योगासने मराठी निबंध – Essay On Yoga In Marathi

योगसाधनेचा शोध सर्वप्रथम आपल्या भारतातच लागला. तिथून हे शास्त्र जगभर गेले.

आजकाल लोकांमध्ये योगसाधना करण्याची आवड निर्माण झालेली दिसते. टीव्हीवरच्या अनेक वाहिन्यांवरून भल्या पहाटेपासून काही तास योगासने दाखवतात. त्यांचा लाभही बरेचजण घरच्या घरी घेत असतात. बाबा रामदेव त्यासाठीच प्रसिद्ध आहेत हे आपल्याला ठाऊक आहेच.

योगसाधनेचे लाभ शरीरासाठी पुष्कळच आहेत. त्यामुळे शरीर लवचिक राहाते, शरीराच्या आतील यंत्रणा मजबूत बनतात. त्यामुळे आपली कार्यक्षमता वाढते म्हणूनच आजकालची तरूण मंडळीही योगसाधनेकडे आकर्षित होत आहेत. रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा ते टाळण्यासाठी आधीपासून काळजी घेणे हे केव्हाही उचितच असते.

माणसाचे शरीर योगसाधनेद्वारे विकास पावते. योगसाधना करणा-या माणसाचे शरीर आणि त्याची ताकद बराच काळपर्यंत तरूण माणसासारखीच राहाते.योगामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते.मन आणि शरीराचा जवळचा संबंध असतो. योगसाधना करण्यामुळे मन शांत होते. आजकाल खूप तणावाचे जीवन झाले आहे. माणूस लोकर थकतो. त्याची चिडचिड होते. जीवनाने पुढ्यात टाकलेले पेच सोडवायचे कसे ह्या प्रश्नांमुळे तो आपले स्वास्थ्य घालवून बसतो. अशावेळी मन शांत आणि स्थिर असेल तर शरीर कितीही प्रकारचे कष्ट झेलण्यास सिद्ध होते. योगासने केल्यामुळे ते आपल्याला शक्य होते.

शवासन, प्राणायाम, योगनिद्रा, कपालभाती इत्यादींच्या आधाराने मानसिक ताणतणाव दूर करता येतो. म्हणूनच सुखी जीवनासाठी दररोज १५ मिनिटे तरी योगसाधनेत व्यतीत केली पाहिजेत. योगसाधना ही जीवन सुखी आणि शांत करण्याची कला आहे. त्यामुळे शरीर शांत आणि निरोगी राहाते, बुद्धी तीक्ष्ण होते, सूर्यनमस्कार हा सर्वांगाला व्यायाम देणारा एक सुंदर प्रकार आहे. दिवसाला बारा सूर्यनमस्कार जो नियमितपणे घालेल त्या माणसालाला कधीही फार काळ व्याधी सतावणार नाहीत. प्राणायाम, कपालभाती, ॐ चा उच्चार आदि करण्यामुळे दीर्घ श्वसन होते आणि आपली फुफ्फुसे आणि श्वसनमार्ग भक्कम बनतात. हलासन, पवनमुक्तासन, मार्जारासन, धनुरासन, शलभासन आदी आसनांमुळे पोटाचे, पाठीच्या मणक्यांचे आणि कमरेचे चांगले व्यायाम घडून येतात. वज्रासनात बसल्याने पचन चांगले होते. उष्ट्रासनामुळे पाठीला चांगला आराम मिळतो.

म्हणूनच साधारण वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षांपासून मुलांना योगासने करायला शिकवले पाहिजे. काहीकाही शाळांमध्येही हल्ली योगविद्येचा एक तास असतो. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना योगसाधनेची चांगली सवय लागते. असे आहे योगांचे महत्व.

योगासने मराठी निबंध – Essay On Yoga In Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply