पावसाळ्यातील निसर्ग निबंध मराठी – Pavsalyatil Nisarg Nibandh Marathi

पाऊस हा मोठा जादूगार आहे. पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यात निसर्ग होरपळून निघालेला असतो. तापलेली जमीन, भुंडे डोंगर, निष्पर्ण वृक्ष सगळेजण पावसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात.

दरवर्षी सारा निसर्ग मोठ्या उत्साहाने पहिल्या पावसाचे स्वागत करतो. तृप्त झालेली भूमी आसमंत गंधित करते. साऱ्या वातावरणात एक चैतन्य फुलून येते.

उन्हाळ्यात ओकेबोके दिसणारे तपकिरी रंगाचे डोंगर, टेकड्या हळूहळू हिरव्यागार दिसू लागतात. झाडावेलींवरची धूळ नाहीशी होऊन हिरवीकंच झालेली झाडे आनंदाने डोलू लागतात. पावसाळा जसाजसा स्थिरावतो तशीतशी झाडे रंगीबेरंगी फुलांनी बहरून जातात. अशा या पावसाळ्यातील रम्य वातावरण पाहून तर बालकवींना ‘श्रावणमास’ ही कविता स्फुरली. सगळीकडच्या नदयाही तुडुंब भरून तृप्ततेने वाहत असतात.

पावसाळ्यात पक्षीही आनंदी आणि तृप्त झालेले आढळतात. भिजलेले पंख फडफडवत ते आपल्या घरट्यांतून ये-जा करत असतात. कारण हा पावसाळा सर्वांना समृद्ध भविष्याचे आश्वासन देतो.

पावसाळ्यातील निसर्ग निबंध मराठी

पुढे वाचा:

Leave a Reply