पोलीस निबंध मराठी – Police Nibandh Marathi

देशातील कायदा आणि सुव्यवस्था ह्यांचे पालन करण्याचे काम पोलिसांचे असते. सैन्य परकीय शत्रूपासून आपले रक्षण करते त्याप्रमाणे पोलीस देशांतर्गत गुन्हेगारांपासून आपले रक्षण करतात.

आपल्या देशात इंग्रजांनी पोलीसखाते सुरू केले. त्यापूर्वी प्रत्येक राजाकडे कोतवाल असत. इंग्रजांनी पोलीसखाते सुरू केले तेव्हा वरच्या हुद्द्यांवरचे अधिकारी इंग्रजच असत. स्वातंत्र्य मिळाल्यावर मात्र परिस्थिती बदलली आणि पोलीस खात्यात भारतीयांना स्थान मिळू लागले. पोलिस खात्यातही अनेक विभाग असतात. केंद्रीय राखीव पोलीस दल, वाहतूक पोलीस, सामान्य पोलीस, रेल्वे पोलीस, सशस्त्र पोलीस दल, गुप्तपोलीस दल असे ते विभाग आहेत.सुशिक्षित, भरपूर उंची असलेल्या, निरोगी आणि दणकट तरूणतरूणींना पोलीस खात्यात भरती करून घेतले जाते. त्यासाठी त्यांना खास परीक्षा द्यावी लागते.

प्रत्येक देशाचे कायदेकानू ठरलेले असतात. सामान्य नागरिकांनी त्यांचे पालन करावे अशी सरकारची अपेक्षा असते. त्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिक कायदे पालन करीत असतातही.परंतु समाजात असेही काही वाईट लोक असतात जे कायदे तोडून गुन्हे करतात. हे समाजकंटक चोरीमारी, खून, अंमली पदार्थांची तस्करी, लहान मुलांचे आणि मुलींचे अपहरण, खंडणी उकळणे, जुगार, गावठी दारू इत्यादी गैरउद्योगात गुंतलेले असतात. अशा उद्योगांपासून त्यांना रोखणे आणि सामान्य नागरिकांना त्यांचे जीवन सुरळीतपणे जगता यावे म्हणून मदत करणे हे पोलिसांचे मुख्य कार्य असते.

त्याशिवाय हल्ली दहशतवादाचा खूपच प्रसार झालेला असल्यामुळे पोलिसांचे काम अधिकच अवघड होऊन बसले आहे. मोठमोठ्या नेत्यांची सुरक्षा, कुठेतरी बॉम्ब असल्याचा फोन आला तर लगेच तिथे जाऊन पाहाणी करणे आणि खरोखरच बॉम्ब असल्यास तो निकामी करणे अशी कामे पोलीसांना आपला जीव धोक्यात घालून करावी लागतात.

इतर सरकारी कर्मचा-यांच्या मानाने पोलिसांचे काम जिकीरीचे असल्याने त्यांना चांगले वेतन दिले जाते. सरकारी घरे राहायला मिळतात. कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचा-याला राष्ट्रपतीपदक दिले जाते. उल्लेखनीय कार्य करणा-या पोलीस अधिकायाचा सत्कार जनताही करते.

असा आहे पोलीस जनतेचा मित्र.

पोलीस निबंध मराठी – Police Nibandh Marathi

एक पोलिस आपला चांगला मित्र असतो. तो आपले रक्षण करतो. आपल्याला चोरी, लुटपाट, हिंसा आणि अव्यवस्थेपासून वाचवतो, त्याचे हे कर्तव्यच असते की कसल्याही प्रकारची अव्यवस्था होवू नये. त्याला हे पहावे लागते की नागरीक नियमाचे पालन्करतात की नाही आणि शांततेनं राहातात की नाही. पोलिसांमुळेच आपण सुखासमाधानाने जगत असतो. तो रात्रंदिवस पहारा देत आपल्या सुरक्षेसाठी तैनात असतो.

तो गुन्हेगारांना पकडून ठाण्यात हजर करतो आणि त्यांना न्यायालयापूढे हजर करतो. रस्त्यावर ट्रॅफिक नियंत्रणाची जबाबदारी देखील त्याच्यावर असते. आपल्याला तो हातात काठी घेऊन फिरताना दिसतो. कधी-कधी त्याच्या हातात आपल्याला बंदूक पण पहायला मिळते, खाकी वर्दी हा त्याचा ड्रेस असतो, म्हणून त्याला ओळखणे सोपे असते. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, मोर्चेकऱ्यांना नियंत्रणात ठेवणे आदी त्याचं काम असतं.

देशात ठिकठिकाणी ठाणे किंवा पोलिस स्टेशन असते. पोलिस त्या ठिकाणी हजेरी लावत असतात. त्यांचा जास्तीत जास्त वेळ सुरक्षा आणि पहारा देण्यात जातो. परंतु ही फार खेदाची गोष्ट आहे की त्यांना अंत्यत कमी पगार मिळतो. इतर सोयी देखील नसल्यासारख्याच आहेत. सरकारने त्यांच्या या स्थितीकडे लक्ष दिले पाहिजे. हा अभाव असल्याने अनेक पोलिस जास्त उत्पन्नासाठी इतर मार्गाचा अवलंब करताना दिसतात. म्हणून त्यांना आपण लाच घेताना पहातो, किंवा मग गुन्हेगारासोबत हातमिळवणी करताना पहातो. आपले पण हे कर्तव्य आहे की आपण पोलिसांना त्यांच्या कामात पूर्णपणे मदत करावी.

पोलीस निबंध मराठी – Essay On Police in Marathi

ज्याप्रमाणे सैनिक परकीय शत्रूपासून देशाचे रक्षण करतात त्याचप्रमाणे गुन्हेगारांपासून पोलिस आपले रक्षण करतात. प्रत्येक राष्ट्राचे स्वतःचे कायदे असतात. देशातील नागरिक त्या कायद्यांचे पालन करीत असतात. परंतु काही वाईट लोक कायदा तोडून करून राष्ट्रविरोधी कारवाया करण्यात गुंतलेले असतात. पोलिस त्यांना पकडतात व न्यायालयात हजर करतात.

पोलिसखात्याचे अनेक विभाग असतात. उदाहरणार्थ केंद्रीय राखीव पोलिस दल, वाहतूक पोलिस सामान्य पोलिस, सशस्त्र पोलिस दल, गुप्तचर पोलिस दल इत्यादी. प्रत्येक राज्यात स्वतंत्र पोलिस दल असते. सुशिक्षित, भरपूर उंची असणारे, निरोगी तरुण-तरुणी पोलिस दलात असतात. त्यांचा गणवेश खाकी असतो. पोलिसांना राहण्यासाठी पोलिस वसाहती असतात. पोलीस चौकी हे पोलिसांचे कार्यालय असते. पोलिस आयुक्तालय हे मुख्य कार्यालय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असते. कनिष्ठ पोलिस कार्यालयावर त्याचे नियंत्रण असते.

पोलिसांचे काम फार कठीण असते. नेत्यांची सुरक्षितता, त्यांच्या विविध मोर्त्यांच्या वेळची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, हरताळ, धरणे, बंद असताना रक्षण करणे, चोर डाकूपासून सामान्य जनतेचे रक्षण करणे ही पोलिसांचीच जबाबदारी असते. पोलिस कर्मचाऱ्यांना चोवीस तास संकटाशी झगडावे लागते. चोर-डाकुंशी चकमक झाल्यास, जमावाने दगडफेक केल्यास पोलिस जखमी होतात. थंडी, ऊन पावसात त्यांना आपले कर्तव्य करावेच लागते. निरनिराळ्या प्रकारच्या गुन्हेगारांना पकडून न्यायालयात सादर करणे ही पोलिसांचीच जबाबदारी असते. व्यक्तिगत भांडणे मिटविणे, चोरी गेलेला माल परत मिळविणे या बाबी पण पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात येतात.

इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिस कर्मचाऱ्यांना चांगले वेतन मिळते. त्यांना एक महिन्याचे अतिरिक्त वेतन आणि विशेष भत्ते दिले जातात. शासकीय निवासस्थाने राहण्यास दिली जातात. त्यांनी शांत मनाने आपले कर्तव्य बजवावे यासाठी त्यांना या सर्व सोयी दिल्या जातात. प्रत्येक पोलिस ठाण्यात टेलिफोनची सोय असते. वेळप्रसंगी गुन्हेगारांविरुद्ध त्यांना हत्यार वापरता येते.

अन्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसाचे कार्य विशेष महत्त्वाचे असते. समाजात कायदा व सुव्यवस्था ठेवणे, बलवानापासून निर्बलांचे रक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. कर्तव्यनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार राष्ट्रपती पदक देऊन करण्यात येतो. विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलिसांचा सत्कार नागरिक स्वेच्छेने करतात. अशा या जनतेच्या रक्षकाला माझे विनम्र अभिवादन !

पोलिस तुमचा मित्र निबंध मराठी – Police Tumcha Mitra Marathi Nibandh

माझ्या वडिलांचे मित्र सरदेशमुख काका हे पोलीस अधिकारी आहेत. ते आमच्याकडे कधीकधी येतात तेव्हा त्यांचा रूबाब पाहून मला खूप कौतुक वाटते. परंतु ते मला म्हणतात, ” अरे, तुला हा वरवरचा रूबाब दिसतो, परंतु आम्हा पोलिस खात्यातील लोकांना किती ताणतणावांना समोरे जावे लागते ते तुला कळायचे नाही.”

