Set 1: महागाई एक समस्या मराठी निबंध – Mahagai Ek Samasya Nibandh Marathi
महागाई ही नेहमीच वाढत असते. आपले उत्पन्न आणि आपला खर्च ह्यांचा मेळ घालणे म्हणूनच फार अवघड जात असते. अशी कशी आहे ही महागाई? जी माणसाला त्याच्या मनासारखा खर्च करू देत नाही?
गेल्या वर्षीपर्यंत शंभर रूपयांना मिळणारी तूरडाळ आज अडीचशे रूपये दराने विकली जात आहे. चहा पावडर तर ब-याच पूर्वीपासून चारशे रूपये किलो झाली आहे. खरोखरच, सामान्य माणसाच्या रोजच्या वापरातील सर्वच गोष्टी भयंकर महागल्या आहेत. महागाई ही सा-या जगातील एक फार मोठी समस्या आहे. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदी विकसित देशांना तुलनेने महागाई कमी प्रमाणात भेडसावत असली तरी भारतासारख्या विकसनशील देशात मात्र तिने भीषण स्वरूप धारण केले आहे.
पैशाची किंमत घसरल्यामुळे महागाई वाढते. कित्येक माणसे केवळ अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा भागाव्यात म्हणून राब राब राबत असतात तरी त्या गरजा जेमतेम पूर्ण होतील एवढेच पैसे त्यांना मिळतात. प्रत्येक वस्तूची किंमत गगनाला भिडल्यासारखे वाटते. महागाईचा मार प्रत्येक वर्गाला खावा लागत असला तरी त्याची झळ गरीबांना आणि असंघटित वर्गाला अधिक सोसावी लागते.
महागाई एवढी का झाली आहे आणि ती दिवसेंदिवस का वाढते आहे ह्यामागे बरीच कारणे आहेत. सर्वात महत्वाचे कारण म्हणजे उत्पादन आणि मागणीत प्रचंड तफावत आहे. त्यातच भर म्हणजे आपल्या देशात रोजच्या वापरातील वस्तूंच्या उत्पादनापेक्षा चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनावर अधिक भर दिला जातो. ज्या उत्पादनामुळे अधिक नफा मिळतो तिथेच उत्पादक पैसे लावतात.
आपला भारत शेतीप्रधान देश आहे. मौसमी पावसावर शेतीचे उत्पादन अवलंबून असते त्यामुळे वेळेवर पाऊस पडला तर ठीक, अन्यथा उत्पादन कमी होते. पूर, दुष्काळ, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींमुळेही उत्पादनावर विपरित परिणाम होतो. त्याशिवाय काळा बाजार, कृत्रिम टंचाई आणि साठेबाजी ह्यांचाही महागाईशी थेट संबंध आहे. ह्यामुळे धान्य आणि इतर वस्तू बाजारातून अदृश्य होतात आणि गोदामात लपवून ठेवल्या जातात. बाजारात त्या वस्तूची चणचण निर्माण झाली की भाव वाढतात. भाव वाढले की व्यापारी तीच वस्तू बाजारात आणतात. त्यातच भर म्हणून भारतातील सार्वजनिक वितरण व्यवस्थाही खूप सदोष आहे. दारिद्यरेषेखालील लोकांनाही स्वस्त धान्य दुकानांतून धान्य मिळत नाही. तेच धान्य दुकानदार खुल्या बाजारात चढ्या दराने विकतो.
शिवाय भारताची लोकसंख्या वाढत आहे. जिवंत असलेल्या लोकांची आयुर्मर्यादाही वाढत आहे. त्यामुळे आपोआपच महागाई वाढते. महागाईमुळे कनिष्ठ आणि मध्यम वर्गाचे हाल होतात, भ्रष्टाचार, दंगे ह्यांना आमंत्रण मिळते. देशाच्या विकासात खीळ बसते.
महागाईच्या राक्षसाला काबूत आणण्यासाठी तातडीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. केवळ कायदे करून काहीही होणार नाही. सरकारी खर्चात कपात करणे, सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करणे. काळा बाजार करणा-यांविरूद्ध आणि साठेबाजांविरूद्ध कडक कारवाई करणे, भ्रष्टाचार रोखणे, उत्पादनवाढीवर भर देणे, शेतीसाठी पूरक सोयी निर्माण करणे, पूर आणि दुष्काळ नियंत्रणासाठी ठोस पावले उचलणे हे सगळे जर झाले तर महागाईचा राक्षस नक्कीच काबूत येईल असा मला विश्वास वाटतो.
Set 2: महागाईचा भस्मासूर मराठी निबंध – Mahagai Cha Bhasmasur in Marathi
गेल्या वर्षीपर्यंत शंभर रूपयांना मिळणारी तूरडाळ आज अडीचशे रूपये दराने विकली जात आहे. चहा पावडर चारशे रूपये किलो झाली आहे. खरोखरच, सामान्य माणसाच्या रोजच्या वापरातील सर्वच गोष्टी भयंकर महागल्या आहेत. काय करावे ते समजेनासे झाले आहे.
महागाई ही सा-या जगातील एक फार मोठी समस्या आहे. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदी विकसित देशांना तुलनेने महागाई कमी प्रमाणात भेडसावत असली तरी भारतासारख्या विकसनशील देशात मात्र तिने भीषण स्वरूप धारण केले आहे. पैशाची किंमत घसरल्यामुळे महागाई वाढते. कित्येक माणसे केवळ अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा भागाव्यात म्हणून राब राब राबत असतात तरी त्या गरजा पूर्ण होतील अशी खात्री नसते. प्रत्येक वस्तूची किंमत गगनाला भिडल्यासारखे वाटते.महागाईचा मार प्रत्येक वर्गाला खावा लागत असला तरी त्याची झळ गरीबांना आणि असंघटित वर्गाला अधिक सोसावी लागते.
महागाई एवढी का झाली आहे आणि ती दिवसेंदिवस का वाढते आहे ह्यामागे बरीच कारणे आहेत. सर्वात महत्वाचे कारण म्हणजे उत्पादन आणि मागणीत प्रचंड तफावत आहे. त्यातच भर म्हणजे आपल्या देशात रोजच्या वापरातील वस्तूंच्या उत्पादनापेक्षा चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनावर अधिक भर दिला जातो. ज्या उत्पादनामुळे अधिक नफा मिळतो तिथेच उत्पादक पैसे लावतात.
आपला भारत शेतीप्रधान देश आहे. मौसमी पावसावर शेतीचे उत्पादन अवलंबून असते त्यामुळे वेळेवर पाऊस पडला तर ठीक, अन्यथा उत्पादन कमी होते. पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, अनावृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींमुळेही उत्पादनावर विपरित परिणाम होतो. त्याशिवाय काळा बाजार, कृत्रिम टंचाई आणि साठेबाजी ह्यांचाही महागाईशी थेट संबंध आहे. ह्यामुळे धान्य आणि इतर वस्तू बाजारातून अदृश्य होतात आणि गोदामात लपवून ठेवल्या जातात. बाजारात त्या वस्तूची चणचण निर्माण झाली की भाव वाढतात. भाव वाढले की व्यापारी तीच वस्तू बाजारात आणतात. त्यातच भर म्हणून भारतातील सार्वजनिक वितरण व्यवस्थाही खूप सदोष आहे. त्यामुळे दारिद्यरेषेखालील लोकांनाही स्वस्त धान्य दुकानांतून धान्य मिळत नाही. तेच धान्य दुकानदार खुल्या बाजारात चढ्या दराने विकतो.
शिवाय भारताची लोकसंख्या वाढत आहे. जिवंत असलेल्या लोकांची आयुर्मर्यादाही वाढत आहे. त्यामुळे आपोआपच महागाई वाढते. महागाईमुळे कनिष्ठ आणि मध्यम वर्गाचे हाल होतात, भ्रष्टाचार, दंगे ह्यांना आमंत्रण मिळते. देशाच्या विकासात खीळ बसते.
महागाईच्या राक्षसाला काबूत आणण्यासाठी तातडीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. केवळ कायदे करून काहीही होणार नाही. सरकारी खर्चात कपात व्हावी. कुठेही वायफळ खर्च होत नाही ना, हे डोळ्यात तेल घालून पाहिले जावे. सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करायला हवी. काळा बाजार करणा-यांविरूद्ध आणि साठेबाजांविरूद्ध कडक कारवाई करायला हवी. भ्रष्टाचार रोखायला हवा. उत्पादनवाढीवर भर दिला जायला हवा. शेतीसाठी पूरक अशा सोयी दिल्या जायला हव्यात. पूर आणि दुष्काळ नियंत्रणासाठी ठोस पावले उचललीजायला हवीत.
हे सगळे जर झाले तर महागाई काबूत येणार नाही असे होणे शक्यच नाही.
Set 3: महागाई मराठी निबंध – Mahagai Nibandh in Marathi
चलनवाढ किंवा महागाई या जगातील प्रमुख समस्या आहेत. विकसित देशांच्या तुलनेत भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. जेव्हा सरकारचा प्रशासन खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा वाढतो तेव्हा सरकार जास्त नोटा छापून खर्च करते. परिणामी चलनवाढ होते आणि मुद्रेची किंमत कमी होते. यालाच मुद्रा स्फिती म्हणतात. मुद्रेचे अवमूल्यन झाल्यामुळे महागाई वाढते. विकसित देशांमध्ये मुद्रास्फितीचा दर २ किंवा ३ टक्के असतो तेव्हा विकसनशील देशांमध्ये तो अजिबात कमी होत नाही. मगरीच्या वासलेल्या तोंडाप्रमाणे तो वाढतच जातो.
प्राचीन भारतात सोन्याचा धूर निघत होता परंतु परकीय देशांनी लुटून त्याला कंगाल करून टाकले. आधीच भारतीय गरिबीच्या जाळ्यात अडकलेले होते. वरून महागाईने उरली सुरली कसर भरून काढली.
महागाई आज दिवसेंदिवस वाढत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्ती करण्यात लोक रात्रंदिवस मरमर करतात तरी त्या पूर्ण होत नाहीत. प्रत्येक वस्तूच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत. महागाईचा मार प्रत्येक वर्गाला खावा लागत आहे. पीठ, दूध, महाग आहे. साजूक तूप तर पाहायलाही मिळत नाही. डालडा तूपही विकत घेणे शक्य नाही. वस्त्र निर्यातीत आपले भविष्य उज्ज्वल आहे पण आपल्यासाठी कापड महाग आहे. राहण्यासाठी घर बांधणे शक्य नाही. घराचे भाडे इतके वाढले की उत्पन्नाचा अर्धा भाग त्यावरच खर्च होतो. सामान्य जनता पोटावर पट्टी बांधून झोपण्यास विवश झाली आहे. लोक आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी नाइलाजाने काटकसर करतात. महागाईची चर्चा प्रत्येक जण करतो.
निवडणुकीत महागाईचा मुद्दा नेहमीच असतो. प्रत्येक सरकार आवश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याचे आश्वासन देते. परंतु उलट किमती वाढतातच. या महागाईची अनेक कारणे आहेत. याचे सर्वात प्रमुख कारण उत्पादन आणि मागणीत असलेली प्रचंड तफावत. भारतात सामान्य उपयोगाच्या वस्तूंच्या उत्पादनावर कमी आणि चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनावर जास्त लक्ष दिले जाते. कारण त्यामुळे उत्पादकांचा जास्त फायदा होतो. येथील शेतीच्या स्थितीचाही परिणाम होतो. शेती इथे मान्सूनच्या पावसावर अवलंबून असल्यामुळे तो एक जुगार बनला आहे. वेळेवर पाऊस पडला तर ठीक नाही तर उत्पादन कमी होते. पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, अवर्षणासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतीवर परिणाम होतो. काळा बाजार, साठेबाजीचाही महागाईशी प्रत्यक्ष संबंध आहे. यामुळे धान्यादी आवश्यक वस्तू बाजारातून अदृश्य होतात व गोदामात साठविल्या जातात. त्यामुळे बाजारात वस्तूंची चणचण निर्माण होते. व्यापारी वस्तूंच्या किमती वाढल्यावरच त्या गोदामातून बाहेर काढतात.
भारतातील वितरण व्यवस्थाही सदोष आहे. व्यापा-यांचा स्वार्थीपणा आणि सरकारी कर्मचाऱ्यांची लाचखोरी यांची आपापसांत मातमिळवणी झालेली असल्यामुळे महागाई वाढते. सरकार महागाई कमी करण्यासाठी योजना तयार करते परतु लालफितीच्या कारभारामुळे अनेक योजना कार्यान्वित होतच नाहीत. लोकसंख्येचा विस्फोट झाल्यामुळे महागाई वाढत आहे. लोकसंख्येचा देशाच्या अंदाजपत्रकावर पण परिणाम होतो. त्यामुळे तुटीचे अंदाजपत्रक बनते. चलनवाढ होऊन किमती वाढतात. शेजारच्या देशांमधून सतत होत राहणाऱ्या घुसखोरीमुळे निर्वासितांच्या छावण्या बनत राहिल्या तर महागाईवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. याखेरीज इतर अनेक समस्या उत्पन्न होतात. जगाच्या अर्थव्यवस्थेत तेलाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण तेलाची आयात करीत असल्यामुळे त्यावर बराच पैसा खर्च होतो. तेलाच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम महागाई वाढण्यात होतो. आपणास सतत परकीय आक्रमणाला तोंड द्यावे लागते. हेही महागाई वाढण्याचे एक कारण आहे. सध्या भारत आपल्याच भूमीवर ‘प्रॉक्सीवॉर’ करीत आहे. या युद्धात भारताने आपली सर्व साधने उपयोगात आणली आहेत. त्यामुळे चलनवाढ होऊन महागाई वाढत चालली आहे.
महागाई वाढल्यामुळे मध्यम व कनिष्ठ वर्गाची कंबर तर खचल्यासारखीच झाली आहे. त्यांना जीवनाचा आनंद अत्यल्प मिळतो कारण जीवन कसेबसे ओढत न्यावे लागते. असे लोक देशाच्या विकासात काय मदत करू शकणार? महागाईमुळे भ्रष्टाचार वाढतो, दंगे होतात, गोंधळाचे वातावरण बनते. वाढत्या महागाईने सामान्य जनतेला विवशतेच्या घेऱ्यात कैद केले आहे.
वाढत्या महागाईवर अंकुश ठेवण्यासाठी सक्रिय राष्ट्रीय नीतीची आवश्यकता आहे. ही समस्या सोडविणे सोपे नाही. केवळ कायदे तयार करून ही समस्या सुटू शकत नाही. त्यासाठी सरकारने प्रथम आपल्या पायाखाली काय जळते ते पाहिले पाहिजे. आपला प्रशासन खर्च विकसित देशांच्या बरोबरीने आहे. विकसनशील देशाने प्रशासनावर इतका खर्च करू नये अशी अपेक्षा असते म्हणून प्रथम प्रशासनाच्या खर्चात कपात केली जावी. तोट्यात चालणाऱ्या संस्था बंद केल्या जाव्यात. सरकारी कार्यालये व्यवस्थित चालण्यासाठी खंबीर पावले उचलली जावीत. भ्रष्ट आणि आळशी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जावे. रजा कमी केल्या जाव्यात. हरताळ, संप यावर बंदी घालण्यात यावी.
महागाई रोखण्यासाठी योजनाप्रणाली दुरुस्त करण्याची गरज आहे. उत्पादन वाढवावे लागेल. वितरण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करावा लागेल. शेतीसाठी उत्तम सिंचन व्यवस्था, उत्तम बियाणे, स्वस्त अवजारे उपलब्ध करून द्यावी लागतील. पूर, दुष्काळापासून बचाव करण्यासाठी राष्ट्रीय नीतीची गरज आहे. काळा बाजार, करणारे व साठेबाजांना कठोर शिक्षा करून योग्य धडा शिकविला पाहिजे. भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना पदच्युत करावे. कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा युद्ध पातळीवर प्रचार व्हावा. शेजारी देशांतून येणाऱ्या घुसखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण सीमेवर तारा लावून सुरक्षा व्यवस्था कड़क करावी. दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी व देशातील जनतेला न्याय द्यावा.
संपूर्ण अर्थव्यवस्थेवर तेलाच्या किमतीचा परिणाम होतो. म्हणून सरकारने तेलाचे मूल्य स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा. तेलाचा प्रत्येक थेंब मौल्यवान आहे याची जाणीव जनतेला करून द्यावी. “साधी राहणी उच्च विचारसरणीचे” तत्त्व अवलंबिण्यात यावे यामुळे आपण महागाई कमी करण्यास मदत करू शकू.
पुढे वाचा:
- मला लॉटरी लागली तर मराठी निबंध
- मला पडलेले गमतीदार स्वप्न
- मला पंख फुटले तर निबंध मराठी
- मला देव भेटला तर निबंध मराठी
- मरावे परी कीर्तिरूपे उरावे अर्थ
- मराठी सिनेमा बदलतोय निबंध मराठी
- मराठी बाणा निबंध मराठी
- मराठी असे आमुची मायबोली निबंध मराठी
- मनोरंजनाची आधुनिक साधने निबंध मराठी
- मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मराठी निबंध
- मदर तेरेसा मराठी निबंध
- भ्रष्टाचार निबंध मराठी
- भ्रष्टाचार संपला तर निबंध मराठी
- भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध
- भाषण कला निबंध मराठी
- भारतीय समाज आणि भारतीय स्त्री निबंध मराठी
- भारतीय संस्कृती मराठी निबंध