प्रामाणिकपणा मराठी निबंध – Pramanikpana in Marathi Essay
‘शीलं परम् भूषणम्।’ असे म्हणतात. सद्वर्तन हाच सर्वांत मोठा अलंकार! प्रामाणिकपणा हा सद्वर्तनातील सर्वांत मोठा गुण आहे. माणूस प्रामाणिक असला, तर त्याच्या हातून वाईट गोष्टी घडतच नाहीत.
प्रामाणिक राहणे हे फारच अवघड असते. त्यासाठी फार मोठे धाडस लागते. पुष्कळ वेळा आपण प्रामाणिकपणाने वागलो, तर आपले नुकसान होऊ शकते, अशी स्थिती असते. पण ते नुकसान स्वीकारण्याची आपली तयारी हवी. तेवढे धैर्य आपल्याजवळ असले पाहिजे. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे हे रघुनाथराव पेशवे यांच्यापुढे दबले नाहीत. त्यांनी रघुनाथरावांना ‘देहान्त प्रायश्चित्ता’ची शिक्षा सुनावलीच!
आज आपल्या देशात सर्व क्षेत्रांत भ्रष्टाचार माजला आहे. प्रामाणिकपणा नसलेल्या व्यक्तीच भ्रष्टाचार करू शकतात. भ्रष्टाचारामुळे देशाचे फार मोठे नुकसान होत आहे. या भ्रष्टाचाराला फक्त प्रामाणिक लोकच आळा घालू शकतील. म्हणूनच, प्रामाणिकपणाचा संस्कार आपल्या घरी आपल्या लहान वयातच झाला पाहिजे.
पुढे वाचा:
- प्रार्थना चे महत्व मराठी निबंध
- प्रातः कालीन भ्रमण निबंध
- प्राणी संग्रहालयास भेट निबंध मराठी
- प्राणी आमचे मित्र मराठी निबंध
- प्रसंगी अखंडित वाचीत जावे निबंध मराठी
- प्रवासाचे महत्त्व निबंध मराठी
- प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे
- प्रयत्नांती परमेश्वर मराठी निबंध
- प्रदूषण निबंध मराठी
- प्रदुषणाचा भस्मासुर निबंध मराठी
- प्रदर्शनास/आनंद नगरीस भेट निबंध मराठी
- प्रगत भारतीय महिला निबंध मराठी
- पोस्टमन निबंध मराठी
- बैल पोळा निबंध मराठी
- पोलीस निबंध मराठी
- पोरक्या मुलीचे मनोगत
- पृथ्वीवर प्रदूषणाचे दुष्परिणाम