मी वाढवलेले रोपटे मराठी निबंध
मला शाळेत रोपटे न्यायचे होते. मी गाजराचा देठाजवळचा तुकडा कापून एका वाटीत ठेवला. मग तो तुकडा अर्धा बुडेल इतके पाणी त्यात घातले. याचे आता रोपटे कधी होणार अशी मला उत्सुकता वाटू लागली. पहिले ५-६ दिवस काहीच चिन्ह दिसेना. त्यानंतर एके दिवशी गाजरावर एक पोपटी ठिपका दिसला.
मला खूप आनंद झाला. मी रोज निरीक्षण करू लागले. तो ठिपका आता मोठा होऊ लागला. थोड्याच दिवसांत लहानसा अंकुर दिसू लागला. तो अंकुर म्हणजे घट्ट मिटलेली पाने होती. एके दिवशी ती पाने उलगडली. आहाहा! किती सुंदर पाने होती ती! तीन पाने एकमेकांना चिकटावीत, तसे एकेक पान होते. मी पानांना हळूच हात लावला. अत्यंत नाजूक इवलीशी पाने ! हिरवा रंग !
मग मी ते रोपटे कुंडीत लावले. रोज पाणी घालू लागले. वितीएवढे वाढले, तेव्हा शाळेत घेऊन गेले. रोपट्याची सगळी माहिती बाईंना सांगितली. बाईंनी मला शाबासकी दिली.
पुढे वाचा:
- मी मासा झालो असतो तर मराठी निबंध
- मी बाभूळ आहे मराठी निबंध
- मी फुलपाखरू झाले तर मराठी निबंध
- मी पाहिलेल्या वेगवेगळ्या वाटा निबंध मराठी
- मी पाहिलेले निसर्गरम्य ठिकाण निबंध मराठी
- मी पाहिलेली धार्मिक क्षेत्रे निबंध मराठी
- मी पाहिलेला सूर्यास्त निबंध मराठी
- मी पाहिलेला वृद्धाश्रम निबंध मराठी
- मी पाहिलेला महापूर निबंध मराठी
- मी पाहिलेला डोंबाऱ्याचा खेळ
- मी पहिल्यांदा आगगाडीने गेलो तेव्हा निबंध मराठी
- मी पंतप्रधान झाले तर निबंध मराठी
- मी ढग झालो तेव्हा निबंध मराठी
- मी डॉक्टर झालो तर मराठी निबंध