थोर क्रान्तिकारक भगत सिंह निबंध मराठी – Bhagat Singh Nibandh in Marathi
भगतसिंह हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील खूप मोठे क्रान्तीकारक होऊन गेले. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर, १९०७ रोजी पंजाबातील खटकर कलान ह्या ठिकाणी झाला. सध्या त्यांचे जन्मस्थान पाकिस्तानात आहे. त्यांच्या मातेचे नाव विद्यावती तर पित्याचे नाव किशनसिंह होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण लाहोर येथे झाले. त्यांचे वडील आणि काका दोघेही स्वातंत्र्य चळवळीचे नेते होते त्यामुळे त्यांचा प्रभाव भगतसिंहांवर पडला. ब्रिटिशांची जुलमी सत्ता उलथून पाडण्याचे स्वप्न त्यांनी लहानपणापासूनच पाहिले. लहानपणी त्यांना वाटायचे की आपण शेतात बंदुकीची रोपे लावू म्हणजे बंदुकांचे पीक त्यातून आले की त्या घेऊन आपल्याला ब्रिटिशांशी लढता येईल. महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत ते तरूण वयात सामील झाले होते. ते वृत्तीने समाजवादी आणि प्रजासत्ताकवादी होते. भारताला जर स्वातंत्र्य हवे असेल तर सशस्त्र क्रांतीचा मार्गच अनुसरला पाहिजे असे त्यांचे ठाम मत बनले होते.’ इन्किलाब झिंदाबाद’ ही घोषणा सर्वप्रथम त्यांनी दिली. त्यांच्या लिखाणातून त्यांनी क्रांतीचा संदेश दिला. ते स्वतः वृत्तीने नास्तिक होते. ” मी नास्तिक का आहे?” ह्या नावाचे एक पुस्तकही त्यांनी लिहिले.
जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांच्या मनावर खूप खोल परिणाम झाला होता. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी समविचारी मंडळींचे गट बनत असताना त्यांची सुखदेव आणि राजगुरू ह्यांच्याशी भेट झाली. त्यानंतर चंद्रशेखर आझाद ह्यांच्या मदतीने त्यांनी ‘ हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टीह्या संघटनेची स्थापना केली. त्यांना फक्त भारताचे स्वातंत्र्य मिळवून थांबायचे नव्हते तर भारतात समाजवाद आणायचा होता. १९२८ साली सायमन कमिशन भारतात आले त्यांच्या निषेधार्थ सायमन परत जा’ अशा घोषणा देत मोर्चे काढण्यात आले. लाहोर येथे काढलेल्या अशा एका मोर्चाच्या वेळेस झालेल्या लाठीमारात पंजाबातील वरिष्ठ नेते लाला लजपतराय गंभीर जखमी होऊन मरण पावले. ह्या हत्येचा सूड घेण्यासाठी भगतसिंगांनी सॉण्डर्स ह्या राजनैतिक अधिका-याची हत्या केली आणि ते लाहोरबाहेर निघून गेले. त्यानंतर जेव्हा ब्रिटिश सरकारने ‘ कर्मचारी संघटना वादविवाद कायदा’ आणि ‘ सार्वजनिक सुरक्षा कायदा’ हे दोन अन्यायकारक कायदे भारतात लागू केले तेव्हा त्याविरूद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांनी आणि बटुकेश्वर दत्त ह्यांनी मिळून संसदेत बॉम्ब फेकले आणि ‘इन्किलाब झिंदाबाद’ च्या घोषणा देत पत्रके फेकली.
ब्रिटिश सरकारने त्यांना अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला आणि २३ मार्च, १९३१ ह्या दिवशी म्हणजे वयाच्या अवघ्या सविसाव्या वर्षी त्यांना सुखदेव आणि राजगुरू ह्यांच्यासह फासावर देण्यात आले.
भारताला स्वातंत्र्य मिळण्याचे एकच स्वप्न उराशी बाळगून त्यांनी शेवटल्या श्वासापर्यंत लढा दिला अशा ह्या भगतसिंहांचे ऋण आपण कधीही विसरता कामा नये.
सरदार भगतसिंह निबंध मराठी – Sardar Bhagat Singh Nibandh in Marathi
सरदार भगतसिंह यांना शहीद-ए-आजम म्हणून देश ओळखतो. ते एक महान क्रांतीकारक देशभक्त आणि निडर तरूण होते. त्यांचे पूर्वज देखील देशभक्ती आणि क्रांतीकार्यासाठी ओळखले जात होते. सन १९०७ च्या ऑक्टोबर महिन्यात सरदार भगतसिंह यांचा जन्म झाला होता. बालपणापासूनच त्यांच्यात देशभक्ती आणि स्वातंत्र्याची प्रबळ भावना होती. वयाच्या १५ वर्षापासूनच ते पंजाबच्या क्रांतीकारी गुप्त कारवायामध्ये भाग घेऊ लागले. देशभक्तीच्या प्रबळ इच्छेपोटीच त्यांनी लग्न करायला नकार दिला होता. आणि लाहोरवरून कानपुरला आले होते. इथे त्यांची भेट गणेशशंकर, बटुकेश्वर दत्त, शचीद्र सन्याल आदी इतर क्रांतीकारकासोबत झाला.
सायमन कमिशन भारतात आल्यावर त्याला तीव्र विरोध करण्यात आला. त्याच्या विरोधात लाहोरात देखील एक विशाल मोर्चा काढण्यात आला. त्याचे नेतृत्त्व लाला लजपतरॉय करीत होते, पोलिसांनी त्यांच्यावर निर्दयीपणे लाठीचार्ज केला. त्यामुळेच या पंजाब केसरी लालाजींचा १७ नोव्हेंबर १९२५ला देहावसन झाले. त्याचा बदला म्हणून भगतसिंहाने सॉडर्स अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले. साँडर्स एक मोठा पोलिस अधिकारी होता आणि लालाजींच्या मृत्यूस कारणीभूत देखील.
८ एप्रिल, १९२९ च्या असेम्बली बॉम्ब स्फोटात देखील भगतसिंह आणि त्यांचे सहकारी बटुकेश्वर दत्त याचा हात होता. भगतसिंह आणि त्यांच्या सहकार्यावर खटले दाखल करण्यात आले. निबंध रचना साँडर्सच्या हत्येसाठी त्यांना मृत्यूदंड देण्यात आला. शेवटी २३ मार्च, १९३१ ला भगतसिंह, सुखदेव, राजगुरूला लाहोरात फासी देण्यात आली. हे तिन्ही देशभक्त आणि क्रांतीकारी स्वातंत्र्याचे गीत गात-गात सहर्ष फासावर चढले.
भगतसिंहाचे आत्म-बलिदान, धाडस, विरता आणि अमर्याद देशभक्ती सर्वच कसं अद्वितीय होतं. ते आपल्याला नेहमीच प्रेरणा देत रहातील.
पुढे वाचा:
- डॉ. होमी भाभा निबंध मराठी
- डॉ. जगदीशचंद्र बोस निबंध मराठी
- डॉ ए पी जे अब्दुल कलाम मराठी निबंध
- गुरू नानक निबंध मराठी
- राजगुरू मराठी निबंध
- संत एकनाथ मराठी निबंध
- विठ्ठल कामत मराठी निबंध
- इंदिरा गांधी निबंध मराठी
- लाल बहादूर शास्त्री निबंध मराठी
- स्वामी विवेकानंद निबंध मराठी
- कल्पना चावला मराठी निबंध
- अपंग आणि मी निबंध मराठी
- अन्न हे पूर्णब्रह्म निबंध मराठी
- अनाथालयास भेट निबंध मराठी
- अंधश्रद्धेचा बळी समाज निबंध मराठी
- अंधश्रद्धा निबंध मराठी
- अंतराळ संशोधन निबंध मराठी
- दूरदर्शन नसते तर निबंध मराठी
- लाल बहादूर शास्त्री निबंध
- स्वामी विवेकानंद निबंध मराठी