पिंजऱ्यातील पक्षांचे आत्मवृत्त – Pinjryatil Pakshache Atmakatha Marathi

या महाशय, आपलीच वाट पाहत होतो. उचला दोन खडे आणि द्या भिरकावून आमच्या अंगावर. खडे फेकण्यातच आपला पुरूषार्थ. मी थबकलो. पिंजऱ्यातील पक्षी एका तारेवर आपली अंग चोरून बसला होता. जणुकाही आपण उडू शकतो हेच विसरला होता. त्याचा असा अवतार पाहून मला त्याची दया आली. “पक्षी-भाऊ असे चिडलात का ?” मी विचारले. तेव्हा पक्षीभाऊंनी डोळे किलकिले करुन माझ्याकडे पाहिले आणि तोंड उघडले.

चिडून काय करणार ! वैतागलोय ! वैतागलोय या पिंजऱ्यातील जीवनाला ! माझे स्वातंत्र्य हिरावून घेऊन या पिंजऱ्यात डांबून ठेवलेत आणि वर येताजाता अंगावर खडे टाकता, काठीने डिवचता, फळांच्या साली किंवा बिया अंगावर टाकता, आम्हाला खेळणे समजलात की काय !

या पक्षीजगताचा मी राजा आहे काय दशा केलीत तुम्ही माझी ! लहानपणापासून मला राजपूत्र म्हणून घेण्यात धन्यता वाटे. मला माझ्या बळाबद्दल विश्वास होता पण तुम्ही कपटाने आणि निर्दयतेने जाळे टाकले आणि मी त्यात मी अलगद अडकलो गेलो आणि तुमच्या पिंजऱ्यात बंदिस्त झालो.

आता मी इथे अश्रु ढाळत माझ्या सुटकेची वाट पाहत आहे. लहानपणापासून भोगलेले स्वच्छंद जीवन सवंगड्यासोबत केलेली गंमत तसेच वनातील ताजी गोड फळे खात कसा स्वैर जगत होतो याची आठवण काढून जगत आहे. लहानपणी मी उडू लागताच माझ्या आईवडिलांना केवढा आनंद झाला होता. अभिमानाने त्यांची छाती फुगली होती. पण ते स्वच्छंदी जीवन अल्पकाळच ठरले आणि मी तुमच्या कडील पिंजऱ्यात बंदिवान झालो.

प्रथम मला वाटले थोड्या वेळाने तुम्ही माझी सुटका कराल. मला माझ्या पक्षीराज्यात पुन्हा जाता येईल पण एक वर्ष होत आले तरी तुम्हाला माझी दया येत नाही इथे तुम्ही मला जेवणही वेळेवर देत नाही, तेही खराब असते. असले अन्न खायला नको वाटतं पण करणार काय ? तुम्ही माझे प्रदर्शन लावल्याप्रमाणे प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला माझ्या पिंजऱ्याजवळ घेऊन येता. मला टोचता. माझ्याकडून आवाज करवून घेता आणि आवाज न केल्यास नाराज होता.

उबग आलाय इथल्या जीवनाचा ! तुमची करमणूक होते, जातो पण मला किती यातना होतात याचा कोणीही विचार करीत नाही. मला माझ्या आईची खूप आठवण येते. तिची भेट या जन्मी होईल असे मात्र वाटते नाही. तुम्ही अतिशय क्रुर आणि निर्दयी आहात. माझा जीव

पक्ष्याची ही करुण कहाणी ऐकून मन सुन झाले. स्वातंत्र्यावर प्रेम करणारा माणूस मुक्या प्राण्यांना पारतंत्र्यात ठेवतोय, गुलाम बनतोय. गुलामांचे सुल्तान होण्यात तो का धन्यता मानतोय ! मला समजले नाही.

पिंजऱ्यातील पक्षांचे आत्मवृत्त

पुढे वाचा:

Leave a Reply