पुस्तके आपली मार्गदर्शक निबंध – Pustake Aapli Margdarshak

“They are never alone, who are accompanied by noble thoughts” ‘ज्यांना श्रेष्ठ विचारांची साथ असते ते कधीच एकटे नसतात.’ हे श्रेष्ठ विचार आपल्याला मिळतात पुस्तकांमधून. त्यात उपलब्ध असलेले ज्ञान सार्वत्रिक व सार्वकालिक असते. पुस्तके आपल्या खऱ्या मित्रासारखी सदैव आपल्या मदतीस तयार असतात. महाभारत, गीता, रामचरित मानस, गुरूग्रंथसाहेब इ. ग्रंथ असे आहेत की जे प्रत्येक संकटाच्या वेळी आपले मनोबल वाढवितात.

पुस्तके अनेक प्रकारे आपल्याशी मित्रवत व्यवहार करतात. काही पुस्तके आपणास जिवंत राहण्यास शिकवितात, काही पुस्तके आपणास कष्ट सहन करण्यास शिकवितात, तर काही पुस्तके जगात कसे वावरावे हे शिकवतात. आत्मचरित्रे, थोर व्यक्तींची चरित्रे आपणास प्रेरणा देतात, तर कथा कांदबऱ्या व कविता आपल्याला भरपूर आनंद देतात. जगातील सर्व ज्ञान पुस्तकांमध्येच आहे व त्यांच्याद्वारेच ते जगासमोर येते. पुस्तके आपले असे मित्र आहेत ज्यांची आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. त्यांची आपल्याबद्दल एवढीच आशा असते की आपण त्यांना नीट सांभाळून ठेवावे म्हणजे ते गरजेनुसार आपणास मदत करतील. त्यांच्याद्वारे आपण जगातील प्रत्येक पदार्थ, विषय व त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टींचे ज्ञान प्राप्त करू शकतो. ज्ञान देण्याव्यतिरिक्त एका खऱ्या हितचिंतकाप्रमाणे आपले धैर्य वाढवितात, साहस, आशा, प्रेरणा देतात.

अनेक इतिहास प्रसिद्ध व्यक्ती अशा आहेत ज्यांनी चांगल्या ग्रंथालयाला जास्त महत्त्व दिले. कारण त्यांच्यासाठी पुस्तके तात्काळ उपलब्ध होणारा सेवक, सहायक, मित्र, मंत्री, गुरू सर्व काही होते. गांधीजी म्हणत पुस्तके हिऱ्यापेक्षाही अधिक किमती आहेत. पुस्तक वाचताना माणूस स्वत:ला विसरून जातो. पुस्तकातील पात्रांशी तो तादात्म्य पावतो.

पुस्तकांनी अनेक व्यक्तींचे जीवन घडविले आहे. असंख्य वाचकांचे मनोरंजन केले आहे. पुस्तकांचे अध्ययन, पारायण, आत्मिक विकास व मनोरंजनाचे साधन आहे. पुस्तकांसारख्या मित्रांच्या सहवासात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व चारित्र्याचा विकास होतो.

पुस्तके आपली मार्गदर्शक निबंध – Pustake Aapli Margdarshak

पुढे वाचा:

Leave a Reply