देशातील कायदा आणि सुव्यवस्था ह्यांचे पालन करण्याचे काम पोलिसांचे असते. सैन्य परकीय शत्रूपासून आपले रक्षण करते त्याप्रमाणे पोलीस देशांतर्गत गुन्हेगारांपासून आपले रक्षण करतात. ह्याचा अर्थ पोलीस आपले मित्रच आहेत.

आपल्या देशात इंग्रजांनी पोलीसखाते सुरू केले. त्यापूर्वी प्रत्येक राजाकडे कोतवाल असत. इंग्रजांनी पोलीसखाते सुरू केले तेव्हा वरच्या हुद्द्यांवरचे अधिकारी इंग्रजच असत. त्या वेळचे पोलीस हे काही जनतेचे मित्र नव्हते. ते केवळ इंग्रजांचे हुकुम पाळणारे त्यांचे स्वामीनिष्ठ सेवक होते. स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीतील लोकांवर ते लाठीमार आणि वेळप्रंसगी गोळीबारही करीत. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर परिस्थिती बदलली. आणि पोलीस हे जनतेचे सेवक आणि रक्षणकर्ते झाले.

पोलिस खात्यातही अनेक विभाग असतात. केंद्रीय राखीव पोलीस दल, वाहतूक पोलीस, सामान्य पोलीस, रेल्वे पोलीस, सशस्त्र पोलीस दल, गुप्तपोलीस दल असे ते विभाग आहेत. सुशिक्षित, भरपूर उंची असलेल्या, निरोगी आणि दणकट तरूणतरूणींना पोलीस खात्यात भरती करून घेतले जाते. त्यासाठी त्यांना खास परीक्षा द्यावी लागते.

प्रत्येक देशाचे कायदेकानू ठरलेले असतात. सामान्य नागरिकांनी त्यांचे पालन करावे अशी सरकारची अपेक्षा असते. त्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिक कायदे पालन करीत असतातही. परंतु समाजात असेही काही वाईट लोक असतात जे कायदे तोडून गुन्हे करतात.

हे समाजकंटक चोरीमारी, खून, अंमली पदार्थांची तस्करी, लहान मुलांचे आणि मुलींचे अपहरण, खंडणी उकळणे, जुगार, गावठी दारू इत्यादी गैरउद्योगात गुंतलेले असतात. अशा उद्योगांपासून त्यांना रोखणे आणि सामान्य नागरिकांना त्यांचे जीवन सुरळीतपणे जगता यावे म्हणून मदत करणे हे पोलिसांचे मुख्य कार्य असते. म्हणूनच पोलीस हा आपला मित्र आहे असे आपण मानले पाहेज.

त्याशिवाय हल्ली दहशतवादाचा खूपच प्रसार झालेला असल्यामुळे पोलिसांचे काम अधिकच अवघड होऊन बसले आहे. मोठमोठ्या नेत्यांची सुरक्षा, कुठेतरी बॉम्ब असल्याचा फोन आला तर लगेच तिथे जाऊन पाहाणी करणे आणि खरोखरच बॉम्ब असल्यास तो निकामी करणे अशी कामे पोलीसांना आपला जीव धोक्यात घालून करावी लागतात.
इतर सरकारी कर्मचा-यांच्या मानाने पोलिसांचे काम जिकीरीचे असल्याने त्यांना चांगले वेतन दिले जाते. सरकारी घरे राहायला मिळतात. कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचा-याला राष्ट्रपतीपदक दिले जाते. उल्लेखनीय कार्य करणा-या पोलीस अधिका-याचा सत्कार जनताही करते.

एके काळी स्कॉटलंड यार्ड पोलिसांनंतर मुंबई पोलिसांचे कर्बगारीत दुसरे नाव होते. परंतु हल्ली भ्रष्टाचार, लाचलुचपत, राजकारण्यांची ढवळाढवळ, वाढत्या नगराच्या मानाने कमी मनुष्यबळ इत्यादी कारणांमुळे पोलिसांचे नाव कलंकित झाले आहे. त्यामुळेच आज पोलिस कुणाला मित्र वाटत नाहीतर, पोलिसांशी संबंध टाळण्याकडेच लोकांचा कल असतो.

ही परिस्थिती बदलायला हवी आणि पोलिस ख-या अर्थाने जनतेचा मित्र व्हायला हवा.

पोलीस निबंध मराठी – Police Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply