तुम्हाला पावसाळ्यातील एक दिवस निबंध मराठी लिहायचा आहे का? तुम्ही Pavsalyatil Ek Divas Nibandh in Marathi शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी पावसाळ्यातील एक दिवस यावर निबंध घेऊन आलो आहोत, जे अतिशय सोप्या भाषेत लिहिले आहेत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला पावसाळ्यातील एक दिवस हा निबंध आवडेल. हा निबंध तुम्ही शाळा-कॉलेज किंवा स्पर्धा इत्यादींमध्ये लिहू शकता.

पावसाळ्यातील एक दिवस
पावसाळ्यातील एक दिवस

पावसाळ्यातील एक दिवस निबंध मराठी – Pavsalyatil Ek Divas Nibandh in Marathi

पावसाळ्यातील एक दिवस निबंध मराठी २०० शब्द – Pavsalyatil Ek Divas Nibandh in Marathi 200 Words

भारत एक मान्सूनचा देश आहे. याचा अर्थ असा की आपल्याकडे सगळे काही मान्सूनवर अवलंबून आहे ज्या महिन्यात मान्सूनचे आगमन होते आणि पाऊस चांगला पडतो, त्यावर्षी आनंदी आनंद असतो. मान्सून वेळेवर आला नाही तर दुष्काळ पडतो आणि देशात सगळीकडे वाईट परिस्थिती उद्भवते.

उन्हळ्याच्या दीर्घ सुट्यानंतर शाळा उघडल्या होत्या. जुलैचा महिना होता. अजूनही गर्मी आणि ऊन असतं. अशात मी एका दिवशी शाळेत चाललो होतो. तितक्यात जोराचा वारा घोंगावू लागला. त्यांचे वादळात रूपांतर झाले. जोराचा आवाज येऊ लागला आणि वस्तू इकडे-तिकडे उडायला लागल्या. मोठी-मोठी पाऊसाची थेंब पडू लागली होती. एक वेगळ्याच प्रकारचा आवाज ऐकायला येऊ लागला. मी जिथे दरवाज्यात उभा होतो तिथे देखील थेंब पडू लागली होती. उष्णतेपासून सुटका झाली, बरं वाटू लागलं. मातीचा गंध दरवळू लागला. लोकांनी पाऊसाचे मोठ्या मनाने स्वागत केले. सगळे समाधानी दिसले. बरीच मुले पाऊसाचा आनंद घेण्यासाठी रस्त्यावर आली. पाण्यात उड्या मारू लागली. कागदाच्या बोटी पाण्यात सोडू लागले.

रस्त्यावर जमा झालेल्या पाण्यात किंवा नदी-नाल्यातील पाण्यात पोहू लागले. सगळीडे पाण्यावर थापटी मारण्याचा ऐकू येवू लागला.

लोकांनी त्यांच्याकडील छत्र्या, रेनकोट बाहेर काढले, थोड्याच वेळात सारं वातावरण बदलून गेलं. ठिकठिकाणी पाणी जमा झालं. नाल्या तुंबल्या, अशावेळी मी घरी जाणेच पसंत केले.

रस्त्यावर सगळीकडे पाणिच पाणि जमा झाले होते. कार आदी गाड्या जात-येत असल्याने पावसाचे पाणि लोकांच्या अंगकावर उडत होतं. माझे बूट पण चांगले ओले झाले होते आणि पँटचा खालचा भाग देखील. तरीपण छान वाटत होतं सारं.

पावसाळ्यातील एक दिवस निबंध मराठी-Pavsalyatil Ek Divas Nibandh in Marathi
पावसाळ्यातील एक दिवस निबंध मराठी-Pavsalyatil Ek Divas Nibandh in Marathi

पावसाळ्यातील एक दिवस निबंध मराठी ३०० शब्द – Pavsalyatil Ek Divas Nibandh in Marathi 300 Words

पावसाळा किंवा वर्षा ऋतू हा माझ्या फारच आवडीचा ऋतू आहे. ह्या मौसमात दर वर्षी आम्ही खंडाळ्याला जातो. माझ्या बाबांच्या कंपनीचे तिथे विश्रामगृह आहे. त्यामुळे दर वर्षी तिथे जाणे आमचे अगदी ठरलेलेच असते.

