महाशिवरात्रि निबंध मराठी – Mahashivratri Nibandh Marathi

हिंदू धर्माचे तीन मुख्य देव आहेत ब्रम्हा, विष्णु आणि महेश. ह्यापैकी ब्रम्हा हा ह्या जगाचा निर्माता आहे, विष्णु ह्या जगाचा पालनकर्ता आहे तर महेश किंवा शिव हा ह्या जगाचा नाश करणारा आहे. म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तीन अवस्था हे तिन्ही देव सूचित करतात. ह्या तिन्ही देवांपैकी शिव ह्यालाच महादेव असेही मानले जाते. महाशिवरात्र हा सण प्रामुख्याने शंकराशी निगडित आहे.

ही शिवरात्र वर्षातून दोन वेळा म्हणजे एकदा श्रावणात तर एकदा फाल्गुनात अशी येते. हिंदूंची प्राचीन देवता शिव हीच आहे त्यामुळे तिची पूजा सर्व हिंदूधर्मीय लोक करतात. मात्र शंकराच्या मंदिरात तो कधीही मानवी आकारात नसतो तर लिंगरूपातच असतो.

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला जलाभिषेक करतात. काही श्रद्धाळू लोक हरिद्वारहून गंगेचे पाणी त्यासाठी चालत कावडीने घेऊन येतात आणि मग जवळच्या शिवालयात जाऊन त्या पाण्याचा शिवाला अभिषेक करतात. त्याशिवाय त्या पाण्यात दूध मिसळून त्यात बेलपत्र भिजवूनही शिवलिंगाला वाहिले जाते. ह्यामुळे शिव लौकर प्रसन्न होतो असे मानले जाते. ह्या दिवशी मंदिरात येणारा प्रत्येक भक्त घंटानाद करताना ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोलेनाथ’ असे म्हणतो.

शंकराने समुद्रमंथनाच्या वेळेस निघालेले हलाहलविष प्राशन केले. त्यानेच पवित्र गंगेला ह्या धरणीवर आणले. तो गळ्यात साप घालतो, शरीराला चिताभस्म लावतो आणि व्याघ्रांबर परिधान करतो. शंकराने अर्धनारीचे रूप धारण केले होते. तो नृत्यसम्राट आहे.त्यानेच तांडव नृत्य केले होते.

शिवमंदिरे फार प्राचीन काळापासून बांधली जात आहेत. औरंगाबाद येथील वेरूळ लेण्यामधील शिवमंदिर आजही शिल्पकलेचा अजोड नमुना मानले जाते. ते सातवाहनांच्या काळात निर्माण झाले.

भगवान शंकराची उपासना देव आणि दैत्य दोघेही करीत होते असे पुराणात म्हटले आहे. राम आणि रावण दोघेही शिवाची उपासना करीत असत. ते स्वभावाने भोळे म्हणून प्रसिद्ध आहेत.शंकर आणि पार्वती म्हणजेच पुरूष आणि प्रकृति असे म्हटले जाते. त्या दोघांना कार्तिकेय आणि गणेश असे दोन पुत्र आहेत.

शिवरात्रीच्या दिवशी सर्वत्र शंकराची पूजा केली जाते. लोक पूर्ण दिवस उपवास करतात. काशी, उज्जैन, हरिद्वार, रामेश्वर ह्या ठिकाणी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ह्या दिवशी शिवमंदिराबाहेर लोकांची गर्दी होते. पुरूष, स्त्रिया आणि लहान मुले पाण्याचे कलश, बेलपत्र आणि हार घेऊन शंकराला अभिषेक करतात.

असा हा महाशिवरात्रीचा पवित्र दिवस आहे.

महाशिवरात्रि निबंध मराठी – Mahashivratri Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply