फळ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध

माझा जन्म एका कारखान्यात झाला. नंतर मी एका मोठ्या दुकानात येऊन बसलो. त्या दुकानात एका शाळेचे वर्गशिक्षक आले. ते इयत्ता ५ वीचे होते. त्यांनी मला विकत घेतले व वर्गात घेऊन आले. दुसऱ्या दिवसापासून त्यांनी माझ्या अंगावर लिहिण्यास सुरुवात केली. पहिलाच तास गणिताचा. त्यांनी फटाफट मुलांना गणिते सोडवून दिली. असे मराठी, हिन्दी याप्रमाणे तास झाले. नंतर मधली सुट्टी झाली. मुलांचा डबा खाऊन झाल्यावर मुलांनी माझ्या अंगावर चित्र काढण्यास सुरूवात केली. कोणी गाणी लिहीत होते. तर कोणी गणिते सोडवीत होते. अशा गंमतीजमती मुले करत होती.

असा रोज मी मुलांमध्ये व शिक्षकांमध्ये रममाण होतो. सकाळचे वर्ग व दुपारचे वर्ग असे १४ ते १५ तास माझे मजेत जातात. मात्र संध्याकाळी मी एकटाच असतो. केव्हा सकाळ होईल याची सारखी वाट पाहात राहतो. माझ्यावर एकएक नव नवीन सुविचार लिहिले जातात. तसेच स्वातंत्र्यदिनाला माझ्यावर झेंडा काढतात. रंगीत खडूंनी रंगवतात. माझ्यावर सूचना लिहितात. बातम्या लिहितात. त्यामुळे सर्वांना बातम्यां कळतात. माझा सर्वांना खूप उपयोग होतो.

आता मी खूप म्हातारा झालो आहे. त्यामुळे माझ्यावर नीटसा खडू चालत नाही. तरीपण मला असे वाटते की मी नेहमी शिक्षकांच्या व मुलांच्या सहवासात राहावे.

फळ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध

पुढे वाचा:

Leave a Reply