Set 1: महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी – Mahatma Jyotiba Phule Nibandh Marathi

आज महाराष्ट्रातील स्त्रिया विविध क्षेत्रांत महत्त्वाची पदे सांभाळत आहेत. हे श्रेय त्या प्राप्त करू शकल्या यामागे अनेक महापुरुषांचे प्रयत्न आहेत. त्या थोर पुरुषांपैकी एक म्हणजे महात्मा जोतीराव फुले. जोतीरावांचे कार्य एवढे मोठे आहे की, जनतेने त्यांना मोठ्या खुशीने ‘महात्मा’ हे पद दिले.

जोतीरावांचा जन्म इ. स. १८२७ मध्ये झाला. त्यांचे वडील गोविंदराव फुले यांनी जोतीरावांना शिकवले आणि तेव्हाच त्यांना शिक्षणाचे महत्त्व उमगले.

जोतीरावांना समाजातील अनेक अनिष्ट रूढींनी बेचैन केले. या रूढींना ठोकरून त्यांनी मुलींसाठी शाळा काढली. सर्व जातिधर्मांतील लोकांसाठी आपल्या अंगणातील पाण्याचा हौद खुला केला. अनाथ महिला-बालके यांच्यासाठी अनाथाश्रम काढला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘शेतकऱ्यांचा असूड’ हे पुस्तक लिहिले.

इंग्रज सरकारला भारतीय शेतकऱ्याची खरी परिस्थिती समजावी म्हणून शेतकऱ्यांच्या पोशाखात ते राजाच्या दरबारात गेले. जोतीबांना समाजाकडून खूप विरोध झाला. पण त्यांना खरी साथ दिली ती त्यांच्या पत्नीने. १८९० साली जोतीरावांनी जगाचा निरोप घेतला.

महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी-Mahatma Jyotiba Phule Nibandh Marathi
महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी-Mahatma Jyotiba Phule Nibandh Marathi

Set 2: महात्मा जोतीराव फुले निबंध मराठी – Mahatma Jyotiba Phule Nibandh Marathi

महात्मा जोतिबा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ रोजी साताऱ्याला झाला. ते जातीने माळी होते. त्यांचे वडील फुले विकण्याचा व्यवसाय करीत म्हणून त्यांना फुले असे आडनाव मिळाले. ज्योतिबा खूप हुशार होते परंतु घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण थांबवावे लागले. तेव्हा त्यांच्या शेजा-याने त्यांची हुशारी बघून त्यांना पुन्हा शाळेत घालण्यासाठी त्यांच्या वडिलांचे मन वळवले. मग १८४१ साली पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कुल शाळेत ते जाऊ लागले.

शिक्षणामुळे ज्योतिबांना आत्मभान आले. त्या काळात सर्वत्र उच्च जातींचे वर्चस्व होते. खालच्या जातीतील लोकांना अन्यायाने वागवले जात होते. त्या वर्चस्वाविरूद्ध ज्योतिबा फुले उभे राहिले. अनाथ हिंदू मुलांसाठी पहिला अनाथाश्रम त्यांनीच काढला.

थॉमस पॅनेचे ‘राईट्स ऑफ मॅन’ हे पुस्तक वाचल्यावर त्यांच्या विचारात खूप बदल घडला. दलित आणि स्त्रियांनी शिक्षण घेतले तरच परिस्थितीत सुधारणा होईल असे त्यांना पटले. स्त्रियांना शिकवण्यासाठी त्यांनी पत्नी सावित्री हिला शिकवले. आणि मुलींसाठी शाळा काढली. सत्यशोधक समाज ही संस्थाही काढली. त्यांनी लिहिलेले ‘शेतक-याचा आसूड’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

अशा ह्या महामानवाचे निधन २८ नोव्हेंबर, १८९० रोजी झाले.

Set 3: महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी – Mahatma Jyotiba Phule Nibandh Marathi

महात्मा फुले हे जसे समाजसुधारक होते तसेच ते राष्ट्रसंतही होते. त्यांना सतत वाटे की सर्वांनी लिहायला-वाचायला शिकावे. शिक्षण घेतले की ज्ञान मिळते, ज्ञान मिळाले की गरिबी दूर होते, माणूस विद्येने मोठा होतो. म्हणून आपण शिकले पाहिजे असे ते सांगत.

ज्योतीराव फुले हे पुण्यात राहत होते. ते गोरगरिबांची सेवा करत. एकदा पाण्यासाठी अस्पृश्यांची बायका, मुले हातात मडकी घेऊन वणवण हिंडत होते तेंव्हा महात्मा फुले यांनी आपला पाण्याचा हौद त्यांना खुला करुन दिला. ते जातीभेद पाळीत नसत.

स्त्रियांनी शिकावे म्हणून त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई यांना शिकविले व मुलींसाठी पुण्यात पहिली शाळा सुरु केली.

महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी-Mahatma Jyotiba Phule Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply