मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मराठी निबंध – Man Kara Re Prasanna Essay in Marathi

संत तुकाराम महाराजांनी कोणत्याही कार्यात यश प्राप्ती व्हावयाची असेल, तर मन आनंदी प्रसन्न असावयास हवे असा संदेश दिलेला आहे.

उपदेश सांगणे सोपे; पण अंमलात आणणे कठीण असले तरी कार्यसिद्धीसाठी मनाची प्रसन्नता आवश्यक आहे. घरी छोटीशी झालेली चूक आईजवळ प्रांजळपणे हसतमुखाने कबूल केल्यास आईचा राग कुठल्या कुठे पळून जातो. मन हे वाऱ्यासारखे चंचल, पाखरासारखे अस्थिर व जनावरांसारखे ओढाळ असते. ते लोभी असते, स्वार्थी असते. त्याला योग्यवेळी आवर घातला नाही, तर दोरा तुटलेल्या पतंगासारखे ते भरकटत राहते.

अंतर्हदय म्हणजेच मन. मन उदास झालं की आलिशान मोटार, सुंदर पेंटिंग, गुलाबाचं फूल सुद्धा सुखकारक वाटत नाही. कोणतेही काम करण्यास उत्साह वाटत नाही. म्हणूनच मनावर ताबा मिळवून सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कार्यसिद्धी होण्यास सुरुवात होणे होय. ‘मन जिंकणारा जग जिंकतो’ असे विवेकानंदांनी सांगितले आहे. म्हणूनच म्हटले जाते. –

“मन शुद्ध तुझं, गोष्ट आहे लाखमोलाची ।

तू चाल पुढं तुला रंगड्या भीती कशाची? ।”

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मराठी निबंध – Man Kara Re Prasanna Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply