Netaji Subhash Chandra Bose Essay in Marathi: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी झाला आणि 18 ऑगस्ट 1945 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते फक्त 48 वर्षांचे होते. ते एक महान भारतीय राष्ट्रवादी नेते होते ज्यांनी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्यासाठी मोठ्या धैर्याने लढा दिला. नेताजी हे 1920 आणि 1930 च्या दशकात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे मुक्त-उत्साही, तरुण आणि प्रमुख नेते होते. ते 1938 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले, त्यांना 1939 मध्ये काढून टाकण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताचे क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक होते ज्यांनी खूप संघर्ष केला आणि मोठ्या भारतीय जनतेला स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरित केले.

नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी निबंध
नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी निबंध

नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी निबंध – Netaji Subhash Chandra Bose Essay in Marathi

नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी निबंध 200 शब्द – Netaji Subhash Chandra Bose Essay in Marathi 200 Words

भारताला स्वांतत्र्य मिळवून देण्यात ज्यांचे मोलाचे योगदान लाभले अशा महान नेत्यांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा समावेश होतो. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी झाला.

नेताजी सुभाषचंद्र बोस हे उच्चविद्याभूषित होते. त्यांनी आय.सी.एस्.ची परीक्षा इंग्लंडला दिली होती. त्यानंतर त्यांना भारतात एक लेखी परीक्षा द्यावी लागली. त्या परीक्षेतील परिच्छेदातील एका ओळीने सुभाषचंद्र बोस भडकलेच “Indian soldiers are generally dishonest” (भारतीय सैनिक सामान्यतः बेइमान असतात) ही ती ओळ. सुभाषचंद्रांनी संचालकांना त्याचा जाब विचारला; पण संचालकाचे उद्धट उत्तर ऐकून त्यांनी ती प्रश्नप्रत्रिका फाडून टाकली व उच्चपदस्थ नोकरीवर पाणी सोडले.

बाणेदार, देशाभिमानी आणि स्वाभिमानी नेताजींनी भारतीय स्वांतत्र्य लढ्यात उडी घेतली आणि स्वातंत्र्य लढ्याची चळवळ अधिकच आक्रमक झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आपल्या विरुद्ध उठाव होईल म्हणून इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना बंगालमधील अलिपूरच्या तुरुंगात डांबून ठेवले. सुभाषबाबूही काही कमी नव्हते. त्यांनी तुरूंगात अन्न त्याग केला. इंग्रज सरकार गडबडले व सुभाषबाबूंना मुक्त केले; पण पुन्हा त्यांना त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवले. तेथूनही ते मौलवी साहेबाच्या वेशातून निसटून रावळपिंडीला गेले.

सुभाषबाबूंनी इंग्रज सरकारला अनेक हादरे दिले. १९४२ च्या चले जाव च्या चळवळीत ते अग्रेसर होते. त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन करून सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. ‘जय हिंद’ची घोषणा दिली. आपल्या सैन्याला ‘चलो दिल्ली’चा आदेश दिला.

कदम कदम बढाये जा खुशी के गीत गाये जा!

या त्यांच्या रणगीताने दाही दिशा निनादल्या, असे होते सुभाषचंद्र बोस!

नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी निबंध–Netaji Subhash Chandra Bose Essay in Marathi

नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी निबंध 300 शब्द – Netaji Subhash Chandra Bose Essay in Marathi 300 Words

भारत देश स्वतंत्र व्हावा ह्यासाठी ज्या महान नेत्यांनी योगदान दिले त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.

त्यांचा जन्म २३ जानेवारी, १८९७ रोजी कटक येथे झाला. त्यांचे पिता जानकीदास बोस हे प्रसिद्ध वकील होते. सुभाषबाबूंचे प्राथमिक शिक्षण कटक येथेच झाले. १९१३ साली ते मॅट्रीक झाले आणि कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजातून बीएच्या परीक्षेत प्रथम वर्गात उत्तीर्णही झाले. त्यांना सरकारी नोकरी लगेच मिळाली खरी परंतु त्यांच्या मनात दुसरेच काहीतरी भव्य स्वप्न होते. फार काळ ह्या गुलामगिरीच्या नोकरीत त्यांचे मन रमले नाही आणि त्यांनी लौकरच ती नोकरी सोडून दिली. त्यानंतर बंगालमधील प्रसिद्ध देशभक्त चित्तरंजन दास ह्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घ्यायला सुरूवात केली.

सुरूवातीला तेही कॉन्ग्रेसमध्येच होते. गांधीजींच्या असहकार चळवळीत त्यांनी भाग घेतला होता तसेच मिठाच्या सत्याग्रहातही भाग घेतला होता. परंतु ते वृत्तीने जहाल विचारांचे होते.

कॉन्ग्रेसच्या मवाळ दृष्टिकोनाशी न पटल्यामुळे त्यांनी कॉन्ग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि फॉर्वर्ड ब्लॉक नावाचा वेगळा पक्ष काढला. ह्या पक्षाचा उद्देश होता संपूर्ण स्वराज्य आणि हिंदूमुस्लिम ऐक्य. नेताजींच्या कारवायांमुळे सरकारने त्यांना तुरुंगात टाकले परंतु १९४० साली प्रकृती बरी नसल्याकारणाने त्यांना तुरुंगातून सोडून दिले गेले आणि घरीच त्यांच्यावर नजरकैद ठेवण्यात आली. परंतु १९४१ साली आपल्या ब्रिटिश पहारेक-याची नजर चुकवून त्यांनी घरातून पळ काढला. तिथून ते पठाणाचा वेष धारण करून अफगाणिस्तानात गेले आणि तिथून पुढे जर्मनीला गेले.

जर्मनी हा ब्रिटिशांचा शत्रूदेश होता त्यामुळे तिथे नेताजींना आश्रय मिळाला. मग जर्मन रेडियोवरून त्यांनी स्वातंत्र्याचा संदेशही दिला. तिथून नेताजी १९४२ मध्ये जपानला गेले. तिथे त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.’ तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, अशी त्यांची घोषणा होती. त्यांनी मणीपूर राज्यातील इंफाळ येथे ब्रिटिश सैन्याशी युद्धसुद्धा केले. पुढे जपानवर अमेरिकेने केलेल्या अणूबॉम्बच्या हल्ल्यामुळे जपानने शरणागती पत्करली आणि नेताजींच्या सैनिकांना पकडण्यात आले. २३ ऑगस्ट, १९४५ रोजी टोकियो रेडियोने बातमी दिली की नेताजींचे विमान दुर्घटनेत निधन झाले. परंतु आजतागायत ह्या श्रेष्ठ मानवाच्या मृत्यूचे गूढ तसेच कायम आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी निबंध 350 शब्द – Netaji Subhash Chandra Bose Essay in Marathi 350 Words

देशाला स्वतंत्र करण्यात ज्या महान नेत्यांनी विशेष योगदान दिले त्यातील एक सुभाषचंद्र बोस होत. “तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा।” या त्यांच्या घोषणेमुळे साऱ्या देशात नवचैतन्य संचारले. हजारो देशवासी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. ते म्हणत, “मैं रहूँ न रहूँ आझाद रहे हिन्दुस्तान मेरा”

सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ ला कटक येथे झाला. त्यांचे वडील जानकीदास बोस हे एक प्रसिद्ध वकील होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कटकलाच झाले. १९१३ मध्ये ते मॅट्रिक पास झाले. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी बी.ए. ची परीक्षा प्रथम श्रेणीत पास केली. लगेच त्यांना सरकारी नोकरी मिळाली परंतु भारताची वाईट परिस्थिती पाहून त्यांनी ही नोकरी सोडली. त्यानंतर बंगालचे प्रसिद्ध देशभक्त चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली.

प्रथमपासूनच ते जहाल विचारांचे होते. विद्यार्थीदशेत त्यांनी एकदा भारतीयांचा अपमान केला, म्हणून प्राध्यापकाच्या थोबाडीत मारली होती. जहाल पक्षाचे असूनही ते गांधीजींचा आदर करीत. गांधीजीबरोबर त्यांनी १९२९ मध्ये असहकार चळवळीत भाग घेतला होता. तसेच १९२९ मध्ये मिठाच्या सत्याग्रहातही भाग घेतला होता. ज्यावेळी चित्तरंजन दासगुप्ता कलकत्ता कॉर्पोरेशनचे मेयर बनले तेव्हा त्यांनी सुभाषचंद्रांना कॉर्पोरेशनचे उच्चाधिकारी बनविले. इंग्रज सरकारने त्यांना एका इंग्रज अधिकाऱ्याच्या खुनाच्या खोट्या आरोपावरून मंडालेच्या तुरुंगात टाकले. पुढे ते कलकत्ता काँग्रेस कॉर्पोरेशनचे मेयर बनले.

नेताजींनी मतभेद झाल्यामुळे काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि फॉरवर्ड ब्लॉक नामक स्वतंत्र पक्ष स्थापन केला. या पक्षाचा उद्देश पूर्ण स्वराज्य आणि हिंदू-मुसलमान ऐक्य हा होता. याच्या कारवायांमुळे सरकार चिडले व नेताजींना तुरुंगात टाकले. १९४० मध्ये प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले व घरीच नजरकैदेत ठेवण्यात आले. १९४१ मध्ये इंग्रज शिपायांची नजर चुकवून वेषांतर करून ते पळून गेले. ते सरळ अफगाणिस्तानात गेले. नंतर जर्मनीला गेले. जर्मन रेडिओवरून नेताजींनी स्वातंत्र्याचा संदेश दिला. १९४२ मध्ये ते जपानला गेले आणि तिथे आझाद हिंद सेनेची स्थापना केली. इम्फाळमध्ये इंग्रज सेनेशी युद्ध केले. दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती परत्करली. त्यामुळे आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना पकडण्यात आले. २३ ऑगस्ट १९४५ ला टोकियो रेडिओने विमान दुर्घटनेत नेताजींचा मृत्यू झाल्याची बातमी दिली, परंतु आजही त्यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडलेले नाही.

नेताजींचे नाव मोठ्या आदराने घेतले. जाते त्यांची ‘जयहिंद’ ही घोषणा आमची राष्ट्रीय घोषणा आहे. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाची समाप्ती आजही याच घोषणेने होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी निबंध 400 शब्द – Netaji Subhash Chandra Bose Essay in Marathi 400 Words

देशाला स्वतंत्र करण्यात ज्या महान नेत्यांनी विशेष योगदान दिले त्यातील एक सुभाषचंद्र बोस होत. “तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा।” या त्यांच्या घोषणेमुळे साऱ्या देशात नवचैतन्य संचारले. हजारो देशवासी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. ते म्हणत, “मैं रहूँ न रहूँ आझाद रहे हिन्दुस्तान मेरा’ हिंदुस्तान स्वतंत्र झाला. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ ला कटक येथे झाला. त्यांचे वडील जानकीदास बोस हे एक प्रसिद्ध वकील होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कटकलाच झाले. १९१३ मध्ये ते मॅट्रिक पास झाले. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी बी.ए. ची परीक्षा प्रथम श्रेणीत पास केली.

लगेच त्यांना सरकारी नोकरी मिळाली परंतु भारताची वाईट परिस्थिती पाहून नोकरी सोडली. त्यानंतर बंगालचे प्रसिद्ध देशभक्त चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. प्रथमपासूनच ते जहाल विचारांचे होते. विद्यार्थीदशेत त्यांनी एकदा भारतीयांचा अपमान केला, म्हणून प्राध्यापकाच्या थोबाडीत मारली होती. जहाल पक्षाचे असूनही ते गांधीजींचा आदर करीत. गांधीजीबरोबर त्यांनी १९२९ मध्ये असहकार चळवळीत भाग घेतला होता. तसेच १९२९ मध्ये मिठाच्या सत्याग्रहातही भाग घेतला होत्या. ज्यावेळी चित्तरंजन दासगुप्ता कलकत्ता कॉर्पोरेशनचे मेयर बनले तेव्हा त्यांनी सुभाषचंद्रांना कॉर्पोरेशनचे उच्चाधिकारी बनविले. इंग्रज सरकारने त्यांना एका इंग्रज अधिकाऱ्याच्या खुनाच्या खोट्या आरोपावरून मंडालेच्या तुरुंगात टाकले. १९२९ व १९३५ मध्ये कलकत्ता काँग्रेस कॉर्पोरेशनचे ते मेयर बनले आणि १९३८-१९३९ मध्ये काँग्रेसचे सभापती बनले.

नेताजींनी काँग्रेसच्या नीतीशी मतभेद झाल्यामुळे सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि फॉरवर्ड ब्लॉक नामक स्वतंत्र पक्ष स्थापन केला. या पक्षाचा उद्देश पूर्ण स्वराज्य आणि हिंदू-मुसलमान ऐक्य हा होता. याच्या कारवायांमुळे सरकार चिडले व नेताजींना तुरुंगात टाकले. १९४० मध्ये प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले व घरीच नजरकैदेत ठेवण्यात आले. १९४१ मध्ये इंग्रज शिपायांची नजर चुकवून वेषांतर करून पळून गेले. ते सरळ अफगाणिस्तानात गेले.

नंतर जर्मनीला गेले. तिथे हिटलरने त्यांचे स्वागत केले. जर्मन रेडिओवरून नेताजींनी स्वातंत्र्याचा संदेश दिला. १९४२ मध्ये ते जपानला गेले आणि तिथे आझाद हिंद सेनेची स्थापना केली. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून ब्रह्मदेशात गेले. इम्फाळमध्ये इंग्रज सेनेशी युद्ध केले. त्यांचे सैनिक खरे देशभक्त होते. ते लढत राहिले. १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती परत्करली त्यामुळे आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना पकडण्यात आले. २३ ऑगस्ट १९४५ ला टोकियो रेडिओने विमान दुर्घटनेत नेताजींचा मृत्यू झाल्याची बातमी दिली, परंतु आजही त्यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडलेले नाही.

नेताजींचे नाव मोठ्या आदराने घेतले. जाते त्यांची ‘जयहिंद’ ही घोषणा आमची राष्ट्रीय घोषणा आहे. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाची समाप्ती आजही याच घोषणेने होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी निबंध-Netaji Subhash Chandra Bose Essay in Marathi

पुढे वाचा:

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh

मना घडवी संस्कार मराठी निबंध

“मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”

भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | Bhartatil Vansanpatti Essay Marathi

भारतीय लोकशाही मराठी निबंध | Bhartiya Lokshahi Marathi Nibandh

Leave a Reply