Set 1: भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर निबंध मराठी – Peacock Nibandh in Marathi

मध्यंतरी वृत्तपत्रात एक बातमी वाचली. पुण्याच्या पक्षि-उद्यानातील बारा मोरांची कोणीतरी हत्या केली होती. मन हळहळले. मोराचा सुंदर पिसारा हाच त्याच्या घाताला कारण झाला होता. माणसांच्या निर्दय, स्वार्थी वृत्तीचा राग आला.

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे, म्हणून खरे तर त्याला जपायला हो मोर हा सर्वांचा आवडता पक्षी आहे. त्याच्या अंगावरचे आणि पिसाऱ्यावरचे विविध रंग पाहून ‘मोरपंखी रंग असे त्या रंगाचे नाव रूढ झाले आहे, त्याचे चमकदार निळे हिरद अंग सर्वांना आनंदित करते. त्याचे पंख लांब आणि रंगीबेरंगी असतात. त्याच्या डोक्यावरील छानशा तुयामुळे तो रुबाबदार दिसतो.

प्राचीन काळापासून मोराचा सन्मानपूर्वक उल्लेख केला जातो. प्रत्यक्ष विक्थेची देवता असणाऱ्या सरस्वतीचे तो वाहन आहे. कवी, चित्रकार, नर्तक अशा कलावंतांचा हा आवडता पक्षी आहे. नृत्य करताना मोराचे अनुकरण अनेकदा केले जाते.

मोर हा शेतकऱ्याचा मित्रच आहे. साप, उंदीर इत्यादी उपद्रवी प्राण्यांना तो खातो. जंगलात झाडाझुडपांच्या आडोशाने तो राहतो. पाऊस सुरू झाला की, मोर आनंदित होऊन पिसारा फुलवून नृत्य करतो, तेव्हा पाहणाऱ्यांचे डोळे तृप्त होतात.

Set 2: भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर निबंध मराठी – Peacock Nibandh in Marathi

मोर हा एक सुंदर पक्षी आहे. आमच्या भारताचा राष्ट्रीय पक्षी होण्याचा सन्मान ह्या पक्ष्यास मिळाला त्यात नवल असे काहीच नाही. सौंदर्याचे मूर्त स्वरूप असलेला हा पक्षी सर्वच भारतीयांना प्रिय आहे. विद्येची देवता सरस्वती हिचे वाहनही मोरच आहे.

मोराच्या पाठीवर तेजस्वी निळ्या आणि मोरपिशी रंगाचा पिसारा असतो. त्याच्या पंखांना हिरेच जडवले आहेत की काय असा भास होतो. त्याची मान निळसर असते आणि त्याच्या डोक्यावर कोंबड्यासारखा तुरा असतो. मोराच्या मादीजवळ मात्र असे काहीच सौंदर्य नसते म्हणून तिला लांडोर असे म्हणतात. पावसाळ्यात आकाशात जेव्हा मेघ दाटून येतात तेव्हा हा पिसारा फुलवून मोर नाच करतो. पिसायाचे ओझे सांभाळणारे त्याचे पाय चांगले दणकट असतात.

धान्य आणि लहानसहान किडे ह्यावर मोराची उपजीविका चालते. मोर हा कळप करून राहाणारा पक्षी आहे. कोंबड्याप्रमाणेच त्यालाही फारसे उडता येत नाही. त्याचे आणि सापाचे वैर असते.

आपल्या इथे कावळे, चिमण्या जशा मोकळेपणी फिरतात तसे राजस्थान आणि गुजरातच्या वाळवंटी भागात मोर फिरत असतात.ते घराच्या अंगणातही येतात तेव्हा ते दृश्य पाहाणे मोठे विलोभनीय असते.मोर ‘माओमाओ’ ह्या स्वरात ओरडतो. त्याच्या स्वराला केकावली असे म्हणतात. मराठीतील सुप्रसिद्ध कवी मोरोपंत ह्यांनी केकावली हे काव्य लिहिले आहे. संस्कृत कवी कालिदास ह्यांच्याही साहित्यात मोराचा उल्लेख येतो.

मोरपिसांचा उपयोग पूर्वी पंखे बनवायला होत असे. तसेच खेड्यापाड्यात येणारा वासुदेवही मोरपिसांची टोपी घालीत असे. महाराष्ट्रात मोराची चिंचोली नामक गाव आहे. तिथे भरपूर मोर आहेत. कुठल्याही प्राणी संग्रहालयात मोर हा लहान मुलांचा आकर्षणबिंदू असतो. काहीकाही प्राणीसंग्रहालयात पांढरा मोरसुद्धा असतो परंतुरंगीबेरंगी मोराची सर त्या पांढ-या मोराला येत नाही.

मला मोरपीस खूप आवडते. पुस्तकातली खूण म्हणून मी एक मोरपीसच ठेवलेले आहे. असा हा मोर म्हणजेच आपला राष्ट्रीय पक्षी मला खूप आवडतो.

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर निबंध मराठी – Peacock Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply