पोरक्या मुलीचे मनोगत – Porkya Muliche Manogat

मी एक अनाथ मुलगी आहे. एका बालिका आश्रमात मी राहते. ‘वात्सल्य’ हे या संस्थेचे नाव आहे. माझ्यासारख्या आणखी ६० मुली येथे राहतात. आम्हांला आमचा खरा जन्मदिवस माहीत नाही. त्यामुळे एकाच दिवशी आमचा सर्वांचा वाढदिवस साजरा केला जातो. आम्ही पोरक्या आहोत.

मला माझे आई-वडील आठवतच नाहीत. लहानपणापासून मी याच आश्रमात वाढले. मला येथे सगळे काही मिळाले. आम्हांला सांभाळणाऱ्या व शिकवणाऱ्या सर्वांना आम्ही ‘ताई’ म्हणतो. पण ‘आई’ हा शब्द येथे आम्हांला ऐकायला मिळत नाही. खरोखरच कवी यशवंतांची ही ओळ मला पटते…

‘ती हाक येई कानी। मज होई शोककारी।।’

मनात येते की, मला आई असती, तर ती तिच्याजवळ हट्ट केला असता. मग ती माझ्यावर खोटे खोटे रागावली असती, पण तिने माझा तो हट्ट पूर्ण केला असता. माझ्या यशाने ती सुखावली असती व तो आनंद मला तिच्या डोळ्यांत दिसला असता. तिने पाठीवरून हात फिरवल्यावर मला खूप समाधान मिळाले असते. पण आज या सर्व सुखांना मी मुकले आहे!

पुढे वाचा:

Leave a Reply