Set 1: मदर तेरेसा मराठी निबंध – Mother Teresa Essay in Marathi
Table of Contents
मदर तेरेसा ही एक जगावेगळी ‘मदर’! साऱ्या जगाची, गोरगरिबांची ती आई झाली. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९१० रोजी झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय ठरवले. तेव्हाच त्यांनी ठरवले की, आपण मिशनरी व्हायचे, गरिबांच्या सेवेसाठी आपले आयुष्य खर्च करायचे
स्वदेश सोडून त्या कोलकात्याला आल्या. सतत ३१ वर्षे त्या कोलकात्याच्या झोपडपट्ट्यांमध्ये कार्य करत राहिल्या. लाखो गोरगरिबांची त्या ‘आई‘ झाल्या. मृत्युपंथाला लागलेल्या रुग्णाला त्यांनी आपल्या आश्रमात आणले. त्याला न्हाऊ घातले. त्याच्या आयुष्यात त्यांनी काही क्षण तरी आनंद निर्माण केला.
मदर तेरेसांच्या महान कार्याचा गौरव जगाने १९७९ साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन केला. त्या रकमेतून त्यांनी घरे नसलेल्या लोकांसाठी घरे बांधून दिली. त्यांच्या संस्थेने अनेक शाळा, अनाथालये, हॉस्पिटले, पुनर्वसन केंद्रे स्थापन केली.
आजही १२७ देशांत त्यांनी उभारलेल्या संस्थांमार्फत कार्य सुरू आहे. अशी ही महान सेविका १९९७ साली निधन पावली.
Set 2: मदर तेरेसा मराठी निबंध – Mother Teresa Nibandh Marathi
मदर तेरेसा हे नाव जरी आठवले तरी एक सेवाव्रती स्त्री नजरेसमोर येते. करूणा, त्याग, तपश्चर्या ह्यांची जणू ती साक्षात् मूर्तीच होती. समाजसेवेतील त्यांचे कार्यडोळे दिपवून टाकेल असेच आहे.
मदर तेरेसांचा जन्म २८ ऑगस्ट, १९१० रोजी युगोस्लाव्हियात झाला. त्यांचे नाव आईवडिलांनी ऍग्नेस असे ठेवले होते. परंतु लहानपणापासूनच ऍग्नेसचा धर्माकडे ओढा होता. तिला गरिबांची, दीनदुबळ्यांची सेवा करायची होती. त्यासाठीच तिला लग्नही करायचे नव्हते. आपल्याला नक्की काय करायचे आहे हे खूप लहान वयात फारच थोड्या भाग्यवंतांना कळते. ऍग्नेस त्या भाग्यवंतांपैकी एक होती. वयाच्या अठराव्या वर्षीच ती नन बनली आणि तिने आपल्या समाजकार्यास सुरूवात केली. मिशनरी म्हणून ती भारतात आली आणि इथलीच झाली. नन झाल्यावर तिचे नाव तेरेसा असे ठेवले गेले.
Set 3: मदर टेरेसा मराठी निबंध – Mother Teresa Essay in Marathi
मदर टेरेसा हजारो लोकांची माता होती. तिने सर्वांवर आईप्रमाणे प्रेम, ममता, वत्सलतेचा वर्षाव केला. लोकांची सेवा केली. ती करुणा त्याग, तपश्चर्या, परोपकार आणि प्रेमाची साक्षात देवी होती. तिने गरीब, निराश्रित, बेघर, आजारी, रोगी अपंग लोकांना आपलेसे केले. आयुष्यभर त्यांची सेवा केली. तिच्या करुणेची तुलना गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, म. गांधी यांच्याशी करता येईल. भारताला मदर टेरेसांचा अभिमान वाटतो. अनेक शतकांनंतर एकदाच अशा अलौकिक व्यक्तीचा जन्म होत असतो.
मदर टेरेसांचा जन्म २८ ऑगस्ट १९१० रोजी युगोस्लाव्हियात झाला. तिचे नाव अॅग्नेस होते. वयाच्या १८ व्या वर्षीय ती नन बनली व तिने आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली. कलकत्त्याखेरीज इतर अनेक ठिकाणी अनाथ, महारोगी, आजारी, मुले स्त्रिया आणि निराश्रित लोकांसाठी दवाखाने, अनाथाश्रम स्थापन केले. तिने स्थापन केलेल्या “मिशनरीज ऑफ चॅरिटी” या संस्थेच्या भारतात १६० शाखा आहेत. बेघर, निराधार लोकांसाठीच ती जगली.
मदर टेरेसांचा त्याग आणि सेवा लक्षात घेऊन अनेक संस्था तसेच भारत सरकारने त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. १९७९ मध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा नोबेलचा शांती पुरस्कार मिळाला. १९८० मध्ये भारत सरकारने ‘भारतरत्न’ ही सर्वोच्च पदवी प्रदान केली. जवाहरलाल नेहरू पुरस्कार पण त्यांना देण्यात आला. १९४८ मध्ये त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले. साधेपणा, सरळ नि:स्वार्थी स्वभाव सेवा याचे एक अनुपम उदाहरण म्हणजे मदर. मदर टेरेसांची व्यक्तिगत संपती काहीही नव्हती. मदरचे सारे जीवन उदारता, सेवा, करुणा हेच होय. अनेक लोकांनी त्यांच्या पासून प्रेरणा घेतली व सामाजिक कार्य केले.
या करुणामयीचा मृत्यू ५ सप्टेंबर १९९७ रोजी कलकत्त्यास झाला. सारा भारत, सारे जग शोकात बुडाले. त्यांची संस्था खऱ्या अर्थाने अनाथ झाली. त्यांच्या दृष्टीने सेवा हाच धर्म, मानव ही एकच जात होती. सर्व प्राणिमात्रांत त्या ईश्वराला पाहत असत. आपल्या कार्याचा त्यांना वृथा अभिमान नव्हता. आपल्या महान गुणांमुळे त्या संत पदवीला जाऊन पोहोचल्या.
Set 4: एक आगळी आई – मदर टेरेसा निबंध मराठी – Essay on Mother Teresa in Marathi
“कलकत्याच्या एका रस्त्यावरून एक विदेशी स्त्री चालली होती. तिच्याबरोबर तिच्या दोन सहकारी स्त्रियाही होत्या. पोशाखावरून ती स्त्री सेवाव्रत स्वीकारलेली धर्मप्रचारिका वाटत होती. रस्त्याच्या कडेला एक माणूस असहाय अवस्थेत पडला होता. जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्याच्याकडे पाहायलाही सवड नव्हती. तो आता फार थोड्या तासांचा सोबती होता.
त्या स्त्रीने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला आपल्या आश्रमात आणले. त्याचे अंग पुसले. त्याला स्वच्छ कपडे घातले. मरण्यापूर्वी मिळालेल्या या वागणुकीने त्याचा चेहरा उजळला. तेव्हा ती स्त्री आपल्या साथीदार स्त्रियांना म्हणाली, मरताना त्याला जर जाणवले की, आपले कोणी तरी आहे तर त्याचे मरण सुखाचे होईल.”
एका भिकाऱ्याचा एवढा विचार करणारी ही जगावेगळी आई म्हणजे ‘मदर टेरेसा’ होय. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना आपल्या जीवनध्येयाचा साक्षात्कार झाला; तेव्हाच त्यांनी स्वत:ला गरिबांच्या सेवेसाठी वाहून घ्यायचे ठरवले. अठराव्या वर्षी त्यांनी धर्मप्रचारिकेची दीक्षा घेतली व घर सोडले. १९३१ साली दार्जिलिंग येथे त्यांनी सेवेची व धर्मप्रचाराची शपथ घेतली व १९३९ साली त्यांनी कलकत्त्यात आपल्या कामाला सुरवात केली.
आजतागायत त्यांचे हे कार्य अखंड चालू आहे. १० सप्टेंबर १९४६ नंतर त्यांनी झोपडपट्टीतील दीनदुबळे व गरीब यांच्यासाठी आपले आयुष्य वेचण्याचे ठरवले व त्या लाखो अनाथांच्या, अपंगांच्या सर्वार्थाने ‘मदर’ झाल्या. .
मदर टेरेसांच्या या सेवेचे मोल जगाला उमगले आणि १९७९ साली त्यांना ‘शांततेचे नोबेल पारितोषिक ‘ मिळाले. ती संपूर्ण रक्कमही त्यांनी गरिबांसाठीच खर्चण्याचे ठरवले. भारतानेही ‘भारतरत्न’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे. मदर टेरेसा म्हणजे साक्षात प्रेम आणि मूर्तिमंत करुणा होय.
Set 5: राष्ट्रसंत मदर तेरेसा निबंध मराठी – Mother Teresa Essay in Marathi
मदर तेरेसा हे नाव जरी आठवले तरी एक सेवाव्रती स्त्री नजरेसमोर येते. करूणा, त्याग, तपश्चर्या ह्यांची जणू ती साक्षात् मूर्तीच होती. समाजसेवेतील त्यांचे कार्य डोळे दिपवून टाकेल असेच आहे.
