Set 1: रक्षाबंधन निबंध मराठी – Essay On Raksha Bandhan in Marathi

रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमेला असतो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. ती त्याला ओवाळते. मिठाई देते. भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो. राखी. बांधून घेऊन तो बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी उचलतो. या प्रथेमुळे बहीण-भावाचे प्रेम दृढ होते. ही प्रथा सर्व भारतभर मोठ्या उत्साहाने साजरी करतात.

रक्षाबंधन सण आला की दुकानांमध्ये सुंदर लहान-मोठ्या राख्या विक्रीसाठी मांडून ठेवलेल्या दिसतात. महाराष्ट्रात हाच सण नारळी पौर्णिमा म्हणूनही साजरा करतात. कोळी लोक समुद्राला देव मानतात. खवळलेल्या समुद्राला त्या दिवशी नारळ अर्पण करतात. ते समुद्राची पूजा करतात. नवे कपडे, दागिने घालून नाचतात, गातात.

Set 2: रक्षाबंधन निबंध मराठी – Raksha Bandhan Nibandh in Marathi

दर वर्षी रक्षाबंधन ह्या दिवशी रेडियोवर गाणे लागते,” भय्या, मेरे राखी के बंधन को निभाना, भय्या, मेरे छोटी बहन को नारूलाना.” दर वर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण केला जातो. हा सण भाऊबहिणीच्या नात्याचा सण आहे. दर वर्षी माझी ताई ह्या दिवशी मला राखी बांधते. तेव्हा खूप मजा येते. मग ती रंगीबेरंगी राखी हाताला बांधून मी दिवसभर फिरतो. त्याशिवाय मला माझी मावसबहीण आणि चुलतबहीण येऊनही राखी बांधतात.

महाराष्ट्रात जसे भाऊबीजेला महत्व असते तसेच उत्तर भारतात ह्या सणाला विशेष महत्व असते. शिवाय ह्या सणाला ऐतिहासिक महत्वसुद्धा आहे. म्हणजे गुजरातचा अत्याचारी राजा बहादुरशहा ह्याने चितोडची राणी कर्मावती हिच्यावर आक्रमण केले तेव्हा आपली ह्या युद्धात हार होईल अशी भीती वाटून तिने मोगल राजा हुमायून ह्याला राखी पाठवली होती आणि तिच्या संरक्षणाला हुमायूनही भावाच्या नात्याने धावून गेला होता अशी कथा आहे.

ह्या दिवशी भाऊ आपल्या बहिणींच्या घरी येतात. तेव्हा बहिणी आपल्या भाऊरायाचं राखी बांधून ओवाळतात. मग भाऊही आपल्या बहिणीला काहीतरी ओवाळणी घालून वचन देतात की संकटसमयी मी तुझ्या पाठीशी उभा राहीन.

मग बहिणी स्वतःच्या हातांनी बनवलेले सुग्रास भोजन भावाला खाऊ घालतात. असा हा दिवस खास भावाबहिणींचा असतो. ज्या बहिणी भावापासून लांब राहातात त्यांना ह्या दिवशी एकमेकांना भेटणे शक्य नसते. अशा वेळेस बहिणी पोस्टाने राखी पाठवतात.बाजारात ह्या सणाच्या आठ दहा दिवस अगोदरपासूनच सुंदर रंगीबेरंगी राख्या विकण्यासाठी येऊ लागतात.

त्या राख्यांत मणी, रंगीबेरंगी वर्ख, कागद, कापड, थर्माकोल असे साहित्य वापरलेले असते. राखी बनवण्याच्या कुटीरोद्योगामुळे ब-याच कसबी कलाकारांना काम मिळते. हल्ली तर काही बहिणी चांदीच्या आणि सोन्याच्या राख्याही मुद्दाम विकत घेतात. त्यामुळे सोनार मंडळीसुद्धा अशा किंमती राख्या विक्रीला त्या काळात ठेवू लागले आहेत. असा हा भावाबहिणींचा सण.

Set 3: रक्षाबंधन निबंध मराठी (राखी पौर्णिमा) Rakhi Purnima Nibandh Marathi

भारत हा सणांचा देश आहे. रक्षाबंधनासारखा पवित्र सण आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण येतो. म्हणून यास श्रावणी पौर्णिमा असेही म्हणतात. राखीचे हे बंधन भावा बहिणीच्या पावित्र्याचे निदर्शक आहे. रक्षाबंधनाला ऐतिहासिक महत्त्वही आहे. गुजरातचा अत्याचारी शासक बहादुरशहाने जेव्हा चितोडवर आक्रमण केले आणि चितोडची राणी कर्मावतीहिने आपले राज्य वाचविण्यासाठी मोगल राजा हुमायूनला राखी पाठविली. हुमायून राणीची मदत करण्या करीता चितोडला गेला. परंतु हुमायून तिथे पोहोचण्यापूर्वीच राणीने १२०० राजपूत स्त्रियांबरोबर जोहारच्या चितेत प्रवेश केला. हुमायूनने राणी कर्मावतीच्या राखीचा आदर करून चितोडचे रक्षण केले.

एकदा देव आणि असुरांमध्ये युद्ध झाले. राक्षसांचे म्हणजे असुरांचे पारडे जड झाले देव हरू लागले. तेव्हा असुर पत्नी शचीने इंद्राला राखी बांधली. त्यामुळे इंद्र जिंकला आणि असुर हरले असे एका लोककथेत सांगितले आहे. जग जिंकण्याची आशा ठेवणारा सिकंदर व पोरस यांच्यामध्ये जेव्हा युद्ध झाले तेव्हा सिंकदरच्या प्रेयसीने पोरसला राखी बांधून त्याच्याकडून वचन घेतले की तो आपल्या हाताने सिकंदरला मारणार नाही. युद्धात सिकंदरला मारण्याची संधी पोरसला मिळाली पण त्याने त्याला सोडून दिले. मोगल काळात मुसलमान स्त्रिया पळवून नेत असत. म्हणून मुली एखाद्या बलशाली पुरुषाला राखी बांधून आपले रक्षण करण्याचे वचन त्याच्याकडून घेत असत. प्राचीन जैन ग्रंथात विष्णुकुमारने बळीराजाच्या कैदेतून मुनींची आजच्या दिवशीच सुटका केली होती असे वर्णन आले आहे.

देशात सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. स्त्रिया सकाळीच घराची स्वच्छता करून मिठाया बनवितात. बहिणी आपल्या भावला कुंकुम तिलक लावतात. हाताला राखी बांधतात, त्याला ओवाळतात व ईश्वराजवळ त्याच्या दीर्घायुष्याची, यशाची कामना करतात. त-हेत हेची मिठाई त्याला खाऊ घालतात. त्याच्या मोबदल्यात भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि आपल्या ऐपतीनुसार काही तरी भेटवस्तू देतो. दूर राहणाऱ्या बहिणी आपल्या भावाला पोस्टाने राखी पाठवितात.

रक्षाबंधन हे भावाबहिणीतील पवित्र भावनांचे बंधन आहे. ते आपणास कर्तव्य परायण होण्यास सांगते.

रक्षाबंधन निबंध मराठी – Essay On Raksha Bandhan in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply