मराठी सिनेमा बदलतोय निबंध मराठी

सिनेमा हे मनुष्याचे प्रमुख करमणूकीचे केंद्र आहे. सिनेमा मग कोठेही म्हणजे यात्रेतील तंबूत असो, सिनेमा गृहात असो की मल्टीप्लेक्स चित्रपट गृहा मधील असो, निखळ मनोरंजन देतो. सुरवातीला मूकपटांची निर्मिती झाली व विज्ञानतंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या बोलपटाची निर्मिती झाली. यापूर्वीच प्रथम मूकपट ‘आलमआरा’ प्रदर्शित झाला होता.

हे सर्व चित्रपट कृष्णधवल स्वरुपात होते. तेव्हा स्त्रियांना चित्रपटात किंवा रंगभूमीवर काम करण्यासाठी मूभा नव्हती. त्यामुळे पुरुषच स्त्रीपात्रे रंगवित असत. गायक, गायिका देखील ते स्वत:च असत. पूर्वीच्याकाळी पौराणिक चित्रपट, देवदेवतांच्या जन्मकथा यांचेच चित्रण असे. काळ बदलला तसे चित्रपटांचे विषय आणि स्वरुपदेखील बदलत गेले,

मानवी स्वभाव, तत्कालीन समाजस्थिती, राजकारण त्यांची गृहिते आणि गुपिते, राजेमहाराजे, ऐतिहासिक समाजसुधारक त्यांची कार्ये, पौराणिक राजे यांच्या प्रेमकथा यांच्या रसभरीत कथा चित्रण करत, त्याचबरोबर शैक्षणिक, पुढारी वृत्तीचे चित्रीकरण होत असे. सर्व कलाकार व प्रेक्षकही उच्चविद्याविभूषित असत. त्यानंतर ही संत, पंत, लावणीप्रधान, घराणेशाही यांचेही विषय चित्रित केले गेले. संतांचे कार्य, संतसाहित्य, अभंग, ओव्या यांची गुंफण, पूर्वीच्या लढाया, पराक्रम, शौर्यकथा, शाहिरी, लावणीप्रधान चित्रपटांना वाव मिळाला. पूर्वी सुलतानी लढायांच्या मुळे शाहिरी आणि लावणीवर अधारित तसेच पाटीलशाहीचा प्रभाव होता. त्यांच्यावर आधारित कवने करणारे, पंतकवी प्रसिद्धीच्या झोकात आले. सैन्याला स्फूरण चढण्यासाठी शाहिरांनी रचलेले पोवाडे व समरगीते गाजली. तसेच त्याकाळी दूरदर्शन, संगणक यांचे शोध लागले नव्हते त्यामुळे दिवसभर काम करुन आलेला शीण घालवण्यासाठी शेतकरीवर्ग, कामकरी संध्याकाळी देवळात जमत. संतांचे अभंग, भारुड, कीर्तने गात ब्रम्हानंदी एक होऊन जात स्वत:चे देहभान विसरुन हरिनामात तल्लीन होत.

परंतु हल्ली चित्रपटाचे विषय व स्वरुप फार बदललेले आहे. मनोरंजन किंवा ज्ञानरंजन ऐवजी ओंगळ आणि मारधाड प्रकारचे चित्रपट बनतात. आधीच आपली आजची पिढी पाश्चात्य पद्धतीची, वेशभूषा, राहणी आणि खानपान यांचा कित्ता गिरवत आहे. चित्रपटातील नायक, नायिका यांच्यात स्वतःची छबी पाहिली जाते. त्यामुळे त्यांची चाल, वेशभूषा आणि सवय यांचेच अंधानुकरण केले जाते. मग ते व्यसन असो की व्यवसाय असो. यामुळे आजचा प्रेक्षक स्वत:च्या करियरऐवजी चैनीचे जीवन जगण्यातच धन्यता मानत आहे.

चंगळवाद वाढत चालला आहे. काम, मेहनत न करता पैसा मिळवण्याचा कल वाढत आहे. याचाच परिणाम म्हणून खंडणी, अपहरण, चोऱ्या, दरोडे, दादगिरी यांचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी प्रेम, नाती, आईवडिलांचा आदर राखणेही दुर्मिळ झाले आहे. हॉटेलमध्ये जाणे, शॉपिंग करणे, पाटर्या करणे यातच त्यांचा अधिक वेळ जातो. चित्रपट हे वास्तव जीवन नसून मनोरंजनात्मक आहे हे विसरुन. त्याप्रमाणेच वर्तन असते व वास्तवाकडे कानाडोळा केला जातो.

पुढे वाचा:

Leave a Reply