पुस्तकाची कैफियत निबंध मराठी – Pustakachi Kaifiyat Marathi Nibandh

मी पुस्तक वाचत होते. वाचता वाचता मी ते नकळत जोराने उलटे दुमडले. तेवढ्यात “आई ग!” हे दु:खाचे उद्गार ऐकू आले. मी लक्षपूर्वक पाहिले. ते पुस्तकच माझ्याशी बोलत होते!

“मुली, किती निष्ठुरपणे वागता तुम्ही आमच्याशी! आम्हांला कसेही दुमडता. आमची पाने फाडता. आम्हांला दप्तरात जबरदस्तीने कोंबता. आम्ही गुदमरून जातो अशा वेळी ! काहीजण आमच्या पानांवर काहीही गिरबटतात. कसलीही चित्रे काढतात. किती सांगू?

“मुली, तुमच्यासाठी आम्ही गोष्टी, गाणी, नाटके घेऊन येतो. थोर पुरुषांची चरित्रे सांगतो. छान छान चित्रे तुम्हांला दाखवतो. जगाची माहिती तुम्हांला देतो. विविध प्रकारचे ज्ञान देतो. पण तुमच्यापैकी कितीजण वाचतात? तुम्ही जर वाचन केले नाही, तर तुमची प्रगती होणार नाही.

“मुली, तू मला दु:ख दिलेस. पण तू निदान वाचत तरी होतीस. यातच मला आनंद आहे.” असे बोलून पुस्तक शांत झाले.

पुस्तकाची कैफियत निबंध मराठी – Pustakachi Kaifiyat Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply