाशात पसरतात. नंतर सूर्याची तेजस्वी पिवळी प्रभा येते. मातीचा लालेलाल रंग, पानांचा, वेलींचा हिरवागार रंग, फुलांचे, फुलपाखरांचे विलोभनीय रंग, आकाशाचा गर्द निळा रंग.. हे सगळे रंग फार सुंदर आहेत. खरोखर, बिनरंगी जीवनाची कल्पनाच करता येणं शक्य नाही. विविधता, सौंदर्य, स्वाद, ताजेपणा आणि आकर्षण हे सगळं सगळं रंगांमुळेच तर शक्य होतं.

आपल्या डोळ्यांमध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात, त्यांना म्हणतात कॉन्स आणि रॉड्स. ह्यापैकी कॉन्स पेशींमुळे आपल्याला विविध रंगांची जाणीव होते. परंतु काही रंगांधळ्या लोकांच्या डोळ्यांत ह्या पेशी नसतात. त्यामुळे त्यांना फक्त राखाडी रंगच दिसतो. किती दुर्दैव आहे ना हे. कुत्रे, मांजर, ससे इत्यादी प्राणीही रंगांधळे असतात परंतु मधमाश्या, साप, पाली आणि पक्षी ह्यांना मात्र रंग दिसतात. अनेक प्रकारचे मासेही रंग पाहू शकतात.

माणसाला रंगांविषयी फार पूर्वीपासून कुतुहल होतं. पांढ-या रंगात सगळे रंग सामावलेले असतात हे त्यानं शोधून काढलं. नंतर त्यानं हेही शोधून काढलं की केवळ लाल, निळा आणि हिरवा हे तीन रंगच मूळ रंग किंवा प्राथमिक रंग आहेत. त्यांना वेगवेगळ्या प्रमाणात एकमेकांत मिसळलं की बाकी सर्व रंग तयार करता येतात. रंगाचा आणि प्रकाशाचा घनिष्ट संबंध असतो. प्रकाशाशिवाय रंग असूच शकत नाहीत म्हणूनच रात्रीच्या अंधारात सगळे रंग विलीन होतात. इंद्रधनुष्यात तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा हे सात रंग असतात. हे साती रंग सूर्यप्रकाशाच्या शुभ्रधवल किरणात सामावलेले असतात. आपण जर लोलकातून प्रकाशकिरणे जाऊ दिली तर आपल्याला हे सातही रंग स्पष्ट दिसतात. न्यूटन ह्या महान शास्त्रज्ञाने हा शोध लावला होता.

प्राथमिक रंगांचे मिश्रण केल्यावर जे रंग तयार होतात त्यांना पूरक रंग असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, लाल आणि हिरवा रंग एकत्र मिसळून पिवळा रंग तयार होतो. आपल्याला वस्तू रंगीत दिसतात कारण त्या एका विशिष्ट रंगाला परावर्तीत करून बाकीचे रंगआपल्यात सामावून घेतात. लाल रंगाच्या वस्तू प्रकाशातील लाल किरणांना परावर्तित करतात आणि अन्य रंग शोषून घेतात. त्याचप्रमाणे हिरव्या रंगाच्या वस्तू प्रकाशातील हिरवा रंग परावर्तित करतात आणि अन्य रंग शोषून घेतात. एखादी काळी वस्तू काळी दिसते कारण ती प्रकाशातील सर्वच रंग शोषून घेते आणि कुठलाच रंग परावर्तित करीत नाही. उलट पांढरी वस्तू पांढरी दिसते कारण ती कुठलाच रंग शोषून घेत नाही.

त्याशिवाय माणसानं वेगवेगळ्या रंगांना वेगवेगळे अर्थही चिकटवले आहेत. केशरी रंग हा शौर्याचं प्रतिक तर शुभ्रधवल रंग हा शांतीचं प्रतिक, हिरवा रंगहा समृद्धीचं प्रतिक तर लाल रंग हा धोक्याचं प्रतिक मानला जातो. अशा प्रकारे रंग, प्रकाश आणि आपले नेत्र ह्यांच्या संवेदनांचा हा उत्सव मोठा प्रेक्षणीय असतो खास.

रंगांचे जग मराठी निबंध

रंगांचे जग फार विचित्र आहे. रंग आपल्या जीवनाचे अभिन्न अंग आहे. त्यांच्या मुळे जीवनात, रुची, वैविध्य आणि ताजेपणा राहतो. बिन-रंगांचे जीवन निरस, बेचव होईल. आपल्या आसपासच्या परिसरातील रंगीत वस्तू जीवनाला मोहक आणि सार्थक बनावतात. रंगीबेरंगी फुले, झाडे, निळे आकाश, उगवत्या सूर्याचा सोन्यासारखा रंग, सप्तरंगी धनुष्य हा किती रंगांचा भडिमार आहे. पशु-पक्षी, वनस्पती सर्व रंगात बुडाल्या सारखे वाटतात. रंगीत वस्तू पाहणे आणि दाखविणे आकर्षक असते.

रंगीत वस्त्रांमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाला एक नवेच आकर्षण येते. प्रत्येक व्यक्तीची खास रंगांची निवड असते. आपल्या घरांचे रंगसुद्धा त्यात राहणाच्या व्यक्तींच्या आवडी नुसार असतात. या खेरीज आपण आपले घर, फुले, पाने इत्यादींनी सजवितो. आपले सर्व सण रंगीबेरंगी असतात. होळी हा तर रंगांचाच सण, त्या दिवशी रंग उधळण्याची जी धूम असते ती खरच अद्भुत असते. वसंत ऋतूत रंगांना जसा बहर येतो.

रंग प्रकाशाचा एक धर्म आहे. सूर्याची श्वेत किरणे वस्तुतः सात रंगांचे मिश्रण आहेत. हे सात रंग इंद्र धनुष्यात आपण पाहतो. लाल, निळा आणि हिरवा हे तीन प्राथमिक रंग आहेत. यांच्या मिश्रणातूनच अनेक रंग तयार केले जाऊ शकतात. आयहॅक न्यूटन पहिला शास्त्रज्ञ होता ज्याने सर्वप्रथम हे सिद्ध करून दाखविले की, प्रकाशाच्या श्वेत किरणात सात रंग असतात. त्यांनी एका प्रिझममधून प्रकाशाची किरणे पाठविली आणि रंगाचा स्पेक्ट्रम पाहिला. हे रंग एकत्र मिसळल्यानंतर पुन्हा श्वेत प्रकाश बनला. लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, अस्मानी आणि जांभळा हे ते सात रंग आहेत. वास्तविक प्रकाशाच्या स्पेक्ट्रममध्ये शंभरपेक्षाही जास्त रंग असतात पण आपण डोळ्यांनी फक्त हे सातच रंग पाहू शकतो. 1

प्रकाशाच्या माध्यमातूनच रंग दिसतो. आपणास हिरवी पाने हिरवी दिसतात कारण ती प्रकाशाच्या हिरव्या रंगाला परावर्तीत करतात आणि अन्य रंग आपल्यामध्ये शोषून घेतात. गुलाबाचा गुलाबी रंग यासाठी गुलाबी आहे कारण ते गुलाबी रंगाला परावर्तीत करते आणि अन्य रंग शोषून घेते. हा सर्व प्रकाशाचा आणि त्याच्या रंगांचा खेळ आहे. रंगांचा आपल्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो.

रंगांची दुनिया मराठी निबंध

पुढे वाचा:

Leave a Reply