मदर तेरेसांचा जन्म २८ ऑगस्ट, १९१० रोजी युगोस्लाव्हियात झाला. त्यांचे नाव आईवडिलांनी ऍग्नेस असे ठेवले होते. परंतु लहानपणापासूनच ऍग्नेसचा धर्माकडे ओढा होता. तिला गरिबांची, दीनदुबळ्यांची सेवा करायची होती. त्यासाठीच तिला लग्नही करायचे नव्हते. आपल्याला नक्की काय करायचे आहे हे खूप लहान वयात फारच थोड्या भाग्यवंतांना कळते. ऍग्नेस त्या भाग्यवंतांपैकी एक होती. वयाच्या अठराव्या वर्षीच ती नन बनली आणि तिने आपल्या समाजकार्यास सुरूवात केली. मिशनरी म्हणून ती भारतात आली आणि इथलीच झाली.नन झाल्यावर तिचे नाव तेरेसा असे ठेवले गेले.
कलकत्ता येथे मदर तेरेसांनी आपला आश्रम उघडला. अनाथ, अपंग, महारोगी, आजारी अशा लहान मुलांसाठी आणि स्त्रियांसाठी त्यांच्या आश्रमाचे दरवाजे सदैव सताड उघडे होते. म्हणूनच त्यांना लोकांनी मदर ही पदवी दिली.
त्यांच्या ‘ मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ ह्या संस्थेच्या आज भारतात १६० शाखा आहेत. बेघर, निराधार लोकांना घर मिळावे, आधार मिळावा, त्यांना जीवन चांगले जगता यावे म्हणून मदर तेरेसांनी आपले उभे आयुष्य वेचले. लोकांसाठीच जणू त्या जगल्या. त्या जरी जन्माने युगोस्लाव्हियन असल्या तरी त्यांनी आपले सेवाकार्य भारतात करायचे होते म्हणून त्यांनी १९४८ सालीच भारताचे नागरिकत्वही घेतले.
त्यांच्या समाजकार्याने प्रभावित होऊन अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले. १९७९ साली आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा नोबेलचा शांती पुरस्कार त्यांना मिळाला. तसेच १९८० साली भारत सरकारने । भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च सन्मान त्यांना दिला. जवाहरलाल पुरस्कारही त्यांनाच देण्यात आला होता.
वृत्तीचा साधेपणा, सरळ, निःस्वार्थी स्वभाव आणि सेवावृत्ती हे त्यांचे विशेष गुण होते. त्यांनी व्यक्तिगत संपत्ती काही ठेवलीच नव्हती. औदार्य, सेवा आणि करूणा हे त्यांच्या जीवनाचे अधिष्ठान होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन कित्येक लोकांनी सामाजिक कार्य केले.
५ सप्टेंबर, १९९७ रोजी कलकत्ता येथे मदर तेरेसा ह्यांचा मृत्यू झाला तेव्हा सारी जनता दुःखसागरात बुडून गेली. त्यांनी उभारलेली संस्था अनाथ झाली. त्यांच्या दृष्टीने माणुसकी हाच खरा धर्म होता. कुठलाही अभिनिवेश न बाळगता त्या आपलं कार्य करीत असत. आपल्या महान गुणांमुळेच त्या संतपदी जाऊन पोचल्या.
कलकत्ता येथे मदर तेरेसांनी आपला आश्रम उघडला. अनाथ, अपंग, महारोगी, आजारी अशा लहान मुलांसाठी आणि स्त्रियांसाठी त्यांच्या आश्रमाचे दरवाजे सदैव सताड उघडे होते. म्हणूनच त्यांना लोकांनी मदर ही पदवी दिली.
त्यांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ ह्या संस्थेच्या आज भारतात १६० शाखा आहेत. बेघर, निराधार लोकांना घर मिळावे, आधार मिळावा, त्यांना जीवन चांगले जगता यावे म्हणून मदर तेरेसांनी आपले उभे आयुष्य वेचले.
लोकांसाठीच जणू त्या जगल्या. त्या जरी जन्माने युगोस्लाव्हियन असल्या तरी त्यांनी आपले सेवाकार्य भारतात करायचे होते म्हणून त्यांनी १९४८ सालीच भारताचे नागरिकत्वही घेतले. त्यांच्या समअजकार्याने प्रभावित होऊन अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले. १९७९ साली आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा नोबेलचा शांती पुरस्कार त्यांना मिळाला. तसेच १९८० साली भारत सरकारने भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च सन्मान त्यांना दिला. जवाहरलाल पुरस्कारही त्यांनाच देण्यात आला होता.
वृत्तीचा साधेपणा, सरळ, निःस्वार्थी स्वभाव आणि सेवावृत्ती हे त्यांचे विशेष गुण होते. त्यांची व्यक्तिगत संपत्ती काहीही नव्हती. औदार्य, सेवा आणि करूणा हे त्यांच्या जीवनाचे अधिष्ठान होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन कित्येक लोकांनी सामाजिक कार्य केले.
५ सप्टेंबर, १९९७ रोजी कलकत्ता येथे मदर तेरेसा ह्यांचा मृत्यू झाला तेव्हा सारी जनता दुःखसागरात बुडून गेली. त्यांनी उभारलेली संस्था अनाथ झाली. त्यांच्या दृष्टीने माणुसकी हाच खरा धर्म होता. कुठलाही अभिनिवेश न बाळगता त्या आपलं कार्य करीत असत. आपल्या महान गुणांमुळेच त्या संतपदी जाऊन पोचल्या.
मदर टेरेसा निबंध मराठी – Essay on Mother Teresa in Marathi
मदर टेरेसा एक महान संत होती. त्यांनी असंख्य असहाय, गरीब, रूग्ण आणि लाचार लोकांना आईचे प्रेम सूरक्षा, सहाय्यता आणि प्रेम दिलं. त्यांचे हे गुण त्यांना एक दिव्य विभूती आणि अद्वितीय करूणाची मूर्ती बनवते. त्याची पवित्रता, साधेपणा, समर्पण-भावना, त्याग आणि तपस्येचं दुसरं उदाहरण मिळणं कठीण आहे.
भारतातील कलकत्त्याची ही महान संत आणि देवीचा जन्म २७ ऑगस्ट १९१० रोजी युगोस्लाव्हियात झाला, त्याचे आईवडील धार्मीक प्रवृत्तीचे होते. बालपणापासूनच त्यांना ध्यानधारणा, प्रार्थना करणे आणि भौतीक सुखापासून दूर राहाण्याची सवय होती. आधीपासूनच त्यांनी गरीबांची आणि असहाय लोकांची सेवा करायची असे ठरविले होते. १८ वर्षाच्या वयातच त्यांनी या जगाचा त्याग करून एका साध्वीचे जीवन स्वीकारले, त्यांना नन असे म्हणत.
भारतात येऊन त्यांनी आपल्या कार्याची सुरूवात एक शिक्षिका म्हणून केली, त्या कलकत्याच्या सेंट मेरी हाइस्कूलात शिकवू लागल्या. निंरचना नंतर तिथेच प्रार्चाय झाल्या. एका दिवशी अचानक त्यांना ईसा मसीहाचा परम संदेश ऐकू आला आणि त्याने प्रेरीत होवून त्या पूर्ण त्याग आणि तपस्येच्या मार्गावर चालू लागल्या. आजारी, अपंग, निर्धन, निराश्रीत लोकांच्या सेवेत तण-मनाने लागल्या. घाणेरड्या झोपडपट्या, झोपड्या आणि अंधारग्रस्त घरांना त्यांनी आपलं कार्यक्षेत्र म्हणून निवडलं. तिथे जाऊन दीन-दुःखी आणि असाह्य रोगी यांची सेवा केली. बेवारसी प्रेत यांचे सन्मानपूर्वक अंतिम संस्कार केले. हे काम देखील त्यांनी स्वीकारले. याच उद्देशाने त्यांनी १९५० मध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या संस्थेची, परित्यक्त आणि निराश्रीत लोकांची सेवा करण्यात व्यस्त आहे.
त्यांची ही निःस्वार्थ सेवा, त्याग, तपस्या आणि असीम करूणेला पाहून त्यांना अनेक पुरस्कार व सामान्य देण्यात आले. नोबेल शांती पुरस्कार तसेच भारतरत्न आदी प्रमुख आहे. १५ सप्टेबर १९९७ ला ज्यावेळी त्यांनी देहत्याग केला त्यावेळी लाखो लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. असंख्य अनाथ आणि निराश्रीत झाले. आपल्याला गर्व असायला हवा की मदर तेरेसा एक भारतीय महिला होत्या.
पुढे वाचा:
- भ्रष्टाचार निबंध मराठी
- भ्रष्टाचार संपला तर निबंध मराठी
- भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध
- भाषण कला निबंध मराठी
- भारतीय समाज आणि भारतीय स्त्री निबंध मराठी
- भारतीय संस्कृती मराठी निबंध
- भारतीय शेतकरी निबंध मराठी
- भारतीय लोकशाही निबंध मराठी
- भारतीय राज्यघटना निबंध मराठी
- भारतातील वैज्ञानिक प्रगती निबंध मराठी
- भारतातील वनसंपदा निबंध मराठी
- भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर निबंध मराठी
- डॉ विक्रम साराभाई निबंध मराठी
- भारत माझा जगी महान मराठी निबंध
- विविधतेत एकता निबंध मराठी
- भाज्या आणि फळांचे महत्व निबंध मराठी
- भाऊबीज निबंध मराठी