ह्या वर्षीही एक शनिवार आणि रविवार आम्ही तिथे गेलो होतो. पावसाळ्यातील तो दिवस मी कधीही विसरणार नाही. ह्या वेळेस आमच्या सोबत माझी वृंदा आत्या आणि तिची मुले रवी आणि मधुरा आले होते म्हणून खूप मज्जा आली. हे विश्रामगृह म्हणजे एका पारशाच्या मालकीचा जुना ब्रिटिश काळातील बंगलाच होता. ह्या बंगल्यासमोर बाग आहे, बागेत झोपाळे आणि घसरगुंडी आहे. त्या दिवशी सकाळी रिमझिम पाऊस पडत होता. ह्या ठिकाणी गेलो की आम्हा मुलांना पावसात खेळायला आणि भिजायला पूर्ण मुभा असते. मातीच्या गंधाने आमची मने उत्फुल्ल झाली होती. त्यामुळे आमच्या मनाचे मोर जणू नाचू लागले होते.

मी रवी आणि मधुरा बाहेर बागेत पळालो. रिमझिम पावसात झोपाळ्यावर बसायला एवढी मजा आली म्हणून सांगू. त्या थंडगार वा-याने अंगशहारत होतं आणि पावसाच्या धारांत खिदळत आम्ही लांब लांब झोके घेत होतो. जरा वेळाने काय गंमत झाली की पलिकडच्या डोंगरातून ढग चक्क खालीच उतरले आणि तेही आमच्याशी खेळायला आले. बाबा, आई आणि आत्या बंगल्याच्या ओसरीवरच खुर्ध्या, टेबलं घेऊन चहा पित आणि भजी खात बसले होते. त्यांनी आम्हालाही खायला प्यायला बोलावलं होतं परंतु आम्हाला झोपाळ्यावरून तिथे जावंसं वाटतच नव्हतं.

सरते शेवटी आई, बाबा, आत्या आणि काका सर्वच जण अंगणातल्या ढगांत भिजायला आले. मग आम्ही पावसात भिजत भिजतच राजमाची पॉईंटला गेलो. तिथं एक बुट्टेवाला आडोशाला गरम गरम कणसं भाजत बसला होता. त्याच्याकडून गरम गरम कणसं घेऊन खाताना खूप मज्जा आली. मग तिथून भिजत भिजतच आम्ही आमच्या विश्रामगृहात आलो. वाटेत पावसाचे येणेजाणे चालूच होते. तेवढ्यात आम्हाला क्षितिजावर इंद्रधनुष्य दिसले. ते बघून तर सगळेच खूप आनंदले.

घरी गेल्यावर आईने आम्हा सर्वांना केस अगदी कोरडे करायला लावले आणि गरमागरम कॉफी प्यायला दिली. रात्री तर पाऊस अगदी जोरदारच पडत होता. त्याचा आवाज अगदी ताशांसारखा कौलांवरून ऐकू येत होता. रात्री कधी झोप लागली ते कळलेच नाही. दुस-या दिवशी उठलो तेव्हा पावसाचं नामोनिशाण नव्हतं आणि सूर्य छान उगवला होता. परंतु तो पावसाळी दिवस मात्र आम्ही कधीच विसरणार नव्हतो.

पावसाळ्यातील एक दिवस निबंध मराठी, Pavsalyatil Ek Divas Nibandh in Marathi

पुढे वाचा:

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh

मना घडवी संस्कार मराठी निबंध

“मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”

भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | Bhartatil Vansanpatti Essay Marathi

भारतीय लोकशाही मराठी निबंध | Bhartiya Lokshahi Marathi Nibandh

Leave a Reply