Set 1: म्हाताऱ्या बैलाचे मनोगत मराठी निबंध – Mhatarya Bailache Manogat Essay In Marathi

मी आता थकलो आहे. त्यामुळे मी आता कोणतेच काम करत नाही. पण आजवर मी खूप कष्ट केले आहेत. माझा जन्म याच गोठ्यात झाला आहे. माझी आई तांबू सर्वांची खूप लाडकी होती. तिचा मी गो-हा. त्यामुळे माझेही खूप लाड झाले.

खूप काळजी घेतली माझ्या मालकांनी माझी. माझे मालक मला रोज पौष्टिक खाणे हेरवा चारा देत. त्यामुळे माझी चांगली वाढ झाली. मग मी शेतावर खूप काम करत असे. नांगर ओढत असे. कधी कधी मी घरातील गाडी ओढत असे. श्रम करून थकलो, तर माझे मालक मला गूळ खाऊ घालत.

पोळ्याच्या दिवशी तर माझा मोठा रुबाब असे. मला खूप सजवले जाई. माझी मिरवणूक काढत असत. आता मी म्हातारा झालो आहे. पण माझे मालक मला त्रास देत नाहीत. मी आता काहीही काम करत नाही. पण ते मला पूर्वीप्रमाणेच खाऊ घालतात. माझी देखभाल करतात. आजही पोळ्याच्या दिवशी मला ओवाळून पुरणपोळी मिळते. खरोखर मी माझ्या मालकाला दुवा देतो.

Set 2: म्हाताऱ्या बैलाचे मनोगत मराठी निबंध – Mhatarya Bailache Manogat Essay In Marathi

एकदा मी अशीच शिवारातून भटकत होते. रानातील रानमेवा खात, निसर्गाचा आनंद घेत फिरत-फिरत आंब्याच्या एका डेरेदार झाडाजवळ आले.

त्या झाडाच्या सावलीला एक म्हातारा बैल निवांत रवंथ करीत होता. माझी सहजच त्या बैलाकडे नजर गेली. तो मला बोलावत आहे असे मला वाटले. म्हणून मी थोडे पुढे गेले.

“ये बाळ, बैस. मी आता म्हातारा झालोय म्हणून तू माझी हेटाळणी तर करत नाहीस ना ! सभोवार दिसणाऱ्या शेतात मी खूप राबलो आहे. नांगरट, कुळवट करताना याच शेतात माझा देह झिजलाय. आज मला नांगर ओढवत नाही. कसलेही औताचे काम जमत नाही. माझा मालक मला वाटेल तसे बोलतो खायलाही नीट देत नाही.

मी ऐन उमेदीत होतो त्यावेळी हाच मालक माझ्या कामावर खूश असायचा. माझे गोडवे गायचा. खायला मळीचा कणदार हिरवा चारा आणून घालायचा. गूळ, हरभरा असा चांगला चांगला खुराक मला द्यायचा. बेंदरादिवशी तर माझी खूप सेवा करायचा. मला स्वच्छ धुवून आणून शिंगे रंगवायचा. अंडी, गूळ, तेल, हळव्या पाजायचा. माझ्या अंगावर झूल घालायचा. माझ्यावर प्रेम करायचा.

आज मात्र माझी हेळसांड होत आहे. मला चारा पाणी वेळेवर मिळत नाही. मालकाने गोठ्यात दोन उमदी बैलं आणलेली आहेत. त्यांच्याकडेच मालकाचे अधिक लक्ष असते. तरीही मी मेल्यावर माझ्या कातड्याचे जोडे मालकाच्या पायात असावे असे मला वाटते.

बैलाचे मनोगत ऐकून मी सुन्न झाले.

Set 3: म्हाताऱ्या बैलाचे मनोगत मराठी निबंध – Mhatarya Bailache Manogat Essay In Marathi

खेळता खेळता गोठयाजवळ गेलो बैलापुढे वैरण टाकताना क्षीण आवाजातील त्याचे बोलणे माझ्या कानावर आले “कायरे बाळा मला वैरण टाकतोस काय ? तुझे तरी लक्ष आहे का या मुक्या सेवकावर? नाहीतरी आज माझे हाल कुत्राही खात नाही. तुच काळजी घेतोस त्यामुळे आत्तापर्यंत तग धरुन आहे. अरे माझ्या तरुणपणात शौर्यगाथा गाणारे माझे मालक आज माझ्याकडे दुकून देखील पाहत नाहीत कारण त्याच्या दृष्टीने मी आता काही कामाचा राहिलो नाही. त्यांनी तरी का दयावे माझ्याकडे लक्ष ? ‘नुसता खायला काळ आणि धरणीला भार’ असा मी शेवटच्या श्वासाची वाट पाहतो आहे.’

माझ्या तरुणपणातील गोड आठवणी आठवत जगतो आहे. कसेबसे दिवस काढतो आहे. अरे बाळा, काय सांगू ते सोन्याचे दिवस ! मी नुकताच तारुण्यात पदार्पण करत होतो तारुण्याचा माज अंगावर लेवून प्रत्येकापुढे डुरकी टाकत होतो. आपल्या ताकदीचा नमुना दाखवत होतो व समोरच्याची शक्ती अजमावत होतो. कारण होतोच तसा मी पांढराशुभ्र तरणाबांड ! कपाळावर काळसर ठिपका म्हणजे नये म्हणून लावलेली तीटच जणू काही ! नजर लागू

तुमच्या घरातील कपिला गाईच्या पोटी जन्म घेतला तेव्हा होणारे कौतुक पाहून आपल्या भाग्याचा हेवा करत आपल्याच मस्तीत जगत होतो. मालक मला खूप जपत होते. तुपात बुडवून कणकेचे गोळे, रोट चारायचे, हिरवे लुसलुशीत गवत खास माझ्यासाठी आणायचे, कच्ची अंडी खायला घालून मला धष्टपुष्ट बनवत होते. शर्यतीसाठी मला त्यांना उमदे बनवायचे होते.

माझ्या तरुणपणात मी अनेक शर्यती जिंकलो अनेकवेळा विजयाचे हार मिरवत गावातून फिरलो. गर्वाने छाती फुलून येत असे. ‘पोळा’ हा सण तरी माझ्या कौतुकाची नांदीच त्या दिवशी माझ्या शिंगाना रंगवून, बाशिंगे बांधून पितळी टोप्यांनी सजवले जाई. पाठीवर मखमलची झूल टाकून पंचारतीने ओवाळून माझी गावातून माझ्या इतर भाईबंदासोबत मिरवणूक काढली जाई. माझ्या मालकाचा ऊर माझ्या विषयीच्या अभिमानाने भरुन येई. मला कुठे ठेवूनि कुठे नको असे होवून जाई पण हळुहळु दुष्काळ पडू लागला. अन्नधान्य, पाणी यांची टंचाई जाणवू लागली. पहिले एक दोन वर्ष साठवणीतले अन्नधान्य, चारा, पाणी पुरले पण दुष्काळ काही संपेना. तहानभूकेने सर्व मनुष्य प्राणी मरुन जाऊ लागले. इतका लाडका असुनही माझ्या मालकाने मला दूरच्या गावी नेऊन विकायचे ठरवले. त्यांच्याच पोटाला काही नाही व माझा सांभाळ करणे त्यांना जाचक होऊ लागले त्यामुळे नाईलाजाने अगदी माफक किमतीत त्याने मला तुम्हाला विकले.

केवढा पिळवटला होता त्याचा जीव ! पण असहाय परिस्थितीत दुसरा पर्यायच नव्हता. मला देखील बेचैन झाले होते पण इलाज नव्हता. म्हणून मी देखील समजून घेतले. त्यांची कसोटी पाहणे गैर होते आता तरी मी थकलो आहे. माझी गात्रे शिथील पडली आहेत पण नाउमेद न होता माझा मृत्यूयेईपर्यंत तुम्हाला मदत करावयाची आहे. तेव्हाच आमच्या जन्माचे सार्थक होणार आहे. मी आता माझ्या कौतुकाने भरुन पावलो आहे त्यामुळे मृत्यूची वाट पाहत शेष जीवन कंठीत आहे. तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करत आहे.

म्हाताऱ्या बैलाचे मनोगत मराठी निबंध – Mhatarya Bailache Manogat Essay In Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply