प्रातः कालीन भ्रमण निबंध – Prat Kalin Brahman Nibandh Marathi
कुणा कवीने बरोबरच म्हटले आहे की प्रात:काळी फिरायला जाण्यामुळे प्रकृती सुधारते. सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणे आवश्यक आहे. “Early to bed and early to rise makes healthy, wealthy and wise.” ही म्हण आचरणात आणावी. खेड्यात राहणाऱ्या लोकांना प्रदूषणमुक्त हवा आपोआपच मिळते. परंतु महानगरांत कारखाने, वाहने यातून निघणारा धूर हवेत मिसळतो. त्यामुळे हवा अशुद्ध होते. स्वच्छ, सुगंधित, थंड हवा फक्त पहाटेच मिळू शकते. पहाटे फिरावयास जाण्याची सवय खूपच चांगली आहे.
आम्ही रोहिणी अपार्टमेंटमध्ये राहतो. याच्या आजूबाजूला पुष्कळ मोकळी जागा आहे. येथील स्पोर्टस् कॉम्प्लेक्सजवळ खूप मोठा बगिचा आहे. बागेच्या मध्यभागी कारंजे आहे. हिरव्यागार हिरवळीच्या मैदानात अधूनमधून मोठे वृक्ष आणि अनेक प्रकारची फुलझाडे आहेत. मी रोज याच बागेत फिरावयास जातो.
या विशाल उद्यानात अनेक लोक सामूहिक योगासने करताना दिसतात. कुठे तरुण विद्यार्थी फुटबॉल खेळताना दिसतात, कुठे स्त्रिया आसने करतात तर वृद्ध मंडळी भजन, कीर्तन करतात. उद्यानात भगव्या झेंड्याभोवती पांढरा सदरा आणि खाकी चड्डी घातलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक निरनिराळे व्यायामाचे प्रकार करताना दिसतात. ते कधी कबड्डी खेळतात तर कधी काठीचे हात करताना दिसतात. कधी ते राष्ट्रभक्तीची गीते गातात. त्यांच्या कार्यक्रमाची सुरवात वंदेमातरम् गीताने होते. फिरणे झाल्यानंतर काही लोक व्यायाम, काही दंड बैठका काढतात, काही योगाभ्यास करतात.
सकाळी फिरावयास जाण्यामुळे अनेक फायदे होतात. सकाळी लवकर उठण्यामुळे दिवसभर उत्साह राहतो. पहाटेचा थंड वारा फुफ्फुसांसाठी खूप चांगला असतो. त्यामुळे स्मरणशक्ती तीव्र होते. शरीरात एक नवी चेतना उत्पन्न होते. मात्र त्यात नियमितपणा असावा. सकाळचे फिरणे एक शक्तिप्रद औषध आहे. यामुळे मन व शरीर प्रफुल्लित राहते. कार्यक्षमता वाढते. थकवा जाणवत नाही. सर्व वयाच्या लोकांसाठी हा एक सहज सोपा व्यायाम प्रकार आहे.
पुढे वाचा:
- प्राणी संग्रहालयास भेट निबंध मराठी
- प्राणी आमचे मित्र मराठी निबंध
- प्रसंगी अखंडित वाचीत जावे निबंध मराठी
- प्रवासाचे महत्त्व निबंध मराठी
- प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे
- प्रयत्नांती परमेश्वर मराठी निबंध
- प्रदूषण निबंध मराठी
- प्रदुषणाचा भस्मासुर निबंध मराठी
- प्रदर्शनास/आनंद नगरीस भेट निबंध मराठी
- प्रगत भारतीय महिला निबंध मराठी
- पोस्टमन निबंध मराठी
- बैल पोळा निबंध मराठी
- पोलीस निबंध मराठी
- पोरक्या मुलीचे मनोगत
- पृथ्वीवर प्रदूषणाचे दुष्परिणाम
- पुस्तके आपली मार्गदर्शक निबंध
- पुस्तकाची कैफियत निबंध मराठी
- पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध