पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध – Pani Adva Pani Jirva Marathi

सर्व प्राणिमात्रांच्या जीवनात पाणी हे फार महत्त्वाचे आहे. पाणी म्हणजे जीवन. पण शहरातील लोकांना पाण्याची किंमत कळत नाही. ते लोक पाणी जपून वापरत नाहीत. खूप पाणी वाया घालवतात. खेड्यापाड्यांतील स्त्रियांना दूर अंतरावरून पाणी वाहून आणावे लागते. त्यांचे कष्ट लक्षात घेतले पाहिजेत. उन्हाळ्यात नदया, विहिरी आटतात. त्या वेळी लहानशा वाटीने खड्ड्यातील पाणी भरणारी मुले पाहिली की, जीव तडफडतो.

पाणी ही निसर्गाची देणगी आहे. त्यामुळेच माणसाला त्याची किंमत कळत नाही. पाण्याची टंचाई ही आता जगभर निर्माण झाली आहे. कारण जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी फार खाली गेली आहे. माणसाने जंगले नष्ट केली, बांधकाम केले. त्यामुळे जमिनीत जेवढे पाणी मुरायला हवे, तेवढे मुरत नाही.

सुदैवाने आपल्या देशात विपुल पाऊस पडतो. पण हे पाणी समुद्रात वाहून जाते. आता हे पाणी आपण जमिनीत जिरवायला हवे, साठवायला हवे. त्यासाठी तळी, बंधारे किंवा धरणे बांधली पाहिजेत. म्हणजे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. विहिरींना व नदयांना बारमहा पाणी राहील. झाडे जगतील. जंगले वाढतील. शेती चांगली होईल, माणूस सुखाने जगेल.

पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध – Pani Adva Pani Jirva Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply